Lokmat Sakhi >Beauty > डोळ्यांखालच्या बारीक रेषा, सुरकुत्यांमुळे वयस्कर दिसताय? ५ मिनिटं १ व्यायाम करा-दिसाल तरूण

डोळ्यांखालच्या बारीक रेषा, सुरकुत्यांमुळे वयस्कर दिसताय? ५ मिनिटं १ व्यायाम करा-दिसाल तरूण

How to prevent wrinkles and fine lines : सुरकुत्यांमुळे चेहऱ्याची नैसर्गिक सुंदरता कमी होऊ लागते. पण ५ ते १० मिनिटं स्वत:साठी वेळ काढला तर तुम्ही चेहरा वाढत्या वयातही सुंदर ठेवू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2023 12:45 PM2023-07-19T12:45:17+5:302023-07-19T13:19:17+5:30

How to prevent wrinkles and fine lines : सुरकुत्यांमुळे चेहऱ्याची नैसर्गिक सुंदरता कमी होऊ लागते. पण ५ ते १० मिनिटं स्वत:साठी वेळ काढला तर तुम्ही चेहरा वाढत्या वयातही सुंदर ठेवू शकता.

How to prevent wrinkles and fine lines : Simple ways to reduce premature skin aging | डोळ्यांखालच्या बारीक रेषा, सुरकुत्यांमुळे वयस्कर दिसताय? ५ मिनिटं १ व्यायाम करा-दिसाल तरूण

डोळ्यांखालच्या बारीक रेषा, सुरकुत्यांमुळे वयस्कर दिसताय? ५ मिनिटं १ व्यायाम करा-दिसाल तरूण

वाढत्या वयात त्वचेवर सुरकुत्या आणि डार्क सर्कल्स येण्याची समस्या उद्भवते. याशिवाय काही इतर कारणंही चेहरा वेळेआधीच वयस्कर दिसण्यामागे कारणीभूत ठरतात, आहारात पोषक तत्वांची कमतरता, झोप पूर्ण न होणं, फिजिकल एक्टिव्हिटीजचा अभाव, प्रदूषण, मानसिक ताण-तणाव ही कारणं असू शकतात. यामुळे त्वचेची नैसर्गिक चमक कमी होते आणि कोरडेपणा येतो. (How to prevent wrinkles and fine lines)

सुरकुत्यांमुळे चेहऱ्याची नैसर्गिक सुंदरता कमी होऊ लागते. पण ५ ते १० मिनिटं स्वत:साठी वेळ काढला तर तुम्ही चेहरा वाढत्या वयातही सुंदर ठेवू शकता.  वाढत्या वयात उद्भवणाऱ्या समस्याही यामुळे नियंत्रणात ठेवता येऊ शकतात. कपोलधौती हा असा व्यायाम प्रकार एक प्रकारचा फेशियल योगा आहे. ज्यामुळे चेहऱ्याच्या मसल्सवर काम केले जाते आणि चेहऱ्यावरील ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित राहते. (Easy Ways to Reduce Wrinkles and Fine Lines)

एक्सपर्टच्यामते कपोल धौती क्रियेला मुख शुद्धी क्रिया असंही म्हटलं जातं. यामुळे सुरकुत्या कमी होता याशिवाय गाल आणि मसल्सही मजबूत राहतात. रोज  ५ मिनिटं वेळ काढून ३ वेळा हा उपाय केल्यानं चांगला परिणाम दिसून येईल. डबल चीन, कपाळावरच्या सुरकुत्या, डबल चिन, डार्क सर्कल्स येत नाहीत. 

रिंकल्स आणि फाईन लाईन्स टाळण्याचे उपाय (Simple ways to reduce premature skin aging)

रोज नियमित पाणी प्यायल्यानं त्वचा हायड्रेट राहते. यामुळे सुरकुत्या येणं टाळता येतं. सुर्याच्या संपर्कात येताना सनस्क्रिनचा वापर न चुकता करा. कारण सुर्याच्या हानीकारक किरणांमुळे त्वचेचं नुकसान होतं. एंटी रिंकल्स क्रिमचा वापर करा. यामुळे फाईन लाईन्ससुद्धा कमी होतात. योग्य प्रमाणात झोप घ्या यामुळे ताण-तणाव कमी होतो. ज्यांना फाईन लाईन्सची समस्या असते ते लोक व्यवस्थित झोप घेत नाहीत.  याशिवाय बटाट्याचा रस त्वचेचा लावून ठेवा आणि सुकल्यानंतर चेहरा स्वच्छ धुवा. यामुळे केसांवर नैसर्गिक चमक येते.

संशोधनानुसार जास्त वेळ पोटावर झोपल्यानं चेहऱ्याला नुकसान पोहोचतं. कॉटन ऐवजी सिल्क उशांचा वापर केल्यानंही सुरकुत्या येतात. म्हणून कॉटनच्या उशा वापरा. जर तुमच्या चेहऱ्यावर नेहमीच तणाव असेल आणि ओठ नेहमी फाटलेले दिसत असतील, तर तुम्हाला तुमच्या त्वचेला विश्रांती देण्याची गरज आहे. सुरकत्या दिसण्याचं मुख्य कारण म्हणजे सिगारेट आणि तंबाखूयुक्त पदार्थ. यात असलेले निकोटीन रक्तवाहिन्या आकुंचन करून रक्तप्रवाहात अडथळा आणतात. हे त्वचेतील ऑक्सिजनचा प्रवाह व्यवस्थित होऊ देत नाही. त्वचेचं नुकसान होतं. म्हणून चांगल्या त्वचेसाठी स्मोकींग करू नका.

Web Title: How to prevent wrinkles and fine lines : Simple ways to reduce premature skin aging

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.