जसजस आपलं वय वाढत जात तसे हळूहळू आपल्याला शारीरिक व्याधी आणि आपल्या शरीराच्या ठेवणीत आतून - बाहेरुन बराच बदल होताना दिसतो. वय वाढत जाऊन वृद्धत्व येणं ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. या नैसर्गिक प्रक्रियेला कोणीच थांबवू शकत नाही. वय वाढते तसतसे अनेक समस्यांमुळे त्वचा गळायला लागते किंवा लूज पडते. आपल्या चेहऱ्यावर बारीक रेषा, पिंपल्स, काळी वर्तुळे यांसारखी वृद्धत्वाची लक्षणे हळूहळू दिसू लागतात. अशा परिस्थिती त्वचेची लवचिकता कमी होऊन ती ढिली पडू लागते. त्वचा लूज पडण्याच्या या समस्येची वेळीच काळजी घेतली नाही तर त्वचेच्या अनेक गंभीर समस्यांना सामोरे जावे लागते.
वयानुसार आपला शरीराच्या आणि चेहेऱ्याच्या त्वचेत प्रामुख्याने मोठे बदल होताना दिसतात. चेहेऱ्याचा रंग बदलण्यापासून ते त्वचेचा पोत खराब होईपर्यंत वेगवेगळा समस्या येऊ शकतात. चेहेऱ्यावर फ्रॉन लाईन्स दिसणे ही त्यापैकीच एक मोठी समस्या आहे. कपाळावर दोन भुवयांच्या मध्ये फ्रॉन लाईन्स (Frown lines) येण्याची वेगवेगळी कारण आहेत. फ्रॉन लाईन्स (Frown lines) म्हणजे नेमकं काय ? या फ्रॉन लाईन्स कोणत्या कारणांमुळे येतात ? त्या येऊ नयेत म्हणून काय काय उपाय करता येऊ शकतात, याबद्दल अधिक माहिती लक्षात घेऊयात(How to reduce frown lines Wrinkly forehead getting you down?).
फ्रॉन लाईन्स (Frown lines) म्हणजे नेमकं काय ?
कपाळावर दोन भुवयांच्यामध्ये पडणाऱ्या दोन उभ्या रेषांना फ्रॉन लाईन्स (Frown lines) असे म्हटले जाते. फ्रॉन लाईन्सना (Frown lines) चिंता रेखा असे देखील म्हटले जाते. फ्रॉन लाईन्स या अशा दोन उभ्या रेषा आहेत ज्या आपल्या दोन्ही भुवयांच्या बरोबर मधोमध तयार होताना दिसतात. कपाळावर भुवयांच्या मध्ये ११ च्या आकारात बनवलेल्या या रेषा दिसू शकतात . याशिवाय या रेषा कपाळावरही दिसतात आणि हसताना तोंडाच्या दोन्ही कोपऱ्यांवर वक्र म्हणजेच इंग्रजी C च्या आकारात दिसतात. खरं तर, वृद्धत्वासह, त्वचेची लवचिकता कमी होणे आणि कोलेजनचे जास्त नुकसान होणे यामुळे फ्रॉन लाईन्स होऊ शकतात.
फेशियल नेमके किती दिवसांनी करायला हवे? महिन्यातून एकदा केले तर त्वचेला खरंच फायदा होतो?
चेहेऱ्यावर फ्रॉन लाईन्स (Frown lines) येण्याची नेमकी कारण कोणती?
१. वाढते वय :- चेहेऱ्यावर फ्रॉन लाईन्स (Frown lines) येण्याच्या कारणांपैकी वाढते वय हे एक प्रमुख कारण आहे.यानुसार त्वचेची लवचिकता कमी होऊ लागते. तसेच, चेहऱ्यावरील हावभावांमुळे स्नायूंची वारंवार हालचाल त्वचेला त्याच्या मूळ आकारात परत येऊ देत नाही.
