Lokmat Sakhi >Beauty > ओठांभोवती पिगमेंटेशन होऊन त्वचा काळवंडली? चेहरा धुतल्यानंतर लावा २ गोष्टी- डाग निघून जातील 

ओठांभोवती पिगमेंटेशन होऊन त्वचा काळवंडली? चेहरा धुतल्यानंतर लावा २ गोष्टी- डाग निघून जातील 

Skin Care Tips: बऱ्याच जणांची ओठांभोवतीची त्वचा काळवंडलेली असते. त्या भागातलं पिगमेंटेशन कमी करण्यासाठी हे काही उपाय करून पाहा...(2 simple remedies to get rid of pigmented skin)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2024 08:49 AM2024-08-01T08:49:08+5:302024-08-01T08:50:46+5:30

Skin Care Tips: बऱ्याच जणांची ओठांभोवतीची त्वचा काळवंडलेली असते. त्या भागातलं पिगमेंटेशन कमी करण्यासाठी हे काही उपाय करून पाहा...(2 simple remedies to get rid of pigmented skin)

how to reduce pigmentation around lips, 2 simple remedies to get rid of pigmented skin | ओठांभोवती पिगमेंटेशन होऊन त्वचा काळवंडली? चेहरा धुतल्यानंतर लावा २ गोष्टी- डाग निघून जातील 

ओठांभोवती पिगमेंटेशन होऊन त्वचा काळवंडली? चेहरा धुतल्यानंतर लावा २ गोष्टी- डाग निघून जातील 

Highlightsही समस्या कशी कमी करावी आणि त्यासाठी आपलं रोजचं स्किन केअर रुटीन कसं असावं, याविषयीची ही माहिती एकदा बघा..

रोजच्यारोज त्वचेची काळजी घेण्यासाठी आपण कुठेतरी कमी पडतो. कारण आपल्या रोजच्या कामांमध्येच आपण एवढे अडकून गेलेलो असतो की त्या धावपळीत त्वचेची काळजी घेण्यासाठी पुरेसा वेळच नसतो. मग काही दिवसांनी वयाचा एक विशिष्ट टप्पा ओलांडला की त्याचे परिणाम त्वचेवर दिसू लागतात. पिगमेंटेशन हा त्यातलाच एक प्रकार. साधारण पस्तिशीच्या पुढच्या बऱ्याच जणींच्या ओठांभोवतीचा भाग पिगमेंटेशन होऊन काळवंडतो आणि चेहरा खूपच विद्रुप दिसू लागतो (how to reduce pigmentation around lips). ही समस्या कशी कमी करावी आणि त्यासाठी आपलं रोजचं स्किन केअर रुटीन कसं असावं, याविषयीची ही माहिती एकदा बघा..(2 simple remedies to get rid of pigmented skin)

 

ओठांभोवतीचं पिगमेंटेशन कसं कमी करावं?

ओठांच्या आसपासची काळवंडलेली त्वचा पुन्हा नितळ कशी करावी, ते डाग कमी करण्यासाठी काय उपाय करावेत, याविषयीचा एक व्हिडिओ rohitsachdeva1 या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. यामध्ये २ गोष्टी प्रामुख्याने सांगण्यात आल्या आहेत. त्या कोणत्या ते पाहूया..

पोट डब्ब होतं, नीट साफ होत नाही? १५ दिवस फक्त ५ व्यायाम करा, त्रास होईल कमी

१. पहिली गोष्ट म्हणजे दररोज सकाळी चेहरा धुतल्यानंतर त्यावर आठवणीने व्हिटॅमिन सी असणारं सिरम लावा. सिरम सुकल्यानंतर चेहऱ्याला मॉईश्चरायझर लावा. त्यानंतर बाहेर जाण्याआधी २० मिनिटे चेहऱ्याला सनस्क्रिन लोशन लावा. कुठे बाहेर जाणार नसाल तरीही चेहऱ्याला सनस्क्रिन लावणं गरजेचं आहे. दररोज सकाळी या गोष्टी आठवणीने कराच.

 

२. त्यानंतर दररोज रात्री झोपण्यापुर्वी चेहरा स्वच्छ धुवा. चेहरा धुतल्यानंतर त्यावर ट्रानेक्झानिक ॲसिड, अल्फा अर्बुटीन, कॉजिक ॲसिड हे घटक असणारं ट्रिटमेंट सेरम लावा.

मुकामार लागल्यास बर्फ लावावा की गरम पाण्याच्या पिशीवीनं शेकावं? डॉक्टर सांगतात ६ सोप्या गोष्टी

यानंतर अंडरआय क्रिम आणि त्यानंतर एखादं स्किन ब्राईटनिंग नाईट क्रिम लावा. हा उपाय तुम्ही सलग १५ दिवस केल्यास ओठांभाेवतीचे तसेच चेहऱ्यावर इतर ठिकाणी असणारे पिगमेंटेशन नक्कीच कमी होतील. 


 

Web Title: how to reduce pigmentation around lips, 2 simple remedies to get rid of pigmented skin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.