सध्या सणवाराचे दिवस सुरु आहेत. सणवार म्हटलं की स्त्रिया आपली नटण्यामुरडण्याची हौस भागवून घेतात. प्रत्येक सणाला आपण छान दिसावं, चारचौघीत उठून दिसावं असं प्रत्येकीला वाटत असत. यासाठीच सणवार, एखादा खास प्रसंग, कार्यक्रम, समारंभ असले की आपण आवर्जून मेकअप करतो. मेकअप करताना आपण डोळे, ओठ सुंदर व आकर्षक दिसावेत याकडे अधिक लक्ष देतो. डोळ्यांच्या सुंदरतेसाठी आपण खास आय मेकअप करण्यावर जास्त भर देतो. डोळ्यांचा मेकअप करताना आपण आयशॅडो, आयलायनर, काजळ, मस्कारा अशा अनेक गोष्टींचा वापर करतो. याचबरोबर डोळे अगदी उठून दिसावेत तसेच अधिक रेखीव दिसावेत यासाठी काहीजणी डोळ्यांना आयलॅशेज लावतात(How to apply false eyelashes for beginners).
काहीजणींच्या डोळ्यांच्या पापण्या या खूपच पातळ असतात किंवा त्यांना भरपूर प्रमाणात दाट केस नसतात. अशावेळी आपल्या पापण्या जाड आणि घनदाट दिसाव्यात यासाठी काहीजणी आर्टिफिशियल आयलॅशेज लावतात. या आर्टिफिशियल आयलॅशेज लावताना काहीवेळा तारेवरची कसरत करावी लागते. या आर्टिफिशियल आयलॅशेज आपल्या पापण्यांवर व्यवस्थित चिकटून बसल्या तरच त्या छान दिसतात. कधी या आर्टिफिशियल आयलॅशेज आपल्या पापण्यांवर नीट चिकटून बसत नाही किंवा आपल्याला त्या नीट लावता येत नाही. अशावेळी या आर्टिफिशियल आयलॅशेज आपल्या पापण्यांवर कशा चिटकवून घ्यायच्या त्याची एक सोपी ट्रिक पाहूयात(How to Put on Fake Eyelashes in 6 Easy Steps).
आर्टिफिशियल आयलॅशेज पापण्यांवर लावताना...
१. आर्टिफिशियल आयलॅशेज पापण्यांवर लावण्याआधी आपल्या ओरिजनल पापण्यांना थोडेसे कर्ल करुन घ्यावे. पापण्यांना कर्ल करण्यासाठी आपण कर्ल करण्याच्या त्या छोट्याशा टूलचा वापर करु शकता.
२. त्यानंतर आर्टिफिशियल आयलॅशेज आपल्या पापण्यांवर ठेवून योग्य ते माप घ्यावे. आर्टिफिशियल आयलॅशेज आपल्या पापण्यांच्याच मापाची आहे की नाही याची आधी खात्री करून घ्यावी. जर आर्टिफिशियल आयलॅशेज खूप मोठी असेल तर आपल्या पापण्यांच्या मापानुसार जास्तीच्या आयलॅशेजचा भाग कापून घ्यावा.
३. आता आर्टिफिशियल आयलॅशेज पापण्यांवर चिटकवण्यासाठी त्याच्या सोबत जो ग्लू दिला जातो तो आर्टिफिशियल आयलॅशेजच्या कडेवर व्यवस्थित लावून घ्यावा.
चेहऱ्यावरचे पिंपल्स नखाने फोडताय? ही सवय सोडा नाहीतर चेहरा कायमचा होईल खराब कारण...
४. आर्टिफिशियल आयलॅशेजवर ग्लू लावल्यानंतर लगेच ते आपल्या पापण्यांवर चिटकवण्याची चूक करु नका. ग्लू लावल्यानंतर थोडा वेळ थांबून मगच आर्टिफिशियल आयलॅशेज आपल्या पापण्यांवर लावावे. आर्टिफिशियल आयलॅशेजवर ग्लू लावल्यानंतर त्या ग्लू चा पांढरा रंग जोपर्यंत पारदर्शक होत नाही तोपर्यंत आयलॅशेज पापण्यांवर लावू नये. आर्टिफिशियल आयलॅशेजवर ग्लू लावल्यानंतर थोड्या वेळाने त्या ग्लू ला हात लावल्याने चिकट किंवा एक प्रकारची तार निघाल्यानंतरच आयलॅशेज पापण्यांवर लावून घ्यावे.
५. आर्टिफिशियल आयलॅशेज पापण्यांवर लावताना आपले डोळे बंद करून किंवा खालच्या दिशेने झुकवून मगच या आयलॅशेज पापण्यांवर लावाव्यात.
६. सगळ्यात शेवटी ब्रशच्या मागच्या टोकाने हलकेच या आर्टिफिशियल आयलॅशेजवर दाब देऊन त्या पापण्यांवर व्यवस्थित स्टिक करुन घ्याव्यात.
अशाप्रकारे आपण या सोप्या ६ स्टेप्सचा वापर करून झटपट आर्टिफिशियल आयलॅशेज आपल्या पापण्यांवर लावू शकतो. या सोप्या ट्रिक्समुळे आर्टिफिशियल आयलॅशेज व्यवस्थित चिकटून राहतील आणि तुमचा स्पेशल लूक पूर्ण करेल.