आपल्या त्वचेवर रोजच ऊन, धूर, प्रदुषण यांचा मारा होत असतो. त्यामुळे त्वचेचा पोत खराब होत जातो. त्वचा टॅन होते आणि काळवंडते. अशा त्वचेची आपल्याकडून जर योग्य पद्धतीने काळजी घेणं झालं नाही, तर त्वचेवर डेडस्किन तयार होत जाते. त्यामुळे मग त्वचेचं सौंदर्य कमी होऊ लागतं. तुम्हालाही त्वचेकडे खूप लक्ष देण्यासाठी वेळ नसेल, पार्लरमध्ये वेळच्यावेळी जाणं होत नसेल तर हा एक सोपा घरगुती उपाय करून पाहा (home made body scrub for soft skin). काही दिवस साबण किंवा फेसपॅक लावण्याऐवजी ही एक खास पावडर वापरून पाहा (how to get rid of tan skin). त्वचेचं टॅनिंग होणार नाही, डेडस्किन निघून जाईल आणि त्वचा नेहमीच चमकदार दिसेल. (how to make body scrub at home)
रोजच्या आंघोळीसाठी वापरा हे खास नॅचरल स्क्रब
आपल्याला माहितीच आहे की पुर्वी आंघोळीसाठी आपल्याकडे उटणे वापरले जायचे. उटणे हे एक प्रकारचे नॅचरल स्क्रब आहे. कारण त्याचा थोडासा जाडसरपणा त्वचेवरची डेडस्किन, टॅनिंग काढून टाकतो आणि त्यामुळे त्वचा मऊ, मुलायम होते. टॅनिंग निघून गेल्याने उजळ आणि चमकदार दिसते.
गुढीपाडव्याला करा माधुरी दीक्षितसारखा सुंदर मराठी लूक
आता त्या पारंपरिक उटण्याऐवजी काही पावडर मिसळून घरगुती स्क्रब कसं तयार करायचं, याविषयीचा एक व्हिडिओ simmysiingh या पेजवर शेअर करण्यात आला आहे. ते घरगुती, नॅचरल स्क्रब कसं तयार करायचं, ते पाहूया.
घरगुती स्क्रब तयार करण्याची पद्धत
घरगुती स्क्रब तयार करण्यासाठी २ चमचे हरबरा डाळीचे पीठ, २ चमचे तांदळाचे पीठ, २ चमचे मसूर डाळीचे पीठ, २ चमचे मुलतानी माती, १ टीस्पून हळद, १ चमचा कॉफी पावडर, २ टेबलस्पून संत्रीच्या सालींची पावडर
असं सगळं एका काचेच्या बाटलीत एकत्र करून व्यवस्थित भरून ठेवा. आंघोळीच्या वेळी ही १ चमचा पावडर एका वाटीत घ्या आणि कच्चं दूध टाकून कालवा. ही पावडर साबणाप्रमाणे अंगाला लावा. यामुळे डेड स्किन निघून जाईल आणि त्वचेवर चमक येईल.