उन्हाळ्यात त्वचेची विशेष काळजी घेणं आवश्यक असते. सूर्यप्रकाशामुळे त्वचेला अनेकदा त्रास होतो, ज्यामुळे त्वचेच्या रंगावर परिणाम होतो. तीव्र सूर्यप्रकाशामुळे त्वचा काळी पडते. उन्हापासून त्वचेचं संरक्षण करण्यासाठी सनस्क्रीन लावण्याचा नेहमीच सल्ला दिला जातो. जर तुमच्याकडे सनस्क्रीन नसेल तर काळजीचं काहीच कारण नाही. कारण एका सोप्या उपायाने तुम्ही त्वचेचं रक्षण करू शकता.
कॉटनचा स्कार्फ
उन्हात बाहेर पडण्यापूर्वी, तुमचा चेहरा कॉटनच्या स्कार्फने व्यवस्थित झाका. कॉटन स्कार्फ तुम्हाला केवळ उन्हापासून नाही तर प्रदूषणापासूनही वाचवेल. सनस्क्रीनऐवजी तुम्ही कॉटन स्कार्फ वापरू शकता.
करू नका ‘ही’ चूक
उन्हापासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी अनेकदा मुली कॉटनचा स्कार्फ वापरतात. चेहऱ्यावर स्कार्फ बांधल्यानंतर तो बॅगेत ठेवा. स्कार्फवरचा घाम सुकला तरी बॅक्टेरिया स्कार्फवरच राहतात, त्यामुळे दुसऱ्या दिवशी न धुता तो पुन्हा चेहऱ्यावर बांधल्याने त्वचेवर पिंपल्स येऊ शकतात. त्वचेचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे स्वच्छ धुतलेला कॉटनचा स्कार्फ वापरा.
दररोज स्वच्छ स्कार्फ वापरा
सूर्यप्रकाशापासून तसेच बॅक्टेरियापासून त्वचेचं संरक्षण करण्यासाठी दररोज स्वच्छ स्कार्फ वापरा. स्कार्फ बांधल्याने खूप घाम येतो, त्यामुळे चेहऱ्यावर घाणेरडा स्कार्फ बांधल्याने बॅक्टेरिया वाढू शकतात ज्यामुळे पिंपल्स येऊ शकतात.
कॉटन स्कार्फ वापरा
तुमच्या त्वचेचं उन्हापासून संरक्षण करण्यासाठी फक्त कॉटने स्कार्फ वापरा. कारण सुती कपड्यात कमी गरम होतं. सुती कापड मऊ असल्याने त्वचेवर कोणत्याही प्रकारची जळजळ होत नाही. त्वचेचं संरक्षण होतं.