डार्क सर्कलची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. वाढलेलं स्क्रीन टायमिंग, यासह बिघडलेल्या जीवनशैलीमुळे ही समस्या उद्भवत आहे. अपुरी झोप, योग्य आहाराचे सेवन न करणे यामुळे लोकांच्या डोळ्यांखाली काळी वर्तुळे निर्माण होत आहे. ही काळी वर्तुळे डोळ्यांखाली निर्माण का होतात? ही समस्या नेमकी कशामुळे उद्भवते? ही समस्या सोडवण्यासाठी नेमका कोणता उपाय मदतीला येईल? असे अनेक प्रश्न लोकांच्या मनात येतात.
जर आपल्याला नैसर्गिकरित्या डार्क सर्कल कमी करायचं असेल तर, योग ट्रेनर संगीता यांनी इन्स्टाग्रामवर एका योगमुद्रेचा व्हिडिओ शेअर केला आहे. यात त्यांनी मकर मुद्रा याची माहिती, व हा मुद्रा करण्याची योग्य पद्धत दाखवली आहे(How to remove dark circles under eyes - Know Makar Mudra Technique).
मकर मुद्रा करण्याची योग्य पद्धत
मकर मुद्रा करण्यासाठी पद्मासन, वज्रासन घालून ताठ बसावे. मांडी घालून बसले तरी चालते. सर्वप्रथम, डावा तळहात समोर ठेवा. त्याच्या खाली उजवा तळहात ठेवा. डाव्या तळहाताची ४ बोटे एका बाजूला आणि करंगळी त्यांच्यापासून वेगळी थोड्या अंतरावर ठेवा. आता आहे त्या गॅपमधून उजव्या हाताचा अंगठा वर घ्या आणि त्या अंगठ्याने डाव्या तळहातावर मध्यभागी जोर द्या. यानंतर डाव्या हाताचा अंगठा आणि मरंगळी ही बोटे एकमेकांवर ठेवा. आता हाताची जी अवस्था असेल तिला मकर मुद्रा असे म्हणतात.
कोरफडीच्या गरात ५ गोष्टी मिक्स करा आणि पाहा चेहऱ्यावर नितळ जादू ! पिंपल्सचा त्रास कमी..
किती वेळ करायची ही मुद्रा
मकर योग या मुद्रामध्ये हाताची रचना झाल्यानंतर दीर्घ श्वास घेऊन ५ मिनिटे करा. त्यानंतर उजवा तळहात समोर ठेऊन हीच प्रक्रिया पुन्हा करा. व दीर्घ श्वास घेऊन ५ मिनिटे ही मुद्रा करा. मकर योगमुद्रा दिवसातून ३ वेळा करा. या योग मुद्रेमुळे डोळ्यांखालील डार्क सर्कल व थकलेल्या डोळ्यांपासून आराम मिळतो.