ब्लॅकहेड्स, व्हाईटहेड्स नाकावर, गालांवर जास्त दिसायला लागले की त्वचा डल दिसू लागते. ब्लॅकहेड्स टाळण्यासाठी क्लिनअप, फेशियल केले जाते पण याचा फारसा उपयोग दिसून येत नाही. (Skin Care Tips) फेशियलचा ग्लो निघून गेला की परत तसाच चेहरा दिसतो. जर तुम्ही रोज स्किन केअर रुटीन फॉलो केलं तर ब्लॅकहेड्सची समस्या टळू शकते. ब्लॅकहेड्स काढून टाकण्यासाठी काही सोपे घरगुती उपाय फायदेशीर ठरू शकतात. (How to remove blackheads at home)
सगळ्यात आधी एका वाटीत २ ते ३ चमचे दही घ्या. त्यात चमचाभर मीठ, हळद आणि साखर, लिंबू घाला. हे मिश्रण एकत्र करून नाकावर लावा आणि सुकल्यानंतर लिंबानं चोळून त्वचा स्वच्छ करा. ५ ते १० मिनिटांनी चेहरा स्वच्छ पाण्यानं धुवा आणि कोरड्या नॅपकिननं पुसून घ्या. आठवड्यातून २ वेळा हा उपाय केल्यास तुम्हाला चांगला फरक दिसून येईल. (Effective Home Remedies For Blackheads)
१) बेकिंग सोडा
ब्लॅकहेड्स दूर करण्यासाठी 1 चमचा बेकिंग सोडामध्ये 2 चमचे पाणी मिसळून पेस्ट बनवा. 10-15 मिनिटे ब्लॅकहेड्सवर ठेवा. नंतर पाण्याने धुवा. बेकिंग सोडा एक्सफोलिएटर म्हणून काम करतो, जो त्वचेवर साठलेले तेल साफ करतो.
२) ग्रीन टी
ब्लॅकहेड्स दूर करण्यासाठी आणखी एक प्रभावी कृती म्हणजे 1 चमचे ग्रीन टी पाण्यात मिसळणे. चेहऱ्यावर जिथे काळे डाग असतील तिथे लावा. ते लावल्यानंतर सुमारे 20 मिनिटांनी चेहरा कोमट पाण्याने धुवा.
३) केळ्याचे साल
ब्लॅकहेड्स कमी करण्यासाठी हा सर्वात सोपा घरगुती उपाय आहे. केळी खाल्ल्यानंतर साल फेकण्याऐवजी त्वचेला चोळा. केळीची साल त्वचेवर आतून चोळल्याने ब्लॅकहेड्स कमी होतात.
४) हळद
हळद त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. हळदीमध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म आढळतात. ब्लॅकहेड्स दूर करण्यासाठी हळदीमध्ये खोबरेल तेल मिसळून चेहऱ्याला लावा. ही पेस्ट 10-15 मिनिटे राहू द्या. आठवड्यातून सुमारे 2-3 वेळा वापरा.