Lokmat Sakhi >Beauty > चेहऱ्यावरचे डार्क स्पॉट्स- पिंपल्सचे डाग ७ दिवसांतच कमी होतील, लावून बघा 'हे' होममेड क्रिम

चेहऱ्यावरचे डार्क स्पॉट्स- पिंपल्सचे डाग ७ दिवसांतच कमी होतील, लावून बघा 'हे' होममेड क्रिम

DIY Cream For Dark Spots And Pimples: नविन वर्षांत बघा कसा स्वच्छ आणि नितळ होईल चेहरा... कोरियन मुलींसारखा ग्लो मिळविण्यासाठी हा उपाय करून पाहाच. (home remedies for reducing skin pigmentation)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2023 04:27 PM2023-12-28T16:27:53+5:302023-12-28T16:28:42+5:30

DIY Cream For Dark Spots And Pimples: नविन वर्षांत बघा कसा स्वच्छ आणि नितळ होईल चेहरा... कोरियन मुलींसारखा ग्लो मिळविण्यासाठी हा उपाय करून पाहाच. (home remedies for reducing skin pigmentation)

How to remove dark spots or pimples? How to get rid of pimples, home remedies for reducing skin pigmentation, How to get glass skin and radiant glow | चेहऱ्यावरचे डार्क स्पॉट्स- पिंपल्सचे डाग ७ दिवसांतच कमी होतील, लावून बघा 'हे' होममेड क्रिम

चेहऱ्यावरचे डार्क स्पॉट्स- पिंपल्सचे डाग ७ दिवसांतच कमी होतील, लावून बघा 'हे' होममेड क्रिम

Highlightsरोज रात्री झोपण्यापुर्वी हे क्रिम लावून चेहऱ्याला मसाज करा. अगदी ७ दिवसांतच डार्क स्पॉट्स, चेहऱ्यावरचे डाग कमी होतील आणि चेहरा स्वच्छ, नितळ दिसू लागेल. 

चेहऱ्यावर पिंपल्स येतात. ४ ते ५ दिवस ते चेहऱ्यावर दिसतात आणि त्यानंतर जातात. पण या पिंपल्सचे डाग मात्र पुढे कित्येक आठवडे चेहऱ्यावर तसेच राहतात. पुन्हा नवे पिंपल्स येतात आणि त्यांचे डाग नव्याने चेहऱ्यावर दिसू लागतात (How to get rid of pimples). असा डागाळलेला चेहरा मग खूपच खराब दिसतो. शिवाय काही जणींच्या चेहऱ्यावर डार्क स्पॉट्स, पिगमेंटेशनही दिसून येतं. चेहऱ्याची सगळी त्वचा एकसारखी दिसत नाही (How to remove dark spots or pimples?). अशी कोणत्याही प्रकारची त्वचेची समस्या असेल तर हा एक घरगुती उपाय लगेचच करा (home remedies for reducing skin pigmentation). अगदी आठवडाभरातच चेहऱ्यावरचे डाग कमी होतील. (How to get glass skin and radiant glow)

 

चेहऱ्यावरचे डार्क स्पॉट्स घालविण्यासाठी क्रिम

चेहऱ्यावरचे डार्क स्पॉट्स घालविण्यासाठी कोणते पदार्थ वापरून कशा पद्धतीने घरगुती क्रिम तयार करायचं, याविषयीचा व्हिडिओ lifewithrose या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. 

फक्त १० रुपयांत चेहऱ्यांवर येईल ब्रायडल ग्लो, बघा टोमॅटो वापरून नेमकं काय करायचं...

हे क्रिम तयार करण्यासाठी आपल्याला १ टेबलस्पून ॲलोव्हेरा जेल, २ टेबलस्पून कच्चं दूध, ४ ते ५ थेंब खोबरेल तेल आणि १ टीस्पून मध हे साहित्य लागणार आहे.

 

हे सगळं साहित्य एका वाटीत एकत्र करा आणि ते व्यवस्थित हलवून घ्या. जोपर्यंत या क्रिमचा रंग दुधाळ किंवा पांढरट होत नाही, तोपर्यंत हे क्रिम हलवत राहावे. यानंतर हे क्रिम एका एअरटाईट डबीमध्ये भरून फ्रिजमध्ये ठेवावे.

चालत्या गाडीच्या टपावर झोपली मुलं आणि... व्हायरल व्हिडिओ, सुटीच्या मौसमात मुलांचे जीव धोक्यात?

रोज रात्री झोपण्यापुर्वी हे क्रिम लावून चेहऱ्याला मसाज करा. अगदी ७ दिवसांतच डार्क स्पॉट्स, चेहऱ्यावरचे डाग कमी होतील आणि चेहरा स्वच्छ, नितळ दिसू लागेल. 

या क्रिममध्ये ४ ते ५ थेंब लिंबाचा रस टाकला तरी अधिक उत्तम असेही काही जणांनी व्हिडिओच्या कमेंटमध्ये सांगितले आहे. 

 

Web Title: How to remove dark spots or pimples? How to get rid of pimples, home remedies for reducing skin pigmentation, How to get glass skin and radiant glow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.