उन्हाळ्याच्या दिवसात केसांमध्ये घाम जमा होऊन खाज येण्याची समस्या उद्भवते. घामामुळे केसांमध्ये पुळ्या येतात आणि केस वेळोवेळी धुणं, तेल लावणं केस विंचरणं याकडे लक्ष न दिल्यानं केस जास्त गळतात. केस गळणं ही सामान्य समस्या आहे पण जर प्रमाणापेक्षा जास्त केस गळत असतील तर हे चिंतेचं कारण असू शकतं. (How to reduce hair fall naturally)
या दिवसात स्काल्पमधून तेलाचा स्त्राव जास्त होतो आणि केस कमकुवत होतात. केसांमध्ये धूळ-माती जास्त प्रमाणात जमा होते. अशात काही घरगुती उपाय केस गळणं कमी करण्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. सौदर्यं तज्ज्ञ मोनिका राणा यांनी हर जिंदगीशी बोलताना केस गळणं कमी करण्याबाबत काही सोपे उपाय सांगितले आहेत. (Amla and curd hair mask to control hair fall)
या समस्येवर उपाय म्हणून आवळा आणि दह्याचा हेअर मास्क लावू शकता. हेअर मास्क जवळपास २ महिने लावल्यानं फरक जाणवतो. आवळ्यात अनेक औषधी गुणधर्म असतात. यामुळे केसांची सुंदरता वाढण्यास मदत होते. याशिवाय केस गळणंही कमी होतं. आवळा केसांची शाईन वाढवतो आणि डॅड्रफची समस्या दूर करतो. याचा वापर करून तुम्ही सुंदर केस मिळवू शकता. दही केसांचा कोरडेपणा कमी करण्यास मदत करते. यामुळे केसांची शाईन वाढते. याचा वापर करून तुम्ही केस गळणं कमी करू शकता. यामुळे केसांना फाटे फुटण्याची समस्या दूर होईल.
आवळा आणि दह्याचा मास्क
केस गळण्याची समस्या टाळण्यासाठी आवळा आणि दहयाचा वापर करू शकता. हेअर मास्क बनवण्याची सोपी पद्धत पाहूया. आवळा आणि दह्याचा मास्क बनवण्यासाठी सगळ्यात आधी आवळा मिस्करला वाटून घ्या आणि एका काचेच्या बाऊलमध्ये घाला. आवळ्याच्या पेस्टमध्ये दही मिसळून व्यवस्थित एकजीव करा. हा हेअरमास्क लावताना केसांमध्ये तेल असू नये. हेअर मास्क लावल्यानंतर शॉव्हर कॅपनं डोकं झाका.
कमीत कमी १५ मिनिटं केसांवर मास्क लावून ठेवा. १५ मिनिटांनी केस पाण्यानं स्वच्छ धुवा आणि शॅम्पूचा वापर करा. आवळा आणि दह्याच्या हेअर मास्कनं केसांची चमक वाढते यातील पोषक तत्व केसांना मुळापासून मजबूत बनवतात. याशिवाय केस गळणंही कमी करतात. केसांमध्ये वारंवार कोंडा जमा होत नाही.