आपला चेहरा सुंदर आणि टापटीप दिसणं फार महत्वाचं असतं. पण प्रदूषण, खाणंपिणं वेळेवर नसणं यांसारख्या गोष्टींमुळे चेहरा डल दिसू लागतो. (Skin Care Tips)अशात त्वचेच्या पोर्समध्ये घाण जमा होतात आणि ब्लॅकहेड्स तयार होतात. खासकरून ज्या लोकांच्या त्वचेत मोठे पोर्स तयार होतात त्यांच्या त्वचेवर ब्लॅकहेड्स जास्त दिसून येतात.(Blackheads kase remove karayche) यामुळे पिंपल्सची समस्याही वाढू शकते. म्हणूनच चेहऱ्याची काळजी घेणं गरजेचे असते.(Blackheads gharguti upay)
घरीच ब्लॅकहेड्स रिमुव्ह करण्यासाठी तुम्ही सोपा उपाय करू शकता. ज्यामुळे चेहऱ्यावर अतिरिक्त पिंपल्सही येणार नाहीत. (How to Remove Blackheads At Home) आजकाल बाजारात बरीच उत्पादनं दिसून येतात जी केमिकल्सपासून तयार केली जातात. त्यापेक्षा घरच्याघरी स्क्रब तयार करून तुम्ही ब्लॅकहेड्सना कायमचे दूर करू शकता. ब्लॅकहेड्स घालवण्यासाठी स्क्रब तयार करण्याची सोपी पद्धत पाहूया.
१) एक सिताफळ घेऊन त्याच्या बीया काढून घ्या. ४ ते ५ थेंब लिंबाचा रस आणि १ छोटा चमचा दूधाची मलाई घ्या. हे सर्व साहित्य एका बाऊलमध्ये मिक्स करून हे मिश्रण चेहऱ्याला लावा. नंतर सर्क्युलर मोशनमध्ये हात फिरवत चेहऱ्याला स्क्रब करा. यामुळे डिप क्लिनिंग होईल आणि त्वचेला नुकसानही पोहोचणार नाही. (Effective Home Remedies For Blackheads)
१ चमचा हळदीने काळेभोर होतील पिकलेले केस; हळदीचा ३ प्रकारे वापर करा-मिळवा सुंदर केस
२) हा होममेड फेस स्क्रब चेहऱ्यावर दिवसातून एकदा लावा. त्यानंतर चेहऱ्याला हॉट टॉवेल ट्रिटमेंट द्या. असं केल्याने ब्लॅकहेड्स त्वचेच्या पोर्समध्ये शिरतात त्यांना रिमुव्ह करणं सहज शक्य होईल. त्यानंतर एका स्वच्छ टॉवेलने चेहरा साफ करा. यानंतर तुम्हाला जाणवले की ब्लॅकहेड्स निघून त्वचा सॉफ्ट झाली आहे. ब्लॅकहेड्स काढल्यानंतर पोर्स ओपन होतात ते क्लोज करणं गरजेचं असतं.
रोज २ वेळा धुवूनही चेहऱ्यावर पिंपल्स येतात? पाण्यात 'हा' पदार्थ मिसळा; ग्लोईंग, फ्रेश दिसेल चेहरा
३) यासाठी हलक्या हाताने चेहऱ्याची मसाज करा. मसाज करण्यासाठी तुम्ही स्किन टाईपनुसार मॉईश्चरायजरची निवड करू शकता किंवा नारळाच्या तेलाने मसाज करा. २ मिनिटं स्क्रब केल्यानंतर ३ मिनिटं चेहऱ्याची मसाज करा. यामुळे ब्लॅकहेड्स निघून जातील.
स्क्रब करताना या गोष्टींची काळजी घ्या
१) स्क्रब करताना ते डोळ्यात शिरणार नाही याची काळजी घ्या. चेहऱ्यावर स्क्रबने जोरजोरात रगडू नका असं केल्यानं लाल चट्टे पडू शकतात. दिवसभरातून एकापेक्षा जास्तवेळ स्क्रबचा वापर करू नका. यामुळे लार्ज पोर्सची समस्या उद्भवू शकते. २) स्क्रबनंतर खाज येणं, सूज येणं असा त्रास होत असेल तर त्वरीत स्क्रबचा वापर बंद करा. स्क्रबमुळे चेहऱ्याचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्या. अनेकदा ब्लॅकहेड्स त्वचेच्या पोर्सच्या अधिक आत जातात. म्हणून जास्त न दाबता अलगद बाहेर काढण्याचा प्रयत्न करा.