२. जास्त काळ सूर्यप्रकाशाच्या संपर्कात येणे :- आपली त्वचा जास्त काळ सूर्यप्रकाशाच्या संपर्कात राहिल्याने चेहेऱ्यावर फ्रॉन लाईन्स (Frown lines) येण्याची शक्यता अधिक असते. सूर्याची युवी किरणे आपल्या त्वचेमधील इलास्टिन आणि कोलेजन यांची पातळी कमी करते. यामुळे जास्त काळ सूर्यप्रकाशाच्या संपर्कात राहिल्यामुळे आपल्या चेहेऱ्यावर फ्रॉन लाईन्स दिसू लागतात.
मेहेंदी लावताय की केमिकल लावताय केसांना? पाहा घरी ‘कशी’ भिजवायची मेहेंदी-केस काळेभोर...
३. सतत धूम्रपान करणे :- नियमितपणे धुम्रपान केल्याने तुमच्या ओठांच्या कोपऱ्यात फ्रॉन लाईन्स तयार होऊ शकतात. याव्यतिरिक्त, धूम्रपानामुळे रक्तवाहिन्या देखील आकुंचन पावतात. परिणामी, ऊतींमध्ये कमी ऑक्सिजन वाहू लागतो, ज्यामुळे त्वचेची लवचिकता कमी होते.
४. आनुवंशिकता :- तुमची त्वचा तिचा मूळ आकार टिकवून ठेवू शकते की फ्रॉन लाईन्स (Frown lines) विकसित करण्यास मदत करेल हे ठरवण्यात तुमचा डीएनए महत्त्वाची भूमिका बजावतो.
कोरफड म्हणजे उन्हाळ्यात वरदान, ७ प्रकारे कोरफड वापरा- उन्हामुळे होणारे त्रास होतील पटकन कमी...
अशी घ्या त्वचेची काळजी :-
१. त्वचेची लवचिकता टिकवून ठेवण्यासाठी आपली त्वचा नेहमी हायड्रेट ठेवणे महत्वाचे आहे. भरपूर पाणी प्यावे आणि सकस आहार घ्यावा. जर तुम्ही शाकाहारी असाल तर तुमच्या आहारात ओमेगा-३ फॅटी अॅसिड सप्लिमेंट्स जसे की फ्लेक्ससीड ऑइलचा समावेश करावा.
२. भर उन्हात बाहेर पडताना त्वचेला सनस्क्रीन लावण्यास विसरु नका. याशिवाय, आपण सनग्लासेस देखील घालणे आवश्यक आहे जेणेकरुन अतिनील किरणांपासून डोळ्यांचे संरक्षण केले जाऊ शकते.
३. झोपेच्या बाबतीत कोणत्याही प्रकारची तडजोड करू नका. दररोज रात्री पुरेशी झोप घेणे महत्वाचे आहे. झोपताना तुमची पाठ जमिनीला स्पर्श करेल अशा अवस्थेत झोपा. जर तुम्ही पाठीवर न झोपता चेहेऱ्याची बाजू जमिनीला स्पर्श करुन झोपायची सवय लावलात तर त्वचेची लवचिकता कमी होऊ शकते.
४. त्वचेवर रेटिनॉल सीरमचा वापर करा. यामुळे चेहऱ्यावर तयार होणाऱ्या बारीक रेषा कमी होतात. कोलेजनचे प्रमाण वाढू लागते परिणामी त्वचेत लवचिकता टिकून रहाते.
५. क्लींजिंग, एक्सफोलिएटिंग आणि मॉइश्चरायझिंग करून तुम्ही फ्रॉन लाईन्स (Frown lines) समस्या कमी करू शकता. जेव्हा तुम्ही या तिन्ही पद्धतीने आपली त्वचा स्वच्छ करता तेव्हा त्वचेतील विषारी पदार्थ सहजपणे बाहेर काढून टाकले जातात. एक्सफोलिएशन प्रक्रिया त्वचेला चमकदार बनवते आणि कोरड्या व निर्जीव त्वचेसाठी मॉइश्चरायझिंग करणे हे सर्वात महत्वाचे आहे. यामुळे चेहेऱ्यावरील वृद्धत्व आणि सुरकुत्यांची समस्या टाळता येते.