Join us  

सुरकुत्यांमुळे चेहरा वयस्कर दिसतोय? ५ टिप्स, बारीक लाईन्स-सुरकुत्या अजिबात येणार नाहीत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2023 1:30 PM

How to reduce wrinkles: रोजच्या आयुष्यात काही बदल करून तुम्ही त्वचेची काळजी घेऊ शकता.  त्वचा हेल्दी ठेवण्यासाठी योग्य पोषण मिळणं गरजेचं असतं.

आजकाल अनहेल्दी पदार्थ खाल्ल्यामुळे चेहऱ्यावर याचा परीणाम दिसू लागतो. तरूणपणातच काही लोकांच्या चेहऱ्यावर सुरकुत्या दिसायला सुरूवात होते.  यामुळे लोक कमी वयातच वयस्कर दिसतात. (Easy And Effective Facial Tips For Wrinkles) चेहरा वयस्कर दिसू लागला की लोकांचा आत्मविश्वासही कमी होतो. (How to reduce wrinkles)

रोजच्या आयुष्यात काही बदल करून तुम्ही त्वचेची काळजी घेऊ शकता.  त्वचा हेल्दी ठेवण्यासाठी योग्य पोषण मिळणं गरजेचं असतं. आपल्या आहारात  हिरव्या भाज्या, ताजी फळं, दही आणि सॅलेडचे सेवन करा. नियमित डाएट घेतल्यानं चेहऱ्यावरच्या सुरकुत्या कमी होण्यास मदत होते.(Facial Exercises To Reduce Wrinkles)

सनस्क्रीनचा वापर

चेहऱ्याची त्वचा कोरडी आणि निर्जीव होण्यापासून वाचवण्याचा तुमचा प्रयत्न असायला हवा. यासाठी दिवसातून दोनदा चेहरा स्वच्छ करा आणि असे उत्पादन लावा जेणेकरून त्वचेतील ओलावा नाहीसा होणार नाही. फक्त सौम्य क्लींजरने चेहरा स्वच्छ करा. बाहेर जास्त सूर्यप्रकाश असल्यास छत्री किंवा सनस्क्रीन वापरा.

टेंशन कमी होते

आपले जीवन तणावपूर्ण असू शकते. कारण प्रत्येकाकडे आर्थिक, कौटुंबिक आणि कामाशी संबंधित समस्यांची कमतरता नाही. तणावामुळे, शरीरात कॉर्टिसोल हार्मोन जास्त प्रमाणात तयार होतो, हा हार्मोन कोलेजन तोडण्यास सुरवात करतो, जे त्वचेसाठी चांगले नाही. कारण कोलेजन आपली त्वचा चमकदार बनविण्यास मदत करते.

रात्री व्यवस्थित झोप घ्या

व्यक्तीने दिवसातून किमान 8 तास झोपले पाहिजे, जर तुम्ही कमी झोपलात तर तुमचा चेहरा थकलेला दिसतो आणि मग तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या येऊ लागतात. तुकड्यांमध्ये न झोपण्याचा प्रयत्न करा.  रात्री 8 तास सतत झोपा. असे केल्याने आपली त्वचा तजेलदार होईल आणि सुरकुत्या हळूहळू निघून जातील.

नारळाचं तेल

जर तुमच्या डोळ्यांवर सुरकुत्या आल्या असतील तर डोळ्यांखाली आणि इतर प्रभावित भागात खोबरेल तेलानं मालिश करा. खोबरेल तेल तुमच्या त्वचेला नैसर्गिक चमक देईल. हे चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि रेषा काढून टाकण्यास मदत करेल कारण नारळाचे तेल त्वचेसाठी मॉइश्चरायझिंग आणि हायड्रेटिंग आहे.

एलोवेरा

एलोवेरा जेल आणि एग व्हाईट एकत्र करून पेस्ट तयार आणि चेहऱ्यावर मालिश करा. एलोवेरा जेल व्हिटामीन ई चा एक उत्तम स्त्रोत आहे. त्वचेसाठी हे एक बूस्टर आहे. यात एंटी ऑक्सिडंट्स आणि एंटी इंफ्लेमेटरी कंपाऊंड्स असतात. ज्यामुळे कोरडी त्वचासुद्धा चांगली राहते. 

टॅग्स :हेल्थ टिप्सत्वचेची काळजी