Join us  

धुतल्यावर तुमचेही केस जरा जास्तच गळतात का? शाम्पूमध्ये ३ गोष्टी मिसळून लावा, केस गळणं थांबेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2024 4:56 PM

 Tips To Reduce Hair Fall While Shampooing: केस धुतल्यानंतर जरा जास्तच गळतात असा तुमचाही अनुभव असेल तर एकदा हा एक सोपा उपाय करून पाहा..(how to reduce hair fall after hair wash)

ठळक मुद्देतुमच्या नेहमीच्या शाम्पूमध्ये जर तुम्ही काही पदार्थ मिसळले आणि त्यानंतर केस धुतले तर केस गळण्याचं प्रमाण नक्कीच कमी होऊ शकतं.

बऱ्याच जणींना असा अनुभव येतो की केस धुतल्यानंतर ते जरा जास्तच गळतात. अगदी केस पुसताना कितीतरी केस टॉवेलला चिकटलेले दिसतात. शिवाय बाथरुममध्येही सगळीकडे केसच केस दिसतात. एवढंच नाही तर केसांमधून अलगद कंगवा किंवा हात फिरवला तरी ८- १० केस गळून पडलेले दिसतात (Tips To Reduce Hair Fall While Shampooing). असा तुमचाही अनुभव असेल तर लगेचच हे काही सोपे उपाय करून पाहा (best home remedies to control hair loss). तुमच्या नेहमीच्या शाम्पूमध्ये जर तुम्ही काही पदार्थ मिसळले आणि त्यानंतर केस धुतले तर केस गळण्याचं प्रमाण नक्कीच कमी होऊ शकतं.(how to reduce hair fall after hair wash?)

 

केस धुतल्यानंतर खूपच गळत असतील तर उपाय

केस गळू नये म्हणून ते धुताना नेमकी कशी काळजी घ्यावी, याविषयी माहिती सांगणारा व्हिडिओ swaminitips या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. 

रोज सकाळी चेहऱ्याला लावा 'या' पद्धतीने तयार केलेलं राईस वॉटर- दिवाळीपर्यंत पिगमेंटेशन गायब

१. शाम्पू केल्यानंतर केस जर जास्तच रफ किंवा कोरडे झाल्यासारखे वाटत असतील तर हा उपाय करून पाहा. यासाठी तुम्ही नेहमी केस धुण्यासाठी जेवढा शाम्पू घेता तेवढाच शाम्पू मगमध्ये घ्या. त्यामध्ये तेवढ्याच प्रमाणात कोरफडीच्या गराची पेस्ट घाला. त्यामध्ये १ टीस्पून ग्लिसरीन आणि थोडं पाणी घाला. हे सगळे पदार्थ व्यवस्थित कालवून घ्या आणि त्याने केस धुवा. धुतल्यानंतर केस गळणं कमी होईल. शिवाय केस खूपच मऊ, सिल्की होतील.

 

२. केस धुण्यासाठी जेव्हा तुम्ही मगमध्ये शाम्पू घ्याल तेव्हा त्यात थोडी साखर आणि थोडं पाणी टाका.

कांदा भजी तर नेहमीच खाता! कांद्याचे कुरकुरीत 'रिंग' खाऊन पाहा- झटपट होणारी सोपी रेसिपी 

सगळं मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या आणि त्याने केस धुवा. काही दिवस नियमितपणे हा उपाय केल्यास केस गळणं बऱ्याच प्रमाणात कमी झालेलं दिसेल.

 

३. केस खूप जास्त गळत असतील तर एक टेबलस्पून मेथी दाणे रात्रभर पाण्यात भिजत ठेवा.

दिवाळीत 'ही' फुलं वापरून करा सुंदर फ्लॉवर डेकोरेशन, ५ आकर्षक डिझाईन्स- घरभर दरवळेल फुलांचा सुगंध

दुसऱ्यादिवशी भिजवलेले मेथी दाणे, लहान आकाराचा कांदा आणि विड्याचं एक पान मिक्सरमधे फिरवून त्याची पेस्ट करा. ही पेस्ट तुमच्या नेहमीच्या शाम्पूमध्ये मिसळा आणि त्याने केस धुवा. काही दिवसांत केस गळण्याचं प्रमाण बरंच कमी झाल्याचं दिसेल. 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजीहोम रेमेडी