Join us  

डागांमुळे चेहरा खूप डल वाटतो? किचनमधला १ पदार्थ वापरा, ७ दिवसात चेहरा दिसेल ग्लोईंग

By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2023 1:29 PM

How to remove dark spots from face : लिंबू, कॉफी, दूध या साहित्याचा वापर करून तुम्ही लवकरात लवकर डागांपासून सुटका मिळवू शकता.

जसजसं वय वाढत वाढत जातं तसतसं चेहऱ्यावर सुरकुत्या, पिगमेंटटेशन, वयवाढीच्या खुणा दिसायला सुरूवात होते. यामुळे कमी वयातच चेहरा वयस्कर वाटतो. (Skin Care Tips) हे डाग  घालवण्यासाठी स्किन लाईटनिंग,  पिंगमेंटटेशन रिमुव्हलच्या अनेक ट्रिटमेंट्स आहेत पण त्यातील बऱ्याच ट्रिटमेंट्स जास्त खर्चिक असतात.  डाग घालवण्यासाठी काही सोपे घरगुती उपाय फायदेशीर ठरू शकतात.  स्वंयपाकघरातील काही पदार्थ त्वचेचं सौंदर्य वाढवण्यासाठी  गुणकारी ठरतात. (How to remove pigmentation)

लिंबू, कॉफी, दूध या साहित्याचा वापर करून तुम्ही लवकरात लवकर डागांपासून सुटका मिळवू शकता. हे मिश्रण तयार केल्यानंतर ब्रशच्या साहाय्यानं डागांवर लावा आणि चेहरा स्वच्छ धुवून घ्या.  पिगमेंटेशन आणि डार्क स्पॉर्ट्सपासून फक्त ७ दिवसात सुटका मिळवण्यासाठी तुम्ही हा फेसपॅक लावू शकता.

चेहरा चांगला ठेवण्यासाठी सोप्या टिप्स

१) रात्री चेहरा धुतल्याशिवाय झोपू नका

२) सकाळी चेहरा धुतल्यानंतर मॉईश्चराईजर लावा.

३) चेहऱ्यावर पिंपल्स असल्यास हातानं फोडण्याचा प्रयत्न करू नका

४)  महिन्यातून दोनदा किंवा एकदा क्लिनअप करा

५)  तुमचं स्किन टाईप ओळखून उत्पादनांची निवड करा.  

टॅग्स :त्वचेची काळजीहेल्थ टिप्सब्यूटी टिप्स