Join us  

केस गळणं कमी करणारा सोपा उपाय; केस होतील घनदाट- वाढतील भरभर, प्रश्न सुटेल कायमचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2024 6:14 PM

Home Remedies For Reducing Hair Loss: केस खूप गळत असतील तर हा एक अगदी सोपा उपाय करून पाहा...

ठळक मुद्देडोक्याच्या त्वचेला योग्य पोषण मिळेल असे काही उपाय केले पाहिजेत. जेणेकरून केस गळण्याच्या समस्येवर अचूक उपचार होऊ शकतील.

केस गळण्याची समस्या खूपच वाढली आहे. वाढतं प्रदुषण, केमिकल्सचा वापर अशी सगळी कारणं त्यामागे आहेतच. डोक्याच्या त्वचेला म्हणजेच स्काल्पला पुरेसं पोषण मिळालं नाही, तर त्यातून केसांना याेग्य प्रमाणात रक्तपुरवठा होत नाही. त्यामुळे मग केस खूप गळायला लागतात ( hair loss treatment at home). म्हणूनच आपण डोक्याच्या त्वचेला योग्य पोषण मिळेल असे काही उपाय केले पाहिजेत (Home remedies for reducing hair loss). जेणेकरून केस गळण्याच्या समस्येवर अचूक उपचार होऊ शकतील. त्यासाठी हे काही उपाय करून पाहा (How to reduce hair fall)..

केस गळणं कमी करण्यासाठी उपाय

 

केस गळणं कमी करण्यासाठी नेमके काय उपाय करावेत याची माहिती anandkrishnathakurji या पेजवर शेअर करण्यात आली आहे. त्यामध्ये सांगण्यात आलेला सगळ्यात पहिला उपाय म्हणजे लिंबाचा रस आणि नारळाचं तेल. जेवढा लिंबाचा रस घेतला असेल त्याच्या दुप्पट प्रमाणात नारळाचं तेल घ्या. हे मिश्रण एकत्र करा आणि केसांच्या मुळाशी लावा. साधारण अर्धा ते पाऊण तासाने केस धुवून टाका. हा उपाय आठवड्यातून एकदा करावा. केस गळणं कमी होईल. लिंबामध्ये ॲण्टी फंगल, ॲण्टी बॅक्टेरियल घटक असतात जे स्काल्पला असलेले बॅक्टेरिया, फंगस नष्ट करतात. लिंबाच्या रसामुळे केसांतला कोंडा कमी होण्यास मदत होते. 

हा उपायही करून पाहा

 

केस गळणं कमी करण्यासाठी प्राजक्ताच्या किंवा पारिजातकाच्या फुलांच्या बिया उपयुक्त ठरतात, अशी माहितीही या व्हिडिओमध्ये दिली आहे. यासाठी प्राजक्ताच्या बिया कुटून त्याची पावडर करून घ्या आणि त्याचा लेप करा. हा लेप ज्या भागात टक्कल पडले आहे, त्याठिकाणी लावा आणि काही वेळाने धुवून टाका. यामुळेही केसांचं गळणं लगेचच कमी होईल. हा उपायही आठवड्यातून एकदा करावा. 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सहोम रेमेडीकेसांची काळजी