Lokmat Sakhi >Beauty > डार्क सर्कल्स, डोळ्यांभोवती सुरकुत्या कमी करण्यासाठी सोपा उपाय हळदीचा मास्क...डोळे दिसतील सुंदर

डार्क सर्कल्स, डोळ्यांभोवती सुरकुत्या कमी करण्यासाठी सोपा उपाय हळदीचा मास्क...डोळे दिसतील सुंदर

Beauty Tips: डोळ्यांभोवती सुरकुत्या किंवा डार्क सर्कल्स (dark circles and wrinkles) वाढू लागले की आपोआपच सौंदर्य कमी झाल्यासारखे वाटते. म्हणूनच तर या दोन्ही समस्या कमी करण्यासाठी घरच्याघरी करून बघा हा सोपा उपाय.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2022 05:37 PM2022-08-10T17:37:00+5:302022-08-10T17:38:20+5:30

Beauty Tips: डोळ्यांभोवती सुरकुत्या किंवा डार्क सर्कल्स (dark circles and wrinkles) वाढू लागले की आपोआपच सौंदर्य कमी झाल्यासारखे वाटते. म्हणूनच तर या दोन्ही समस्या कमी करण्यासाठी घरच्याघरी करून बघा हा सोपा उपाय.

How to reduce dark circles and wrinkles, Home made turmeric pack for dark circle and wrinkles | डार्क सर्कल्स, डोळ्यांभोवती सुरकुत्या कमी करण्यासाठी सोपा उपाय हळदीचा मास्क...डोळे दिसतील सुंदर

डार्क सर्कल्स, डोळ्यांभोवती सुरकुत्या कमी करण्यासाठी सोपा उपाय हळदीचा मास्क...डोळे दिसतील सुंदर

Highlightsडार्कसर्कल्स आणि डोळ्यांच्या आजुबाजुला वाढत जाणाऱ्या अकाली सुरकुत्या या दोन्हींसाठी हा हळदीचा मास्क (turmeric mask) अतिशय उपयुक्त आहे.

प्रदुषण, आहारात पोषणमुल्ये कमी पडणं, स्ट्रेस, अशक्तपणा किंवा मग खूप धावपळ आणि दगदग यांचा परिणाम आपल्या तब्येतीवर होतो तसाच तो चेहऱ्यावरही दिसू लागतो. डोळ्यांभाेवती डार्क सर्कल्स (How to reduce dark circles and wrinkles) दिसू लागणं हा त्याच गोष्टींचा एक परिणाम. हे डार्क सर्कल्स कमी करण्यासाठी आहारात तर काही बदल कराच, पण त्यासोबतच हा एक घरगुती उपायही (Home made turmeric pack) करून पहा. या समस्येवर केमिकल्स असणारे कॉस्मेटिक्स लावण्यापेक्षा आहार आणि घरगुती उपाय हे दोन्ही अधिक परिणामकारक ठरतील. डार्कसर्कल्स आणि डोळ्यांच्या आजुबाजुला वाढत जाणाऱ्या अकाली सुरकुत्या या दोन्हींसाठी हा हळदीचा मास्क (turmeric mask) अतिशय उपयुक्त आहे.

 

हळदीचा मास्क तयार करण्यासाठी साहित्य
१. योगर्ट - १ टेबलस्पून, योगर्ट नसल्यास दही वापरले तरी चालेल. 
२. हळद- १ टीस्पून
३. मध- २ ते ३ थेंब

आलिया भट आणि सोनम कपूरचे स्मार्ट प्रेग्नन्सी लूक! ५ टिप्स, प्रेग्नन्सीतही दिसता येतं आकर्षक- ग्लॅमरस 
कसा लावायचा हळदीचा मास्क
- वरील तिन्ही पदार्थ एका बाऊलमध्ये घेऊन व्यवस्थित एकत्र करून घ्या. 
- हा मास्क आता हळूवारपणे तुमच्या डोळ्यांच्या भोवती लावा. मास्क लावल्यानंतर डोळ्यांची सारखी उघडझाप करू नका. डोळे बंद ठेवल्यास अधिक उत्तम. 
- १० मिनिटे तसाच राहू द्या आणि त्यानंतर थंड पाण्याने धुवून घ्या. 
- मास्क धुतल्यानंतर त्वचा हळूवार कोरडी करा आणि त्यावर लगेच हायड्रेटिंग क्रिम किंवा तुमचं नेहमीचं मॉईश्चरायझर लावून टाका. 

 

हळदीचा मास्क लावण्याचे फायदे
- हा मास्क लावल्याने डोळ्यांभोवतीच्या अकाली सुरकुत्या कमी होतात.
- डोळ्यांभोवती असणारे डार्क सर्कल्स कमी होण्यासाठी मदत होते.
- काही जणांच्या डोळ्यांभोवतीची त्वचा कायम सुजल्यासारखी दिसते. त्याला आपण बॅगी आईज म्हणतो. ही समस्या कमी करण्यासाठीही हा मास्क उपयोगी ठरतो.
- दही किंवा योगर्टमुळे पिगमेंटेशन कमी होऊन स्किनटोन इव्हन होण्यास मदत होते.
- मधामुळे काळवंडलेपणा कमी होऊन त्वचा चमकदार होते.  

 

हा उपायही करून बघा..
- डोळ्यांभोवतीची काळी वर्तूळे आणि सुरकुत्या कमी करण्यासाठी हा एक उपायही करता येईल.
- यासाठी बदामाचं तेल २ टीस्पून घ्या आणि त्यात चुटकीभर हळद टाका.
- हे मिश्रण डोळ्यांभोवती लावा आणि ३० मिनिटांसाठ राहू द्या.
- त्यानंतर थंड पाण्याने डोळे धुवून टाका.
- काळी वर्तूळे कमी होऊन तेथील त्वचा उजळण्यासाठी मदत होईल. 

 

Web Title: How to reduce dark circles and wrinkles, Home made turmeric pack for dark circle and wrinkles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.