Lokmat Sakhi >Beauty > 'या' कारणांमुळे गुडघे काळवंडून पायावरही काळे डाग दिसतात;बघा पिगमेंटेशन कमी करणारे २ उपाय

'या' कारणांमुळे गुडघे काळवंडून पायावरही काळे डाग दिसतात;बघा पिगमेंटेशन कमी करणारे २ उपाय

Beauty Tips For Pigmented Skin: तुमच्याही पायांवर ठिकठिकाणी काळे डाग दिसत असतील तर त्यामागची नेमकी कारणं काय ते पाहा..(how to reduce dark spots and pigmentation on legs and knee area ?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2024 05:55 PM2024-11-07T17:55:29+5:302024-11-07T17:56:26+5:30

Beauty Tips For Pigmented Skin: तुमच्याही पायांवर ठिकठिकाणी काळे डाग दिसत असतील तर त्यामागची नेमकी कारणं काय ते पाहा..(how to reduce dark spots and pigmentation on legs and knee area ?)

how to reduce dark spots and pigmentation on legs and knee area  | 'या' कारणांमुळे गुडघे काळवंडून पायावरही काळे डाग दिसतात;बघा पिगमेंटेशन कमी करणारे २ उपाय

'या' कारणांमुळे गुडघे काळवंडून पायावरही काळे डाग दिसतात;बघा पिगमेंटेशन कमी करणारे २ उपाय

Highlightsमासिक पाळी, प्रेग्नन्सी, मेनोपॉज या काळात शरीरात जे काही हार्मोनल बदल होतात. त्यामुळेही पायावर असे पिगमेंटेशन दिसून येते. 

आपण आपल्या सौंदर्याची व्यवस्थित काळजी घेतो. पण तरीही कुठे ना कुठे पायांकडे दुर्लक्ष होतंच. त्यातही तळपायाला जपतो पण उर्वरित पायाकडे मात्र एवढं काळजीपुर्वक लक्ष देणं होत नाही. बऱ्याच जणींच्या बाबतीत असं दिसून येतं की त्यांचे गुडघे खूपच जास्त काळे पडलेले असतात आणि गुडघ्याच्या खालच्या पायावर काळे डाग किंवा पिगमेंटेशन दिसून येतात. लहान मुलांचे गुडघे काळे असतील तर ते मातीत, जमिनीवर खेळतात. त्यामुळे त्यांचे गुडघे काळे होते. पण मोठ्यांच्या बाबतीत असा प्रश्न नसतोच. पण तरीही गुडघे आणि पाय यावर काळे डाग का दिसतात (Beauty Tips For Pigmented Skin), याविषयी बघा तज्ज्ञांनी दिलेली ही खास माहिती..(how to reduce dark spots and pigmentation on legs and knee area ?)

 

गुडघ्यांवर, पायावर पिगमेंटेशन का होते?

१. हेल्थशॉट यांनी दिलेल्या माहितीनुसार माॅलिक्युल जर्नलमध्ये याविषयी माहिती प्रकाशित करण्यात आली आहे. त्यात असं सांगण्यात आलं आहे की शरीराच्या त्या भागात मेलॅनिनची निर्मिती जास्त झाल्यामुळे असे डाग पडतात. त्या भागात जर काही किटक चावले असतील किंवा काही लागल्यामुळे, खरचटल्यामुळे जखम झाली असेल तर आपले शरीर त्या भागात मेलॅनिन जास्त प्रमाणात तयार करते. त्यामुळे असे काळे डाग दिसून येतात.

अचानक पाहुणे येणार- नाश्त्याला काय करावं सुचेना? झटपट होतील असे ५ पदार्थ- करा चटकदार मेन्यू..

२. International Journal of Molecular Sciences यांनी दिलेल्या माहितीनुसार पायाचा तो भाग प्रखर सुर्यप्रकाशात खूप जास्त वेळ राहात असेल तरीही अशा पद्धतीचे पिगमेंटेशन होऊ शकते.

३. मासिक पाळी, प्रेग्नन्सी, मेनोपॉज या काळात शरीरात जे काही हार्मोनल बदल होतात. त्यामुळेही पायावर असे पिगमेंटेशन दिसून येते. 

४. गुडघे आणि पायावरील पिगमेंटेशनसाठी अनुवंशिकता हे देखील एक कारण असल्याचं त्वचारोग तज्ज्ञ सांगतात.

 

गुडघे आणि पायावरील काळेपणा कमी करण्यासाठी उपाय 

त्वचारोग तज्ज्ञांकडे जाऊन त्यांच्या सल्ल्याने औषधोपचार करणे सगळ्यात उत्तम. पण ते लगेच शक्य नसेल तर हे काही घरगुती उपाय करून पाहू शकता. 

थंडी पडताच मनीप्लांटची पानं पिवळी पडली? 'हे' जादुई पाणी द्या, हिरवागार होऊन भराभर वाढेल

१. काेरफडीच्या गरामध्ये थोडा लिंबाचा रस टाका आणि त्याने पायाला मसाज करा. १५ ते २० मिनिटांनंतर पाय धुवून टाका. आठवड्यातून एकदा हा उपाय करावा.

२. बटाट्याचा रस हा नॅचरल ब्लिचिंग एजंट म्हणून ओळखला जातो. आठवड्यातून एक- दोन वेळा बटाट्याचा रस पायाला लावून मसाज करा. 

 

Web Title: how to reduce dark spots and pigmentation on legs and knee area 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.