फक्त पुरुषच नाही तर, महिला देखील चेहऱ्यावरच्या नको असलेल्या केसांनी त्रस्त आहे. काही महिलांच्या चेहऱ्यावर लगेच केस दिसून येत नाही. पण काही महिलांच्या चेहऱ्यावर लगेच केस दिसून येतात. चेहऱ्यावरील केस काढण्यासाठी अनेक उत्पादने बाजारात उपलब्ध आहेत. मात्र, अशा उत्पादनांमध्ये केमिकल रसायने असतात. जे त्वचेसाठी घातक ठरतात. तर काही महिला ब्यूटी पार्लरमध्ये जाऊन थ्रेडिंग करतात (Beauty Tips).
ज्यामुळे त्रास होतो, तो वेगळाच. चेहऱ्यावरील केस नैसर्गिकरित्या काढण्यासाठी आपण लिंबाचा वापर करू शकता (Threading). लिंबाच्या वापराने काही मिनिटात चेहऱ्यावरचे नको असलेले केस काही मिनिटात निघतील(How To Remove Facial Hair Naturally, by using Lemon).
महागडे सिरम सोडा - रात्री झोपताना लावा ‘या’ २ पैकी १ तेल; चेहरा दिसेल कायम फ्रेश-चमकदार
चेहऱ्यावरचे केस काढण्यासाठी लिंबाचा वापर
लिंबाचा रस आणि साखर
लिंबाचा रस आणि साखर चेहऱ्यावरचे केस काढण्यास मदत करतात. यासाठी एका भांड्यात पाणी गरम करण्यासाठी ठेवा. त्यात लिंबाचा रस आणि साखर मिक्स करा. पाण्याला उकळी आल्यानंतर गॅस बंद करा. मिश्रण थंड झाल्यानंतर चेहऱ्यावर लावा. २० मिनिटानंतर हाताने उलट्या दिशेने रगडून लावलेले मिश्रण काढा. यामुळे चेहऱ्यावरचे नको असलेले केस निघतील.
केस गळून खराटा झाले? कॉफीमध्ये मिसळा घरातलं एक खास तेल, केस इतके वाढतील की..
लिंबाचा रस आणि मध
स्किनवर नैसर्गिक ग्लो हवं असेल तर, मध आणि लिंबाचा वापर करून पाहा. यासाठी एका वाटीत लिंबाचा रस, साखर आणि मध घालून मिक्स करा. गॅस मध्यम आचेवर ठेवा. मिश्रण घट्ट झाल्यानंतर त्यात थोडं पाणी घाला. पेस्ट थंड झाल्यानंतर चेहऱ्यावर लावा. २० मिनिटानंतर उलट्या दिशेने रगडून पेस्ट काढा. पेस्टसोबत नको असलेले केसही निघतील.