हल्ली तरुण वयात अनेकाचे केस पांढरे होताना दिसून येतं आहे. वाढते प्रदूषण, खाण्यापिण्याच्या सवयी, केमिकलयुक्त शॉम्पू आणि साबणाचा आपल्या केसांवर परिणाम होतो.(How to prevent premature white hair) त्यामुळे काळे केस पांढरे होऊ लागतात. जेव्हा केव्हा आपण स्वत:ला आरशात पाहातो. तेव्हा केसांचे आणि चेहऱ्याचे आरोग्य आपल्याला समजून येते. चेहऱ्यावर सुरकुत्या येणं, केस पांढरे होणं,केसगळती यांसारख्या समस्यांना अनेकांना सामोरे जावे लागते. (hair falls issue) अगदी कमी वयात अनेकांना हा त्रास सहन करावा लागत आहे. (hair care tips)
तरुण वयात केस पांढरे झाल्यामुळे अनेक स्त्री व पुरुष केसांना डाय करतात. (ayurvedic tea for hair) अशावेळी त्यावर आपण योग्य तो उपचार करायला हवा. केसांचे अकाली पांढरे होणे हे ताण आणि शरीरात अनेक पोषक तत्वांची कमतरता दर्शवते. यासाठी आपल्याला आहारात आणि जीवनशैलीत काही बदल करायला हवे. पांढरे केस कमी करण्यासाठी आपण आहारात हा आयुर्वेदिक चहा घ्यायला हवा.
आयुर्वेदिक चहा साहित्य
- जास्वंदीच्या फुलांचा पावडर - १ चमचा
- मेथीचे दाणे - १/२ चमचा
- हळद - १/२ चमचा
- मीठ - १/२ चमचा
- लिंबाचे काही थेंब
कृती
1. एका भांड्यात मेथीचे दाणे, हळद, सैंधव मीठ आणि जास्वंदीच्या फुलांची पावडर घाला.
2. हे पदार्थ चांगले मिसळून घ्या. अर्धा चमचा पावडर १ ग्लास पाण्यात मिसळा. त्यात लिंबाच्या रसाचे काही थेंब घाला.
3. नियमित हा आयुर्वेदिक चहा प्यायल्याने अकाली केस पांढरे होण्यास मदत होईल.
आयुर्वेदिक चहाचे फायदे
1. मेथीचे दाणे केसांच्या मुळांना मजबूत बनवते. तसेच अकाली केस पांढरे होण्यापासून रोखते.
2. मेथीच्या बियांमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन के आणि व्हिटॅमिन सी असते. त्यात लोह, पोटॅशियम आणि फॉलिक अॅसिड भरपूर प्रमाणात आढळते. हे केसांना पोषण देण्याचे काम करते. तसेच केस पांढरे होण्यापासून बचाव होतो.
3. हळदीमध्ये दाहक- विरोधी गुणधर्म आहेत. ज्यामुळे टाळूचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. हळदीमध्ये लोह आणि तांबे भरपूर प्रमाणात असते. हे केस काळे करण्यास मदत करते.
4. हळदीमध्ये असलेले करक्यूमिन केसांना मजबूत करते. तसेच गळण्यापासून रोखते.
5. जास्वंदीच्या फुलांचा चहा प्यायल्याने केस गळती कमी होते, त्यात असलेले अँटी-ऑक्सिडंट्स केसांना अकाली पांढरे होण्यापासून रोखतात. यात असणारे घटक केसांना मुळांना वाढवण्यास मदत करते.
6. सैंधव मिठात अनेक आवश्यक खनिजे असतात. ज्यामुळे केसांना ताकद मिळते.