Join us  

फक्त चमचाभर हळदीनं चेहऱ्यावरचे केस काढा; वॅक्सिंग, थ्रेडींगच्या वेदनांशिवाय येईल ग्लो

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2023 4:43 PM

How to remove face facial hair : चेहऱ्यावरचे केस नैसर्गिकरित्या काढून टाकण्यासाठी काही सोपे उपाय फायदेशीर ठरू शकतात. 

आपला चेहरा नीटनेटका, डागविरहीत असावा असं प्रत्येकालाच वाटतं. चेहऱ्यावरील खुणा, डार्क सर्कल्स काढून टाकण्यासाठी काहीजणी रोज क्रिम्सचा वापर करतात. (Skin Care  Tips)चेहऱ्यावरचे नको असलेले केस अनेकदा लूक बिघडवतात. वॅक्स  किंवा थ्रेडींगच्या मदतीनं हे केस काढले तरी पुन्हा १५ दिवसांच्या आत हे केस वाढू लागता आणि पूर्ण चेहरा विचित्र, कसातरी दिसतो. चेहऱ्यावरचे केस नैसर्गिकरित्या काढून टाकण्यासाठी काही सोपे उपाय फायदेशीर ठरू शकतात. (How to remove Fecial Hairs)

चेहऱ्यावरचे नको असलेले केस काढून टाकण्यासाठी सगळ्यात आधी एका बाऊलमध्ये  एक चमचा हळद, एक चमचा मुलतानी माती, एक चमचा बेसन, १ चमचा मध, लिंबाचा रस हे मिश्रण घाला. हे मिश्रण एकत्र करून चेहऱ्याला व्यवस्थित लावा.  १५ ते २० मिनिटांनी चेहऱ्याला  लावलेलं मिश्रण सुकल्यानंतर बोटांच्या साहाय्यानं चेहरा चोळून हा पॅक काढून घ्या. चोळत असताना पॅकबरोबर नको असलेले केसही निघायला सुरूवात होईल. या उपायानं तुमच्या चेहऱ्यावर नैसर्गिक उजळदार निखार येण्यास मदत होईल.

१) चेहऱ्यावरील केस काढण्यासाठी हा घरगुती उपाय म्हणजे साखर आणि लिंबाचा रस थोडे पाण्यात मिसळा. साखर एक चिकट दाणेदार पेस्ट होईपर्यंत साखर विरघळण्यासाठी ते नीट ढवळून घ्यावे आणि रोज हे मिश्रण चेहऱ्याला लावा आणि सुकल्यावर काढून टाका.

दंड, हाताची बोटं काळवंडली? १० रूपयात पार्लरसारखं मेनिक्युअर घरीच करा-ग्लोईंग दिसेल त्वचा

२) मॅश केलेले केळे आणि ओट्सचे जाडे भरडे पीठ वापरून घट्ट पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि 10 ते 15 मिनिटे मसाज करा. ओटमील मृत त्वचेसह केस काढण्यास मदत करते आणि केळी त्वचेला मॉइश्चराईज करते.

१ चमचा मेथीचा थ्री इन वन फॉर्म्यूला; केसांची वाढ होईल भराभर, कोंडा-पांढऱ्या केसांचा त्रास टळेल

३) लिंबाचा रस, साखर आणि मध एकत्र मिसळून एक गुळगुळीत पेस्ट बनवा. आवश्यकतेनुसार पाणी घाला. हे मिश्रण मायक्रोवेव्हमध्ये २-३ मिनिटे गरम करा. केस असलेल्या भागावर पावडर लावा आणि केसांच्या वाढीच्या दिशेने पेस्ट लावा. नंतर त्यावर कापडाची पट्टी ठेवा, ती दाबा आणि केसांच्या वाढीच्या दिशेने खेचा. हे मिश्रण जास्त गरम नसेल याची खात्री करा अन्यथा चटका लागू शकतो.

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी