हेअर फॉलची समस्या सर्वांनाच उद्भवते. खासकरून केस धुवायचे असतील किंवा केस विंचरायचे असतील तर जास्त टेंशन येतं कारण यामुळे केस जास्त गळतात. पावसाळ्याच्या दिवसांत केस गळणं खूपच कॉमन आहे. पण केस एकदा गळायला लागले की थांबायचं नावच घेत नाही. (Home remedies for hair growth) बाजारात मिळणाऱ्या केमिकल उत्पादनांऐवजी तुम्ही घरच्याघरी काही सोपे उपाय करून हेल्दी आणि मजबूत केस मिळवू शकता. हेअर फॉलची समस्या टाळण्यासाठी काही सोपे उपाय पाहूया. (Most amazing home remedy for long hairs and fast hair growth)
हेअर मास्क बनवण्याची योग्य पद्धत
एका वाटीत तांदळाचं पाणी घ्या. त्यात एक चमचा मध, एक चमचा एलोवेरा जेल आणि एक चमचा नारळांचे पाणी घाला. नंतर हे मिश्रण व्यवस्थित फेटून घ्या. तयार आहे हेअर मास्क. सगळ्यात आधी केसांचे दोन भाग करून घ्या. त्यानंतर कापसाच्या बोळ्याच्या मदतीने केसांच्या मूळांना हे मिश्रण लावा. नंतर हलक्या हाताने केसांची मसाज करा. नंतर उरलेला मास्क आपल्या केसांना व्यवस्थित लावून घ्या.
चेहऱ्यावर तेज नाही, डल-उदास-निस्तेज दिसतोय चेहरा? ४ सोपे उपाय, आठवड्यातभरात येईल चेहऱ्यावर चमक
लावल्यानंतर अर्ध्या तासासाठी तसंच ठेवा मग माईल्ड शॅम्पूने केस स्वच्छ धुवा. आठवड्यातून २ वेळा तुम्ही हे तेल केसांना लावले तर यामुळे हेअर फॉल नियंत्रणात राहील आणि केस वेगाने वाढण्यास मदत होईल. याशिवाय केस मजबूत आणि दाटही दिसतील. केसांमध्ये वेगळी चमक येईल.
घरी शॅम्पू बनवण्यासाठी तुम्हाला मूठभर रीठा, मूठभर सुका आवळा, मूठभर शिकेकाई, अर्धा कप जास्वंदाची पानं, अर्धा कप तुळशीची पानं आणि अर्धा कप एलोवेरा घ्या. शॅम्पू बनवण्यासाठी सगळ्यात आधी शिकेकाई, रिठा आणि आवळा रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. त्यानंतर हे भिजल्यानंतर हे पाणी थोडं लालसर होईल.
पार्लरसारखा Burgundy Color घरीच करा; फक्त १० रूपयांत केसांना मिळेल नवा-आकर्षक लूक
पाणी उकळण्यासाठी ठेवा. पाणी उकळून थंड झाल्यानंतर रिठा सोलून त्यातील पदार्थ काढा आणि सालं फेकून द्या. नंतर सर्व पदार्थांचे मिश्रण तयार करा. एकत्र ब्लेंडरमध्ये घालून दळून घ्या. गाळून कोणत्याही बॉटलमध्ये काढा. तयार आहे हर्बल शॅम्पू. हा शॅम्पू तुम्ही केस धुण्यासाठी सामान्य शॅम्पू प्रमाणे वापरू शकता. यामुळे स्काल्प व्यवस्थित स्वच्छ होईल आणि केसांवर चांगला रंग येईल.