ऊन्हाळ्याच्या दिवसांत घराबाहेर पडणं कठीण काम. ऊन्हाळ्याच्या दिवसांत घराबाहेर पडताना स्वत:ची काळजी घेतली नाही तर त्वचा काळी पडत जाते.(How to Reduce Face Tanning)अशा स्थितीत सुर्याच्या किरणांमुळे त्वचा डॅमेज होऊ शकते आणि त्वचेवर रॅशेज येतात. त्वचेवर रॅशेज येण्याचं मुख्य कारण स्किन हिट असू शकता. (Easy Natural Home Remedies To Remove Sun Tan) ब्युटी एक्सपर्ट्स शहनाज हुसैन यांनी काही घरगुती उपाय सांगितले आहेत. ज्यामुळे ऊन्हाळ्याच्या दिवसांत त्वचेला गारवा मिळण्यास मदत होईल आणि चेहऱ्यावरचं टॅनिंगही कमी होईल. (How To Remove Face Tanning)
त्वचेला कुलिंग इफेक्ट दिल्याने काय होते? (Cooling Effect)
ऊन्हाळ्याच्या दिवसांत त्वचेवर टॅनिंग येत. अशा स्थितीत त्वचा डल दिसते म्हणूनच त्वचेसठी कुलिंग इफेक्ट फार महत्वाचा असतो. त्वचेचची काळजी घेतल्यास त्वचा नैसर्गिकरित्या ग्लो करते. ज्यामुळे त्वचा दीर्घकाळ तरूण दिसण्यास मदत होते. वातावरणातील बदल आणि ऊन्हाामुळे त्वचेत उष्णता तयार होते आणि त्वचेला कुलिंग इफेक्ट देण्यासाठी तुम्ही आठवड्यातू २ ते ३ वेळा चेहऱ्यावर फेसपॅक लावू शकता. हा फेस पॅक मास्क बनवण्यसााठी तुम्हाला घरी उपलब्ध असलेलं साहित्य वापरावे लागेल.
ग्रीन टी आणि मधाचा फेस पॅक
ग्रीन टी चेहऱ्यावरील पिंपल्स आणि ब्रेकआउट्स कमी करण्यासाठी आणि त्वचेच्या संसर्गापासून संरक्षण करण्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्याच वेळी, ग्रीन टी केवळ चेहऱ्यावरील छिद्रांमध्ये असलेले तेल कमी करण्यास मदत करत नाही आणि मध एजिंग रोखण्यास मदत करते.
ऊन्हाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी सनस्क्रीन लावल्याशिवाय घराबाहेर पडू नका, त्वचेवर हानीकारक केमिकल्सयुक्त क्रिम्सचा वापर करू नका, शरीर जास्तीत जास्त हायड्रेट ठेवण्याचा प्रयत्न करा. ऊन्हाळ्यात कपडे परिधान करून तुम्ही अतिनील किरणांच्या प्रभावापासून स्वतःचे संरक्षण करू शकता.
तसेच यासाठी तुम्ही हलक्या रंगाचे कपडे घाला.चमकदार किंवा गडद रंगाचे कपडे घालू नका. यामध्ये उच्च अल्ट्राव्हायोलेट प्रोटेक्शन फॅक्टर (UPF) असतो. म्हणून. त्यामुळे लांब बाह्यांचे कपडे घाला. शर्ट्ससाठी, कॉलर केलेले शर्ट वापरा ज्यामुळे टॅनिंग होणार नाही.