Lokmat Sakhi >Beauty > केस पातळ झाले, सतत गळतात? केस धुण्याच्या ५ टिप्स; वाढ होईल भराभर-दाट होतील केस

केस पातळ झाले, सतत गळतात? केस धुण्याच्या ५ टिप्स; वाढ होईल भराभर-दाट होतील केस

How to Properly Wash Your Hair : कंडीशनर स्काल्पवर लावू नका. शॅम्पू वापरल्यानंतर तुम्ही कंडिशनर लावत असाल तर ते फक्त केसांच्या लांबीला लावा, अन्यथा केस कोरडे पडू शकतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2023 10:20 AM2023-08-18T10:20:30+5:302023-08-18T18:14:55+5:30

How to Properly Wash Your Hair : कंडीशनर स्काल्पवर लावू नका. शॅम्पू वापरल्यानंतर तुम्ही कंडिशनर लावत असाल तर ते फक्त केसांच्या लांबीला लावा, अन्यथा केस कोरडे पडू शकतात.

How to Properly Wash Your Hair : Best Hair Wash Tips To Wash Your Hair The Right Way | केस पातळ झाले, सतत गळतात? केस धुण्याच्या ५ टिप्स; वाढ होईल भराभर-दाट होतील केस

केस पातळ झाले, सतत गळतात? केस धुण्याच्या ५ टिप्स; वाढ होईल भराभर-दाट होतील केस

लांबसडक, दाट केस सौंदर्य वाढवण्यात महत्वाची भूमिका बजावतात. पण केस  सतत गळत राहिले तर टाळूवर केसांपेक्षा जास्त  स्काल्पची त्वचा दिसून येतो. (Hair Care Tips) वेळीच गळणाऱ्या केसांसाठी उपाय केले नाही तर टक्कल सुद्धा पडू शकतं. महिला असो किंवा पुरूष कोणत्याही वयात केस गळणं सुरू होतं. (How to grow hairs naturally) तुमचा आहार, हेअर केअर रुटीन, हिटींग टुल्सचा वापर, कोणता शॅम्पू वापरता याचा परिणाम केसांच्या वाढीवर होत असतो. (Best Hair Wash Tips To Wash Your Hair The Right Way) केसाचं गळणं थांबवण्यासाठी काही सोप्या टिप्स लक्षात ठेवायला हव्यात. (Hair Growth tips)

केस गळू नयेत म्हणून  केस धुताना काय काळजी घ्यायची (How to Properly Wash Your Hair)

१) केस धुण्याचा एखादा दिवस निवडून फक्त त्याच दिवशी केस धुणं टाळा.  केसांची गरज ओळखून केस धुवा. केस जर मळले असतील तर लवकर केस धुवा. जर केस खराब दिसत असतील प्रॉपर हेअर वॉश आठवणीने करा. जर स्काल्पवर धूळ बसली असेल तर केस जास्त दिवस तसेच ठेवू नका.

२) कांद्याचा रस केसांवर तुम्ही लावू शकता. यामुळे केस मजबूत होतात इतकंच नाही तर केसांच्या वाढीला वेग येतो. केसांची मूळं मजबूत होतात. 

३) कंडीशनर स्काल्पवर लावू नका. शॅम्पू वापरल्यानंतर तुम्ही कंडिशनर लावत असाल तर ते फक्त केसांच्या लांबीला लावा. अन्यथा केस कोरडे पडू शकतात.

४) झोपताना केस जास्त घट्ट बांधून ठेवू नका. यामुळे केस गळणं वाढू शकतं.  केस गळणं थांबवण्यासाठी आठवड्यातून एकदा केसांची तेलानं मसाज करा. यामुळे हेअर ग्रोथ चांगली होईल. नारळाचं तेल किंवा रोजमेरी तेल केसांवर लावू शकता. 

५) केस धुण्याच्या १ तास आधी न विसरता केसांना  तेल लावा. तुमचे केस लहान असतील तरी रोज केस धुणं टाळा.  आठवड्यातून एकदा किंवा २ वेळा केस धुवा.  केस जास्त गरम पाण्यानं धुणं टाळा यामुळे केसांच्या मुळांचं नुकसान होऊ शकतं. केस धुताना जोरजोरात रगडू नका. यामुळे स्काल्पचं नुकसान होऊ शकतं. आपल्या हेअर टाईपनुसार केसांसाठी उत्पादनांची निवड करा. तेलकट केसांवर कोरड्या केसांसाठी असलेले हेअर पॅक वापरू नका. 

Web Title: How to Properly Wash Your Hair : Best Hair Wash Tips To Wash Your Hair The Right Way

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.