Hair Care Tips While Sleeping : केसगळती आणि केस तुटण्याच्या समस्येने भरपूर महिला ग्रस्त असतात. अशात अनेक महिलांना प्रश्न पडतो की, रात्री झोपताना त्यांनी केस मोकळे सोडावे की बांधावे? जर केस लांब असतील आणि मोकळे करून झोपत असाल तर केस गुंतण्याचा, तुटण्याचा आणि रखरखीत होण्याचा धोका होऊ शकतो. तर केस बांधून झोपल्यानं डोक्याच्या त्वचेवर दबाव, कमी ब्लड सर्कुलेशन आणि केसांच्या वाढीवर प्रभाव पडतो. अशात केसांची काळजी कशी घ्यावी हे जाणून घेऊया.
केस मोकळे करून झोपा
केस मोकळे सोडून झोपल्याचे काही फायदे आणि नुकसान दोन्हीही आहेत. केस मोकळे सोडून झोपाल तर डोक्याच्या त्वचेला चांगली हवा लागते, ज्यामुळे डोक्याची त्वचा चांगली राहते. तसेच मोकळ्या केसांमुळे डोक्यात ब्लड सर्कुलेशन चांगलं होतं. ज्यामुळे केसांच्या मुळांना पोषण मिळतं आणि ते मजबूत बनतात. केस मोकळे ठेवले तर ते ताणले जात नाहीत. दुसरीकडे केस मोकळे करून झोपाल तर ते खूप गुंततात, मग ते सकाळी सरळ करण्यात खूप वेळ जातो. केस मोकळे करून झोपाल तर ते रखरखीत आणि निर्जीव होण्याचा व तुटण्याचाही धोका असतो.
केस बांधून झोपणे
रात्री केस बांधून झोपल्याचे सुद्धा काही फायदे आणि काही नुकसान आहेत. रात्री केस बांधून झोपल्यानं केस गुंतत नाहीत, तुटत नाहीत. केस बांधले असल्यानं एकमेकांवर जास्त घासले जात नाहीत. त्यामुळे ते गुंतत नाही आणि तुटतही नाहीत. वेणी घालून किंवा अंबाडा बांधून झोपल्यानं केस गुंतत नाही. तेच लहान वेणी किंवा अंबाडा बांधून झोपल्यानं केसांच्या मुळावर दबाव कमी पजतो. ज्यामुळे केसांची वाढही चांगली होते. मात्र, केस जास्त टाइट बांधाल तर डोक्याच्या त्वचेवर दबाव पडतो, ज्यामुळे केसगळतीची समस्या होते.
कसं झोपावं?
केस बांधून झोपण्याचे आणि केस मोकळे सोडून झोपण्याचे दोन्हींचे आपापले वेगवेगळे फायदे आहेत. केस बांधून झोपायचं की मोकळे सोडून हे तुमच्या केसांवर अवलंबून आहे. जर केस फार लांब नसतील तर ते मोकळे सोडूनच झोपू शकता. तेच जर केस लांब असतील तर ते बांधूनच झोपावे. असं केल्यास केस तुटणार नाहीत. जर तुम्हाला केस मोकळे सोडून झोपायचं असेल तर कॉटनऐवजी सिल्कच्या उशीचा वापर करावा. तसेच रात्री तुम्ही छोटी वेणी बांधून झोपू शकता.