Join us  

How To Remove Blackhead At Home : ब्लॅकहेडस घालवण्यासाठी महागड्या ट्रिटमेंटच कशाला, वापरा स्वयंपाकघरातील हा एक पदार्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2022 5:51 PM

How To Remove Blackhead At Home : नैसर्गिक उपायाने ब्लॅकहेडस काढता आले तर? कारण या उपायांमुळे चेहऱ्याचे कोणतेही नुकसानही होत नसल्याने ते उपाय फायदेशीर असतात.

ठळक मुद्देकॉफी प्यायला जितकी छान लागते तितकीच ती केसांसाठी फायदेशीर असतेब्लॅकहेडसवर महागडे उपचार करण्यापेक्षा घरच्या घरी हा उपाय नक्की ट्राय करा

ब्लॅकहेडस ही चेहऱ्याच्या सौंदर्यातील एक महत्त्वाची समस्या आहे. प्रदूषण, धूळ आणि इतरही विविध कारणांनी आपल्या चेहऱ्यावर ब्लॅक हेडस येतात. एकदा हे ब्लॅक हेडस तयार व्हायला लागले की ते त्वचेत आतपर्यंत रुतून बसतात आणि ते निघता निघत नाहीत. मग आपल्याकडे पार्लरमध्ये जाण्याशिवाय पर्याय नसतो. एकदा पार्लरमध्ये गेलो की हजारो रुपयांच्या ट्रीटमेंट करुनच आपण तिथून बाहेर येतो. इतके करुनही त्याचा फायदा होतोच असे नाही How To Remove Blackhead At Home . तर काही वेळाने पुन्हा चेहऱ्यावर ब्लॅकहेडस यायला लागतात. अशावेळी काही नैसर्गिक उपायाने ब्लॅकहेडस काढता आले तर? कारण या उपायांमुळे चेहऱ्याचे कोणतेही नुकसानही होत नसल्याने ते उपाय फायदेशीर असतात. 

(Image : Google)

घरातील नेमका कोणता घटक फायदेशीर 

जी कॉफी आपण अतिशय आवडीने पितो ती कॉफी पावडर ब्लॅकहेडस काढण्यासाठी अतिशय फायदेशीर असते. कॉफीमध्ये असणारे अँटी ऑक्सिडंटस त्वचेसाठी फायदेशीर असतात. त्वचेच्या वरच्या भागात असणारा डेड स्कीनचा थर काढून टाकण्यासाठी कॉफीचा चांगला उपयोग होतो. यामुळे त्वचा ग्लो होण्यास मदत होते. याशिवाय लिंबू, दही आणि खोबरेल तेल यांमुळेही चेहऱ्याच्या विविध समस्या दूर होण्यास मदत होते. 

ब्लॅकहेडस येण्याची कारणे 

शरीरात हार्मोनल बदल झाले की ब्लॅकहेडस येतात. आपले शरीर सेबेसियस ग्लँड तेलाची निर्मिती करते ज्याला आपण ब्लॅकहेडस म्हणतो. काही वेळा चेहऱ्याच्या विविध ट्रीटमेंट घेताना चेहऱ्याची रंध्रे ओपन होतात. यामध्ये धूळ किंवा घाण अडकते आणि त्वचेतील तेलकट पदार्थांबरोबर याचा संपर्क येऊन याठिकाणी ब्लॅकहेड तयार होतो. 

कसे कराल कॉफी स्क्रब

चेहरा साफ करण्यासाठी ज्याप्रमाणे आपण स्क्रबचा उपयोग करतो त्याचप्रमाणे ब्लॅकहेडस घालवण्यासाठीही स्क्रबचा वापर केला जातो. २ चमचे कॉफी पावडर, अर्धा चमचा लिंबाचा रस, १ चमचा खोबरेल तेल आणि अर्धआ चमचा दही एकत्र करावे. हे मिश्रण एकसारखे चेहऱ्याला लावावे. हे स्क्रब चेहऱ्यावर कोरडे पडत आल्यावर गोल गोल फिरवत चेहऱ्याचा मसाज करावा. यामुळे चेहऱ्यात काही प्रमाणात क़ॉफी शोषली जाईल. चेहऱ्यावरचे पूर्ण स्क्रब काढून झाले की चेहरा गार पाण्याने स्वच्छ धुवावा. हा प्रयोग आपण चेहऱ्याबरोबरच हातांना, मानेला अशा सर्व ठिकाणी करु शकतो. यामुळे नकळत चेहऱ्यावरचे ब्लॅकहेडस निघून जाण्यास मदत होते. 

(Image : Google)

कॉफी मास्क 

चेहऱ्यावरचे ब्लॅकहेडस जाण्याबरोबरच चेहरा ग्लो करण्यासाठी क़फी मास्क अतिशय उपयुक्त ठरते. सध्या बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे फेस मास्क मिळतात. त्यापेक्षा घरच्या घरी कमीत कमी वस्तूममध्ये तयार केलेला हा मास्क त्वचेसाठी केव्हाही चांगला. कॉफी पावडर, साखर, व्हर्जिन ऑईल आणि व्हिटॅमिन ई कॅप्सूल एका बाऊलमध्ये एकत्र करावे. चेहऱ्यावर हे मिश्रण एकसारखे लावावे. यामुळे त्वचेला मॉईश्चर मिळण्यास मदत होते आणि चेहरा ग्लो होण्यासही याचा चांगला फायदा होतो. वाळल्यानंतर हे मास्क साध्या पाण्याने धुवा. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीहोम रेमेडी