Lokmat Sakhi >Beauty > फक्त ५ सवयी बदला, गळणारे केस आणि केसांच्या इतर समस्या होतील कायम दूर त्वचाविकारतज्ज्ञ सांगतात...

फक्त ५ सवयी बदला, गळणारे केस आणि केसांच्या इतर समस्या होतील कायम दूर त्वचाविकारतज्ज्ञ सांगतात...

5 Changes that can help prevent hair damage : केसांच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी डेली रुटीनमधल्या फक्त ५ गोष्टी बदलून पाहा, केस दिसतील सुंदर घनदाट...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2024 05:56 PM2024-08-03T17:56:24+5:302024-08-03T18:13:27+5:30

5 Changes that can help prevent hair damage : केसांच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी डेली रुटीनमधल्या फक्त ५ गोष्टी बदलून पाहा, केस दिसतील सुंदर घनदाट...

How to protect your hair from damage How to stop damaging your hair | फक्त ५ सवयी बदला, गळणारे केस आणि केसांच्या इतर समस्या होतील कायम दूर त्वचाविकारतज्ज्ञ सांगतात...

फक्त ५ सवयी बदला, गळणारे केस आणि केसांच्या इतर समस्या होतील कायम दूर त्वचाविकारतज्ज्ञ सांगतात...

घनदाट, जाड, मुलायम, मजबूत केस कोणाला नको असतात. आपले केस सुंदर, निरोगी असावेत अशी प्रत्येकाची इच्छा असते. परंतु जर चांगले केस हवे असतील तर केसांची काळजी घेणे देखील तेवढेच महत्वाचे असते. त्यासाठी केस आठवड्यातून दोन वेळा धुणे, केसांचा मसाज करणे आवश्यक आहे. काहीवेळा हे सर्व करूनही केस चांगले दिसत नाहीत अशी अनेकांची तक्रार असते. आपण सगळेच आपल्या केसांची खूप काळजी घेतो, परंतु काळजी घेताना आपण काही छोट्या चुका करतो. या लहान - सहान चुकांमुळेच केसांचे सौंदर्य व आरोग्य बिघडू शकते(5 Changes that can help prevent hair damage).


 
सध्याच्या बदलत्या लाइफस्टाइलमुळे केसांची काळजी घेण्यासाठी आपल्याला पुरेसा वेळ मिळत नाही. त्याचबरोबर आजकाल प्रत्येकजण केसांच्या कोणत्या ना कोणत्या समस्येने त्रस्त असतोच. या केसांच्या समस्यांवर आपण अनेक घरगुती किंवा आर्टिफिशियल उपाय करुन पाहतो. परंतु काहीवेळा या उपायांचा (5 Changes that can help prevent hair damage) केसांच्या समस्यांवर काही अंशी (How to stop damaging your hair) फरक पडतो. असे असले तरीही या समस्या पुरणपणे नाहीशा होत नाही. या सगळ्या समस्या दूर करुन केस सुंदर आणि निरोगी ठेवण्यासाठी केसांशीसंबंधित आपल्या रोजच्या ५ गोष्टींत थोडा बदल केला पाहिजे. या नेहमीच्या ५ गोष्टींत थोडाफार बदल केला तर केसांच्या सौंदर्यात आणि आरोग्यात अधिक भर पडते(How to protect your hair from damage).

चांगल्या केसांसाठी नेहमीच्या वापरातल्या कोणत्या ५ गोष्टी बदलाव्यात ?

१. उशीचे कव्हर :- रात्री झोपताना केसांचा व उशीच्या कव्हरचा संबंध येतो. शक्यतो आपण उशीला कॉटनचे कव्हर घालतो. परंतु या कॉटनच्या कव्हरसोबत केसांचे घर्षण होते. असे घर्षण वारंवार झाल्यामुळे केसांचे नुकसान होते. यामुळे केसांच्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. यासाठीच केसांच्या आरोग्याची होणारी हानी थांबवण्यासाठी उशीचे कव्हर बदलावे. उशीला कॉटनचे कव्हर घालण्याऐवजी आपण सिल्कच्या कव्हरचा वापर करावा. उशीला सिल्कचे कव्हर घातल्याने उशी कव्हर व केस यांमधील घर्षण कमी होते, परिमाणी केस तुटत नाहीत. यामुळे केसांच्या चांगल्या आरोग्यासाठी उशीचे कव्हर बदलणे गरजेचे आहे. 

२. हॉट ड्रायर :- केसांसाठी हॉट ड्रायरचा वापर करण्याऐवजी आपण कुल ड्रायरचा वापर करु शकता. केस धुतल्यानंतर ते वाळवण्यासाठी आपण शक्यतो ड्रायरचा वापर करतो. केसांसाठी हॉट ड्रायरचा वापर केल्यास त्यातून येणारी गरम हवा केसांसाठी हानिकारक असते. या गरम हवेमुळे केसांचे फार मोठे नुकसान होते. हेअर स्टाईल करताना केसांसाठी हॉट ड्रायरचा वापर करण्याऐवजी आपण कुल ड्रायरचा वापर करु शकता. 

केसांना मेहेंदी लावूनही सुंदर गडद रंग येत नाही? पाहा मेहेंदी भिजवण्याची योग्य पद्धत...

३. टॉवेल वापरु नका :- ओले केस पुसण्यासाठी टॉवेलचा वापर करण्याऐवजी आपण कॉटनच्या टीशर्टचा वापर करु शकता. टॉवेलच्या कापडाचे फायबर्स केसांना ड्राय बनवून केसांच्या मुळांना हानी पोहचवू शकतात. यासाठीच केसांसाठी टॉवेलचा वापर करण्याऐवजी आपण कॉटनच्या टीशर्टचा वापर करु शकता. 

४. प्लास्टिकचा कंगवा :- केस विंचरण्यासाठी प्लॅस्टिकच्या कंगव्याऐवजी लाकडाच्या कंगव्याचा वापर करावा. प्लास्टिकचा कंगवा हा केसांच्या सौंदर्य आणि आरोग्यासाठी हानिकारक असतो. याउलट लाकडाचा कंगवा वापरल्याने केस विंचरताना तुटत नाही. याचबरोबर केसांचे चांगले आरोग्य आणि सौंदर्य  टिकवून ठेवण्यासाठी प्लॅटिकचा कंगवा वापरणे शक्यतो टाळावे. 

हेअर ब्रशमध्ये अडकलेल्या केसांचा गुंता काढण्याची भन्नाट ट्रिक, ब्रश होईल क्लिन, केस विंचरताना गुंता होणार नाही.... 

५. गरम पाणी :- केस धुण्यासाठी गरम पाण्याचा वापर करणे टाळावे. केसांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी शक्यतो केस धुताना गरम पाण्याचा वापर करणे टाळावे. केसांसाठी गरम पाण्याचा वापर केल्यास केस हे गरम पाणी केसांना अधिकच ड्राय करते. यामुळे केसांचा पोत बिघडून केस गळतीची समस्या सुरु होते. केसांसाठी गरम पाण्याचा वापर करण्याऐवजी आपण कोमट किंवा गार पाणी वापरु शकतो.

Web Title: How to protect your hair from damage How to stop damaging your hair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.