(Image Credit- Shruti arjun anand)
उन्हाळ्याच्या दिवसात त्वचा काळी पडणं काही नवीन नाही एकदा त्वचेचा रंग काळा पडला की कितीही उपाय केले तरीही चेहरा उजळत नाही. पार्लरमध्ये हजारो रुपये खर्च करून आणि डि-टॅन करूनही फारसा चेहरा ग्लोईंग दिसत नाही. उन्हामुळे त्वचेवर आलेला काळपटपणा काढून टाकण्यासाठी काही घरगुती उपाय फायदेशीर ठरू शकतात. (How to remove sun burn)
सगळ्यात आधी एका वाटीत १ चमचा तांदळाचं पीठ, १ चमचा ऑरेंज पिल पावडर, १ चमचा कॉफी पावडर एकत्र करा. यात बटाट्याचा रस घाला. हे मिश्रण एकत्र करून चेहऱ्याला लावा. तुमच्या हातांना किंवा पायाला टॅनिंग झालं असेल तरीही तुम्ही हे मिश्रण लावू शकता. या पॅकनं स्क्रब करून थोडावेळ तसंच राहू द्या. नंतर चेहरा आणि हात स्वच्छ धुवून घ्या. आठवड्यातून २ ते ३ दिवस हा उपाय केल्यास चेहरा नैसर्गिकरित्या स्वच्छ दिसण्यास मदत होईल. (Skin Tanning removal tips)
सन टॅनपासून लवकर सुटका मिळवायची असेल, तर हा पॅक एक प्रभावी पर्याय आहे. बेसन त्वचेच्या मृत पेशी काढून टाकण्याचे काम करेल. त्याच वेळी, हळद त्वचेशी संबंधित समस्या दूर करण्यास मदत करू शकते. हे त्वचेच्या फ्री रॅडिकल्सपासून संरक्षण करते. सन टॅन टाळण्यासाठी तुम्ही हळद आणि बेसनाचा हा उपाय करू शकता. कोरड्या त्वचेवर बेसन वापरणे टाळा.
मसूर डाळ त्वचेचे टॅन दूर करण्यात मदत करू शकते. जेव्हा मसूर डाळ कोरफड आणि टोमॅटोच्या रसात मिसळली जाते तेव्हा ते एक शक्तिशाली टॅन रिमूव्हर पॅक म्हणून कार्य करते. लिंबाप्रमाणे टोमॅटो देखील त्वचेवर हलका प्रभाव टाकतो, तर कोरफड त्वचेला पोषण देण्याचे काम करते.
टोमॅटो आणि दह्याचा पॅक चेहऱ्यावरील काळे डाग दूर करण्यासाठी फायदेशीर ठरतो. टोमॅटोमध्ये लाइकोपीन नावाचे फायटोकेमिकल असते, जे त्वचेचे सूर्यप्रकाशापासून संरक्षण करतात. टोमॅटो सन टॅनिंगच्या नकारात्मक प्रभावापासून त्वचेचे संरक्षण देतात. दही एक प्रभावी मॉइश्चरायजर म्हणून कार्य करते आणि त्वचा हायड्रेटेड ठेवते. सन टॅन दूर करण्यासाठी तुम्ही टोमॅटो आणि दह्याचा पॅक वापरू शकता.