Lokmat Sakhi >Beauty > How To Prevent White Hair : केस अचानक पांढरे व्हायला लागले, हे 1 व्हिटॅमिन कमी पडतेय, करा तातडीने आहार बदल...

How To Prevent White Hair : केस अचानक पांढरे व्हायला लागले, हे 1 व्हिटॅमिन कमी पडतेय, करा तातडीने आहार बदल...

How To Prevent White Hair : आहारात काही पदार्थांचा आवर्जून समावेश करायला हवा, ज्यामुळे केस पांढरे होण्यापासून आपली सुटका होऊ शकेल.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2022 12:44 PM2022-06-20T12:44:08+5:302022-06-20T12:47:09+5:30

How To Prevent White Hair : आहारात काही पदार्थांचा आवर्जून समावेश करायला हवा, ज्यामुळे केस पांढरे होण्यापासून आपली सुटका होऊ शकेल.

How To Prevent White Hair: Hair suddenly turns white, it is deficient in Vitamin 1, make immediate dietary changes ... | How To Prevent White Hair : केस अचानक पांढरे व्हायला लागले, हे 1 व्हिटॅमिन कमी पडतेय, करा तातडीने आहार बदल...

How To Prevent White Hair : केस अचानक पांढरे व्हायला लागले, हे 1 व्हिटॅमिन कमी पडतेय, करा तातडीने आहार बदल...

Highlightsकेसांचा योग्य पद्धतीने पोषण होत नसले तरी ते पांढरे होणे, गळणे अशा समस्या उद्भवतातआपला आहार समतोल असेल तर आरोग्य चांगले राहतेच पण सौंदर्य टिकून राहण्यासही त्याची मदत होते

काळेभोर केस ही आपल्या सौंदर्यातील एक महत्त्वाची गोष्ट आहे. मात्र कधी केस गळणे, कोंडा होणे, पातळ होणे, रुक्ष होणे किंवा कमी वयात केस पांढरे होणे या समस्या सध्या वाढत आहेत. केस पांढरे होणे ही सध्या बहुतांश लोकांना भेडसावणारी समस्या आहे. एकदा केस पांढरे झाले की आपण कमी वयातही वयस्कर दिसायला लागतो. मग सतत डाय करण्याला पर्याय नसतो. पण डायमध्ये असणाऱ्या विविध रासायनिक पदार्थांमुळे केस खराब होतात. (How To Prevent White Hair) केस पांढरे होण्याची अनेक कारणे असून अनुवंशिकता, केसाचे योग्य पद्धतीने पोषण न होणे, रासायनिक उत्पादने यांमुळे केस काळेभोर न राहता पांढरे व्हायला लागतात (Vitamin deficiency causes whiteness of hairs).  

(Image : Google)
(Image : Google)

आपला आहार उत्तम असेल तर शरीराचे चांगल्या पद्धतीने पोषण होते. यासाठी आहारात प्रोटीन, जीवनसत्त्वे, खनिजे, फायबर, स्निग्ध पदार्थ, कॅल्शियम अशा सगळ्या गोष्टी योग्य त्या प्रमाणात असणे आवश्यक असते. यातला एकही घटक कमी झाला तरी चेहऱ्यावर पांढरे डाग येणे, हातापायाची हाडे दुखणे, प्रतिकारशक्ती कमी होणे अशी लक्षणे दिसायला लागतात. केस पांढरे होणे हेही शरीरात बी १२ जीवनसत्त्वाची कमतरता हे एक महत्त्वाचे कारण असू शकते. त्यामुळे आहारात काही पदार्थांचा आवर्जून समावेश करायला हवा, ज्यामुळे केस पांढरे होण्यापासून आपली सुटका होऊ शकेल. आता असे पदार्थ कोणते ते पाहूया

१. दूध आणि दुग्धजन्य पदार्थ 

दूध, चीज, पनीर, दही, ताक यांसारख्या दुग्धजन्य पदार्थांमध्ये प्रथिनांबरोबरच अनेक व्हिटॅमिन्स आणि खनिजे असतात. यामध्ये व्हिटॅमिन बी १२ चांगल्या प्रमाणात असल्याने ज्यांचे केस पांढरे होण्यास सुरुवात झाली आहे त्यांनी आहारात दूध आणि दुधाच्या पदार्थांचा आवर्जून समावेश करावा. 

२. ब्रोकोली, मशरुम 

आपण साधारणपणे ब्रोकोली किंवा मशरुम या गोष्टी हॉटेलमध्ये गेल्यावरच खातो. पण घरातही आपण सलाड किंवा भाजीमध्ये, सूप करण्यसाठी या भाज्यांचा वापर करु शकतो. सध्या बाजारात मशरुम आणि ब्रोकोली अगदी सहज उपलब्ध असल्याने आहारात या दोन्ही गोष्टींचा आवर्जून समावेश करायला हवा. या दोन्ही गोष्टींमध्ये बी १२ चांगल्या प्रमाणात असल्याने केस पांढरे होण्याच्या समस्येवर हा उत्तम उपाय आहे.  

(Image : Google)
(Image : Google)

३. अंडी 

अंडी आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असतात असे आहारतज्ज्ञ नेहमी सांगतात. अड्यातून शरीराला प्रोटीन आणि व्हिटॅमिन्स मिळत असल्याने आहारात अंड्यांचा नियमित समावेश करायला हवा. दोन अंड्यांमधून शरीराला आवश्यक असणाऱ्या एकूण व्हिटॅमिन बी १२ पैकी ४६ टक्के व्हिटॅमिन मिळते. त्यामुळे अंडी हा व्हिटॅमिन बी १२ चा उत्तम सोर्स आहे. 

Web Title: How To Prevent White Hair: Hair suddenly turns white, it is deficient in Vitamin 1, make immediate dietary changes ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.