Join us  

उन्हामुळे चेहरा डल, निस्तेज झाला? सकाळी उठल्यानंतर करा फक्त १ काम, चेहरा दिवसभर दिसेल फ्रेश

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2023 10:49 AM

How to prevent tanning in summer : त्वचा चांगली ठेवण्यासाठी प्रत्येकालाच एक स्किन केअर रुटीन फॉलो करणं गरजेचं असतं.

उन्हाळ्यात सगळ्यात आधी जाणवणारा बदल म्हणजे काहीजणांचा चेहरा डल, काळपट दिसतो. उन्हाच्या संपर्कात आल्यानं स्किन फारच काळी पडते.  ग्लोईंग स्किन मिळवण्यासाठी क्लिनअप, ब्लीच, फेशियल करूनही हवातसा बदल चेहऱ्यात दिसत नाही. (What to do for glowing skin)त्वचा चांगली ठेवण्यासाठी प्रत्येकालाच एक स्किन केअर रुटीन फॉलो करणं गरजेचं असतं. सकाळी उठल्यापासून रात्री  झोपपर्यंत त्वचेची व्यवस्थित काळजी घेतली त्वचा काळी होणं रोखता येऊ शकतं. त्वचा कायम फ्रेश दिसण्यासाठी काही सोप्य स्किन केअर टिप्स पाहूया. (Summer care for your skin)

चेहरा स्वच्छ ठेवा

त्वचेची काळजी घेण्याचा हा पहिला आणि महत्त्वाचा नियम आहे. चेहरा स्वच्छ ठेवल्याने पिंपल्स आणि मुरुमांची समस्या उद्भवत नाही. चमकणाऱ्या चेहऱ्यासाठी तुम्ही सकाळी उठल्यानंतर त्वचा स्वच्छ करावी. यामुळे चेहऱ्यावरील तेल निघून जाईल आणि तुमचा चेहरा चमकदार दिसेल. ( How to prevent tanning in summer) चेहरा धुण्यासाठी आंघोळीचा साबण वापरू नका. त्यामुळे त्वचेचे नुकसान होते. त्याऐवजी तुम्ही ओटमील किंवा बेसनाने तुमचा चेहरा स्वच्छ करू शकता. या दोन्ही गोष्टी नैसर्गिक शुद्धीकरणाचे काम करतात. किंवा चेहऱ्याला सूट होईल असा फेसपॅक वापरा.

पॅक लावा

चेहरा स्वच्छ केल्यानंतर चेहऱ्यावर फेस पॅक लावावा. हे पॅक त्वचेसाठी फायदेशीर असतात. तुम्हाला बाजारातून फेस पॅक खरेदी करण्याची गरज नाही. तुम्ही घरच्या घरी फेस पॅक बनवू शकता. मुलतानी मातीपासून ते एलोवेरा क्रीमपर्यंत चेहऱ्याला चमक देण्यासाठी उपयुक्त आहे. जर तुमची त्वचा कोरडी असेल तर मधात मलई घाला. चेहरा धुतल्यानंतर पॅक चेहऱ्यावर लावा. पॅक थोडा वेळ ठेवा आणि नंतर चेहरा धुवा. 

रोज व्यायाम करूनही पोट कमी होत नाहीये? रोज नाश्त्याला हे पदार्थ खा, झरझर घटेल चरबी

१) चेहऱ्यावर केमिकल आधारित उत्पादने वापरू नयेत. सौम्य क्लिन्झरने चेहरा धुवा.

२) गरम पाण्याने चेहरा धुवू नका. असे केल्याने तुमची त्वचा कोरडी होईल.

३) नेहमी सनस्क्रीन वापरा. हे तुमच्या त्वचेला उन्हापासून होणाऱ्या नुकसानापासून वाचवण्यासाठी काम करेल.

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी