उन्हाळ्याच्या दिवसात त्वचा टॅन होण्याची समस्या वाढते. उन्हाच्या झळा लागल्यानं पाठ, मानेचा काळपटपणा वाढतो. चेहराही काळा पडतो. उन्हामुळे झालेलं टॅनिंग घालवण्यासाठी काही क्रिम्स उपलब्ध असल्या तरी त्याचा हवातसा फरक जाणवत नाही. काही सोपे उपाय स्किन टॅनिंग घालवण्यासाठी फायदेशीर ठरतात. (Tanning Removal Tips) एकदा त्वचा टॅन झाली की जवळपास १ ते २ आठवडे किंवा त्यापेक्षा जास्तवेळ त्वचा पूर्वरत होण्यास लागतो. पार्लरमध्ये हजारो रुपये घालवण्यापेक्षा काही सोपे घरगुती उपाय कमीत खर्चात तुम्हाला उत्तम परिणाम देऊ शकतात. (How to Remove Face and Neck Tan)
1) बेसन
बेसनाच्या सहाय्याने त्वचेच्या टॅनिंगपासूनही आराम मिळतो. यासाठी बेसन, हळद, लिंबाचा रस आणि ऑलिव्ह ऑईल एकत्र करून पेस्ट तयार करा आणि चेहरा आणि त्वचेवर लावा. आता सुमारे 20 मिनिटे त्वचा कोरडी होऊ द्या. शेवटी चेहरा कोमट पाण्याने धुवा.
किचनमध्ये फार झुरळं झालीत? झुरळांना कायमचं घालवण्यासाठी करा ५ इफेक्टीव्ह उपाय
२) मध
मध आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे हे आपण सर्वच जाणतो. म्हणूनच बहुतेक सौंदर्य उत्पादनांमध्ये याचा वापर केला जातो. एका भांड्यात मध आणि दही मिसळा आणि सुमारे 20 मिनिटे चेहरा आणि त्वचेवर मध तसेच ठेवा. नंतर चेहरा धुवा.
केस गळतीमुळे टक्कल पडण्याची भिती वाटते? 1 चमचा मेथीचा हेअर स्प्रे वापरा; भराभर वाढ होईल
३) टोमॅटो
टोमॅटो ही एक अशी भाजी आहे ज्याद्वारे पदार्थांची चव वाढते. पण टोमॅटोच्या मदतीने त्वचेच्या टॅनिंगपासून आराम मिळू शकतो. यासाठी टोमॅटो मॅश करून ही पेस्ट चेहऱ्याच्या आणि शरीराच्या प्रभावित भागांवर १५ मिनिटे लावा आणि नंतर स्वच्छ पाण्याने धुवा. जर तुम्ही ही क्रिया आठवडाभर केली तर तुम्हाला चांगले परिणाम दिसतील.