Lokmat Sakhi >Beauty > How to Remove face hair : चेहऱ्यावर खूप केस, वैताग आलाय? 1 सोपा फेसपॅक, मिळेल ब्लिचपेक्षा चांगला इफेक्ट

How to Remove face hair : चेहऱ्यावर खूप केस, वैताग आलाय? 1 सोपा फेसपॅक, मिळेल ब्लिचपेक्षा चांगला इफेक्ट

How to Remove face hair : चेहऱ्यावरचे हे केस इतके वाढतात की ते घालवण्यासाठी नेमकं काय करायचं हेही आपल्याला कळत नाही. पाहूयात ब्यूटी एक्सपर्ट या इन्स्टाग्राम अकाऊंटवर घरच्या घरी फेसपॅक वापरुन चेहऱ्यावरचे केस कसे कमी करता येतील याबद्दल काय सांगितले आहे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2022 05:51 PM2022-03-22T17:51:07+5:302022-03-22T17:53:06+5:30

How to Remove face hair : चेहऱ्यावरचे हे केस इतके वाढतात की ते घालवण्यासाठी नेमकं काय करायचं हेही आपल्याला कळत नाही. पाहूयात ब्यूटी एक्सपर्ट या इन्स्टाग्राम अकाऊंटवर घरच्या घरी फेसपॅक वापरुन चेहऱ्यावरचे केस कसे कमी करता येतील याबद्दल काय सांगितले आहे...

How to Remove face hair: Too much hair on face, annoying? 1 Easy face pack, better effect than bleach | How to Remove face hair : चेहऱ्यावर खूप केस, वैताग आलाय? 1 सोपा फेसपॅक, मिळेल ब्लिचपेक्षा चांगला इफेक्ट

How to Remove face hair : चेहऱ्यावर खूप केस, वैताग आलाय? 1 सोपा फेसपॅक, मिळेल ब्लिचपेक्षा चांगला इफेक्ट

Highlightsहा फेसपॅक आठवड्यातून २ ते ३ वेळा न विसरता चेहऱ्याला लावा. सलग २ ते ३ महिने हा प्रयोग करा.नैसर्गिक पदार्थांचा वापर करुन तयार करण्यात आलेल्या स्क्रबचा हे केस काढण्यासाठी चांगला उपयोग होऊ शकतो. 

चेहऱ्यावर कधी पुटकुळ्या तर कधी काळे डाग यांमुळे आपल्या सौंदर्यात बाधा येते. चेहऱ्यावरच्या केसांमुळे आपण कितीही मेकअप केला तरी काळे दिसतो. मग कधी पार्लरमध्ये जाऊन ब्लिच करणे नाहीतर आणखी काही ट्रीटमेंटस घ्यायची वेळ येते. हल्ली लेझर उपचारांनीही चेहऱ्यावरचे हे अनावश्यक केस काढता येऊ शकतात (How to remove facial hair) . मात्र त्यासाठी येणारा खर्च प्रत्येकाला परवडेलच असे नाही. अशावेळी घरच्या घरी काही सोप्या उपायांनी (Home remedies) चेहऱ्यावरचे अनावश्यक केस काढता आले तर? नैसर्गिक पदार्थांचा वापर करुन तयार करण्यात आलेल्या स्क्रबचा हे केस काढण्यासाठी चांगला उपयोग होऊ शकतो. काही वेळा चेहऱ्यावरचे हे केस इतके वाढतात की ते घालवण्यासाठी नेमकं काय करायचं हेही आपल्याला कळत नाही. हार्मोन्समध्ये होणाऱ्या बदलांमुळे हे केस कधी वाढतात तर कधी एकाएकी कमी होतात. पाहूयात ब्यूटी एक्सपर्ट या इन्स्टाग्राम अकाऊंटवर घरच्या घरी फेसपॅक वापरुन चेहऱ्यावरचे केस कसे कमी करता येतील याबद्दल काय सांगितले आहे...


 

चेहऱ्यावरचे केस काढण्यासाठी फेसपॅक 

१. एक चमचा गव्हाचे पीठ, एक चमचा डाळीचे पीठ आणि पाव चमचा हळद एकत्र करा.

२. त्यामध्ये खोबरेल तेल किंवा ऑलिव्ह ऑईल आणि कच्चे दूध घाला. 

३. हे सगळे मिश्रण एकत्र करुन चेहऱ्यावर एकसारखे लावा. 

४. १५ ते २० मिनीटांनी हा चोळून हा पॅक चेहऱ्यावरुन काढा. हे काढताना थोडं दुखू शकेल, चेहऱ्यावरचे केस यासोबत निघत असल्याने हा त्रास होतो. पण त्यामुळे केस नैसर्गिकरित्या निघण्यास मदत होते. 

५. यानंतर चेहरा गार पाण्याने स्वच्छ धुवा आणि त्यावर न विसरता मॉइश्चरायजर लावा.

६. हा फेसपॅक आठवड्यातून २ ते ३ वेळा न विसरता चेहऱ्याला लावा. सलग २ ते ३ महिने हा प्रयोग करा.

७. हा पॅक लावण्याआधी चेहऱ्याच्या एका कोपऱ्यात कोणत्या प्रकारची रिअॅक्शन येत नाही ना हे तपासण्यासाठी छोटा पॅच लावून बघा. 
 

Web Title: How to Remove face hair: Too much hair on face, annoying? 1 Easy face pack, better effect than bleach

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.