Lokmat Sakhi >Beauty > ब्लॅकहेड्मुळे चेहरा डल, निस्तेज वाटतोय? १ घरगुती उपाय, मिळेल क्लिन, ग्लोईंग त्वचा

ब्लॅकहेड्मुळे चेहरा डल, निस्तेज वाटतोय? १ घरगुती उपाय, मिळेल क्लिन, ग्लोईंग त्वचा

How to Remove Blackheads from Nose : ब्लॅकहेड्सची समस्या मुख्यतः घाण आणि तेलामुळे होऊ शकते.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2023 01:53 PM2023-01-15T13:53:50+5:302023-01-15T13:58:52+5:30

How to Remove Blackheads from Nose : ब्लॅकहेड्सची समस्या मुख्यतः घाण आणि तेलामुळे होऊ शकते.

How to remove blackheads from nose : 1 home remedy to get clean, glowing skin | ब्लॅकहेड्मुळे चेहरा डल, निस्तेज वाटतोय? १ घरगुती उपाय, मिळेल क्लिन, ग्लोईंग त्वचा

ब्लॅकहेड्मुळे चेहरा डल, निस्तेज वाटतोय? १ घरगुती उपाय, मिळेल क्लिन, ग्लोईंग त्वचा

रोजच्या खाण्यातील पदार्थ, चुकीच्या स्किन केअर उत्पादनांचा वापर यामुळे चेहऱ्यावर ब्लॅकहेड्स आणि व्हाईहेड्स वाढत जातात.  ब्लॅकहेट्स काढून टाकण्याचे मास्क लावूनही हवातसा ग्लोईंग लूक मिळत नाही.  नाकावर, गालांवर आणि हनुवटीवर ब्लॅकहेट्स येतात. ब्लॅकहेट्स काढण्यासाठी तुम्ही वेगवेगळे जेल्स किंवा क्रिम्स वापरू शकता पण काही घरगुती उपाय तुमचं काम अधिक सोपं करतील. यासाठी तुम्हाला जास्त खर्चही करावा लागणार नाही. (How to Remove Blackheads from Nose)

नाक आणि चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स कसे काढायचे

स्क्रबिंगसाठी साखर, मध लिंबू एकत्र करा. त्यानंतर बॉबी पिन्सचा काळजीपूर्वक वापर करून ब्लॅकहेड्स काढून घ्या. त्यानंतर चेहऱ्याला मॉईश्चरायजर लावा.   ब्लॅकहेड्सची समस्या मुख्यतः घाण आणि तेलामुळे होऊ शकते. पण यासाठी महागडी उत्पादने वापरण्याची गरज नाही, तर तुमच्या स्किन केअर रुटीनमध्ये केलेला छोटासा बदल तुम्हाला ते टाळण्यासही मदत करू शकतो.

ब्लॅकहेड्सच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी अनेकजण ते चोळून काढण्याचा प्रयत्न करतात. असे करणे टाळावे. नियमितपणे चेहरा व्यवस्थित स्वच्छ करून तुम्ही या समस्येपासून मुक्त होऊ शकता. याशिवाय, ब्लॅकहेड्सपासून मुक्त होण्यासाठी आपण त्वचेसाठी आरोग्यदायी आणि फायदेशीर पदार्थांचे सेवन करा. 

Web Title: How to remove blackheads from nose : 1 home remedy to get clean, glowing skin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.