Join us

चेहऱ्यावरचे केस खूपच विचित्र दिसतात? तज्ज्ञ सांगतात ५ उपाय, रेझर न लावता सहज केस निघतील

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2024 17:47 IST

How To Reduce Fecial Hairs 5 Effective Ways :

हात किंवा पायांवर केस वाढणं हे नॉर्मल आहे. पण जर मुलींच्या चेहऱ्यावर केस वाढले तर ते खूपच विचित्र दिसते. चेहऱ्याबरोबरच नाभी आणि छातीच्या आजूबाजूलाही जास्त केस येऊ  लागतात. (Hair Care Tips) ज्यांचे हाय डिटिएच म्हणजेच डायहायड्रोजस्टेस्टोरोन  लेव्हल जास्त असते त्यांना हर्सुटिज्म होऊ शकते. हर्सुटिज्म एक अशी स्थिती आहे ज्यात शरीरात अत्याधिक केस वाढू लागतात (How To Reduce Fecial Hairs) . महिलांची ही समस्या सोडवण्यासाठी डायटिशियन मनप्रीत कालरा यांनी ५ असरदार उपाय सांगितले आहेत.  जे फॉलो केल्यानं चेहऱ्यावरचे नको असलेले केस काढून टाकणं सोपं होईल. (5 Effective Ways Suggested By Dietitian Manpreet Kalra)

२ प्रकारचे  पाणी पिऊन दिवसाची सुरूवात करा

डॉक्टर मनप्रीत सांगतात  की तुम्ही दिवसाची सुरूवात मेथीच्या दाण्यांचे पाणी पिऊन करू शकता. ज्यामुळे फेशियल हेअर ग्रोथ कमी होते. याशिवाय पुदीन्याचा चहा महिलांसाठी फायदेशीर ठरतो ज्यांना पीसीओएस आणि हर्सुटिज्म आहे. यामुळे टेस्टॉस्टेरॉन लेव्हल कमी होण्यास मदत होते. 

स्पेअर मिंट ऑईल

पुदिन्याच्या तेलाला स्पेअर मिंट ऑईल असं म्हटलं जातं. याचा वापर चेहऱ्यावर केल्यानं एंड्रोजन लेव्हल आणि फेशियल हेअर ग्रोथ कमी होण्यास मदत होते. या व्यतिरिक्त कॉस्मेटिक्समध्येही याचा वापर केला जातो. एंटीऑक्सिडेट्सनी परीपूर्ण  तेल हॉर्मोनल बॅलेन्स कमी करण्यास मदत करते. 

दालचिनी

दालचीनी आरोग्यासाठी बरीच फायदेशीर ठरते. तुम्ही  दालचिनीचे पाणी प्यायल्यास इंसुलिन  सेंसिटिव्हीटी सुधारते आणि इंड्रोजन लेव्हल कमी करण्यास मदत होते.  ज्यामुळे शरीराच्या इतर भागांवर केस कमी  येतात.

या बियांचे सेवन करा

 फेशियल हेअर ग्रोथ कमी होते. मूग डाळीचे पदार्थ किंवा काळ्या वाटाण्यासारख्या प्रोटीन रिच पदार्थांचा  आहारात समावेश करा. 

रताळे खा

टेस्टोस्टेरॉनला डिएचटी म्हणजे हायहायड्रोटेस्टोस्टेरॉनमध्ये बदलण्यापासून रोखता येते. तुम्ही व्हिटामीन बी ६ युक्त पदार्थ जसं की रताळे, चणे, कोकोआ यांसारख्या पदार्थांचे सेवन करू शकता. याशिवाय संध्याकाळी चेस्टबेरी  टी पिण्याची सवय ठेवा. यामुळे मासिक पाळीची सायकल रेग्युरेट होऊन एंड्रोजन लेव्हल कमी होण्यास मदत होईल

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी