Join us  

डेड स्किनमुळे चेहरा डल दिसतो? हा घ्या डेड स्किन रिमुव्हल मास्क, पार्लरला जाण्याचीही गरज नाही...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2024 6:36 PM

How to make face masks to remove dead skin : होममेड डेड स्किन रिमुव्हल मास्कचा वापर करून आपण अगदी काही मिनिटांत त्वचेवरील डेड स्किन काढू शकता.

आपली त्वचा सुंदर, तजेलदार, मुलायम दिसण्यासाठी तिची तितकीच काळजी घेणे महत्वाचे असते. आपल्या त्वचेवर वातावरणातील बदलांचा तसेच बदलत्या ऋतूंचा परिणाम होत असतो. धुळ, माती, प्रदूषण आणि घामामुळे आपली त्वचा हळूहळू खराब होऊ लागते. त्वचा मऊ, चमकदार, सुंदर दिसण्यासाठी ती नियमित खोलवर स्वच्छ करणे अतिशय महत्वाचे असते. बऱ्याचदा त्वचेची योग्य निगा न राखल्यामुळे त्वचेवर डेड स्किन वाढू लागते. या डेड स्किनमुळे आपल्या सौंदर्यात नक्कीच बाधा येऊ शकते. आपल्या त्वचेवर धूळ, माती, प्रदूषण यांचा एक प्रकारचा थर जमा झाल्यामुळे त्वचा राठ आणि काळवंडलेली दिसू लागते(face masks to get rid of dead skin).

चेहऱ्यावरील डेड स्किन काढण्यासाठी एक्सफोलिएशन खूप महत्वाचे असते. एक्सफोलिएशनमुळे डेड स्किन (Remove Dead Skin In 5 Mins at Home) लवकर निघून जाते आणि नवीन त्वचा तयार होण्यास मदत होते. त्वचेवरील डेड स्किन काढून टाकण्यासाठी आपण अनेकवेळा पार्लरला जाऊन महागड्या ट्रिटमेंट्स करतो. परंतु प्रत्येकवेळी अशा महागड्या ट्रिटमेंट्स करणे शक्य नसते. यासोबतच सारखेच पार्लरला जाऊन एक्सफोलिएशन केल्याने त्वचा हळुहळु खराब होऊ शकते. यासाठी घरातच काही सोपे आणि घरगुती उपाय करून तुम्ही त्वचा स्वच्छ करू शकता. घरगुती डेड स्किन रिमुव्हल मास्कचा (Dead Skin Remover Mask) वापर करून आपण अगदी काही मिनिटांत त्वचेवरील डेड स्किन काढू शकता. हा होममेड डेड स्किन रिमुव्हल मास्क नेमका कसा बनवायचा ते पाहूयात(How To Remove Dead Skin At Home).

होममेड डेड स्किन रिमुव्हल मास्क बनवण्यासाठी लागणारे साहित्य :- 

१. पाणी - १/२ कप २. लिंबाचा रस - एका लिंबाचा रस ३. साखर - ४ टेबलस्पून ४. कॉफी पावडर - १ टेबलस्पून ५. हळद - चिमूटभर ६. बेसन - १ टेबलस्पून ७. खोबरेल तेल - २ ते ३ टेबलस्पून 

चेहऱ्याला-केसांना एलोवेरा जेल लावताना त्यात चुकूनही हे ५ पदार्थ त्यात मिसळू नका, नुकसानच होईल..

कस्तुरी हळद काय असते माहितीये? डार्क सर्कल्सवर रामबाण उपाय, महागड्या क्रिम्सपेक्षा जास्त असरदार उपाय...

डेड स्किन रिमुव्हल मास्क बनवण्याची कृती :- 

१. एका भांड्यात पाणी घेऊन त्यात लिंबाचा रस, साखर, कॉफी पावडर घालून हे सगळे जिन्नस मंद आचेवर ४ ते ५ मिनिटे शिजवून घ्यावे. २. त्यानंतर हे मिश्रण एका बाऊलमध्ये काढून घ्यावे. ३. या मिश्रणात चिमूटभर हळद व बेसन घालून हा मास्क घट्टसर करून घ्यावा. 

डेड स्किन रिमुव्हल मास्क कसा वापरावा ? 

हा डेड स्किन रिमुव्हल मास्क तयार झाल्यावर तो चेहऱ्यावर लावावा. हा मास्क चेहऱ्यावर लावताना फेशियल हेअर आहेत त्याच्या विरुद्ध दिशेने लावावा जेणेकरून डेड स्किनसोबतच अतिरिक्त फेशियकल हेअर देखील निघून जातील. हा मास्क चेहऱ्याला लावून तसाच १५ मिनिटे ठेवून द्यावा. त्यानंतर दोन्ही हातांना थोडेसे खोबरेल तेल लावून त्याने हलकासा मसाज करत हा मास्क चेहऱ्यावरून काढून घ्यावा. त्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावा. अशाप्रकारे हा मास्क वापरून आपण डेड स्किन अगदी सहजपणे काढू शकता.

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी