Lokmat Sakhi >Beauty > नाकावरच्या व्हाईटहेड्स- ब्लॅकहेड्समुळे चेहरा खराब दिसतो? ३ होममेड स्क्रब- त्वचा होईल स्वच्छ

नाकावरच्या व्हाईटहेड्स- ब्लॅकहेड्समुळे चेहरा खराब दिसतो? ३ होममेड स्क्रब- त्वचा होईल स्वच्छ

How To Remove Black Heads, White Heads From Nose:नाकावर, ओठांच्या खालच्या भागात आलेले ब्लॅकहेड्स, व्हाईट हेड्स त्वचेचं सौंदर्य बिघडवून टाकतात.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2024 11:47 AM2024-04-22T11:47:58+5:302024-04-22T11:48:42+5:30

How To Remove Black Heads, White Heads From Nose:नाकावर, ओठांच्या खालच्या भागात आलेले ब्लॅकहेड्स, व्हाईट हेड्स त्वचेचं सौंदर्य बिघडवून टाकतात.

How to remove black heads, whiteheads from nose, homemade scrub for removing blackheads and whiteheads | नाकावरच्या व्हाईटहेड्स- ब्लॅकहेड्समुळे चेहरा खराब दिसतो? ३ होममेड स्क्रब- त्वचा होईल स्वच्छ

नाकावरच्या व्हाईटहेड्स- ब्लॅकहेड्समुळे चेहरा खराब दिसतो? ३ होममेड स्क्रब- त्वचा होईल स्वच्छ

Highlightsब्लॅकहेड्स किंवा व्हाईटहेड्स घरच्याघरी कशा पद्धतीने काढून टाकावेत, हे बघा.

त्वचेची योग्य काळजी घेतली तरच तिच्यावरची चमक, सौंदर्य टिकून राहते. सध्या तर सगळीकडेच प्रदुषण, ऊन, धूळ एवढी वाढली आहे की त्याचा दुष्परिणाम त्वचेवर होतोच. त्यामुळे मग त्वचेच्या वेगवेगळ्या तक्रारी सुरू होतात. हल्ली त्वचेवर व्हाईटहेड्स, ब्लॅकहेड्स येण्याची समस्याही खूप वाढली आहे. नाकावर जेव्हा ते दिसू लागतात, तेव्हा ते पाहून आपण वैतागतो. कारण त्यामुळे आपले सौंदर्यही कमी होतेच (How to remove black heads, whiteheads from nose). म्हणूनच तर ब्लॅकहेड्स किंवा व्हाईटहेड्स घरच्याघरी कशा पद्धतीने काढून टाकावेत, हे एकदा बघा. (homemade scrub for removing blackheads and whiteheads )

 

ब्लॅकहेड्स, व्हाईटहेड्स काढून टाकण्यासाठी घरगुती उपाय 

नाकावरचे किंवा खालच्या ओठाच्या खालच्या भागावरचे ब्लॅकहेड्स किंवा व्हाईटहेड्स काढून टाकण्यासाठी काय उपाय करावेत ते आता पाहा. हे उपाय करण्यासाठी सगळ्या आधी चेहऱ्याला वाफ द्या आणि त्यानंतर यापैकी कोणताही स्क्रब लावून मसाज करा.

पन्नाशीतही मलायका अरोराच्या त्वचेवर सुरकुत्या नाहीत, बघा तरुण- चमकदार त्वचेसाठी तिचा खास उपाय

१. पहिला स्क्रब तयार करण्यासाठी आपण चंदन पावडर, कॉफी पावडर, पिठी साखर आणि दही वापरणार आहोत. हे सगळं मिश्रण एकत्र करा आणि नाकावर चोळा. ५ ते ७ मिनिटे ते त्वचेवर तसेच राहू द्या. त्यानंतर अर्धवट सुकत आलं की पुन्हा चोळून काढून टाका. व्हाईट हेड्स, ब्लॅकहेड्स जाऊन त्वचा स्वच्छ होईल.

 

२. व्हाईट हेड्स किंवा ब्लॅक हेड्स काढून टाकण्यासाठी आपण जो दुसरा स्क्रब वापरणार आहोत त्यासाठी एका वाटीत तांदळाचे पीठ आणि हरबरा डाळीचे पीठ घ्या. त्यात चिमूटभर हळद घाला आणि कच्चे दूध टाकून हे मिश्रण कालवा. हा स्क्रब नाकावर थोडा रगडून लावा. त्वचा स्वच्छ होण्यास मदत होईल.

स्वयंपाक घरातले नॅपकिन चिकट, कडक होतात- कळकट नॅपकिन स्वच्छ करण्याचा १ सोपा उपाय

३. कॉफी पावडर, साखर आणि लिंबू एकत्रित करून नाकावर चोळून घ्या. यामुळेही नाकावरचे ब्लॅकहेड्स, व्हाईट हेड्स कमी होण्यास मदत होईल. वरीलपैकी कोणताही उपाय केल्यानंतर नाकावर मॉईश्चरायझर लावायला विसरू नका. 

 

Web Title: How to remove black heads, whiteheads from nose, homemade scrub for removing blackheads and whiteheads

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.