Join us  

ना वॅक्स, ना थ्रेडींगची गरज; चेहऱ्यावरचे केस काढण्याचे ४ सोपे उपाय; क्लिन-ग्लोईंग दिसेल चेहरा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2023 12:11 PM

How to remove facial hair at home : नैसर्गिक उपायांनी तुम्ही चेहऱ्यावरचे नको असलेले केस काढून टाकू शकता. (Skin Care Tips)

पुरूषांप्रमाणेच महिलांच्या चेहऱ्यावरही केस उगवणं हे अगदी सामान्य आहे. पण नको असलेले केस सौंदर्यात बाधा आणतात.  चेहऱ्यावरचे नको असलेले केस काढून टाकण्यासाठी पार्लरमध्ये जाऊन हजारो रुपये  महिला खर्च करतात आणि फेशियल वॅक्स करतात. यामुळे चेहऱ्याचं नुकसान होऊ शकतं. (How to Remove Facial Hair) कधीकधी स्किन रॅशेज उद्भवतात. काही घरगुती उपाय ही समस्या सोडवण्यास फायदेशीर ठरू शकतात. नैसर्गिक उपायांनी तुम्ही चेहऱ्यावरचे नको असलेले केस काढून टाकू शकता. (Skin Care Tips)

ओट्स आणि केळी

ओट्स आणि केळ्याच्या मदतीनं तुम्ही चेहऱ्यावरचे नको असलेले केस काढून टाकू शकता. यासाठी तुम्हाला ओट्स पाण्यात ठेवून आणि फुलवावे लागतील नंतर त्यात केळी घालून पेस्ट तयार करा. हे मिश्रण चेहऱ्याचा अशा भागांवर लावा जिथे तुम्हाला नको असलेले केस काढायचे आहेत. थोड्यावेळानं चेहरा स्वच्छ धुवून घ्या.

आक्रोड आणि मध

आक्रोड (Walnuts) आणि मध (Honey) चेहऱ्यावरचे नको असलेले केस काढून टाकण्यासाठी फायदेशीर ठरू शकतं. यासाठी सगळ्यात आधी अक्रोड सोलून त्याचे साल वेगळे करा. आता हे साल मिक्सर ग्राइंडरमध्ये दळून घ्या आणि मध मिसळून केसांना लावा. ही पेस्ट बोटांवर घेऊन चेहऱ्याला लावा नंतर चेहरा स्वच्छ धुवून घ्या.

हळद आणि एलोवेरा

हळद केसांची चांगली वाढ होण्यासाठी फायदेशीर ठरते. खासकरून फेशियल हेअर्स काढून टाकण्यासाठी  हे दोन्ही घटक फायदेशीर ठरतात.  एलोवेरा जेलमध्ये हळद मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्याच्या ज्या भागात नको असलेले केस उगवले आहेत तिथे लावा. पेस्ट सुकल्यानंतर काही वेळाने चेहरा धुवा. याचा नियमित वापर केल्यास केसांची वाढ कमी होते.

साखर आणि लिंबाचा रस

आपण साखर आणि लिंबाने चेहऱ्यावरील केस देखील काढू शकता. कारण साखर एक नैसर्गिक एक्सफोलिएटिंग एजंट आहे आणि गरम साखर तुमच्या केसांना चिकटून राहते. लिंबाचा रस त्वचेच्या केसांसाठी नैसर्गिक ब्लीच म्हणून काम करतो. तसेच त्वचेचा टोन हलका होण्यास मदत होते.

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी