Join us  

How to Remove Facial Hairs : चेहऱ्यावरचे अनावश्यक केस काढून टाकण्यासाठी करा ४ सोपे घरगुती उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2022 5:15 PM

How to Remove Facial Hairs : घरच्या घरी सोप्या आणि नैसर्गिक उपायांनी चेहऱ्यावरचे केस कसे काढायचे पाहूया...

ठळक मुद्देपार्लरचे महागडे आणि त्वचेला त्रासदायक उपचार करण्यापेक्षा घरगुती उपाय केव्हाही चांगलेविविध कारणांनी चेहऱ्यावरच्या केसांमुळे हैराण असाल तर हे सोपे उपाय करुन पाहा

आपल्याला कधी हनुवटीवर तर कधी गालावर इतके केस येतात की त्यांची लाज तर वाटतेच पण ते काढायचे कसे असा प्रश्नही पडतो. मग हे केस लपवण्यासाठी कधी ब्लिच केले जाते तर कधी व्हॅक्सिंग, थ्रेडींग करुन ते काढले जातात. लेझर उपचार हे त्यावरील कायमचे उपचार असून त्यासाठी येणारा खर्च हा अनेकदा आपल्या आवाक्याच्या बाहेर जातो. (How to Remove Facial Hairs) अशावेळी काही सोपे घरगुती उपाय माहित असतील तर त्याचा निश्चितच चांगला फायदा होऊ शकतो. कधी हार्मोन्समध्ये होणाऱ्या बदलांमुळे तर कधी आनुवंशिकतेमुळे चेहऱ्यावर असे अनावश्यक केस येतात. (Home Remedies to Remove Facial Hairs) हे केस काढले नाही तर ते आपल्या सौंदर्यात बाधा आणतात. पाहूया घरच्या घरी सोप्या आणि नैसर्गिक उपायांनी चेहऱ्यावरचे केस कसे काढायचे. 

(Image : Google)

१. दूध आणि हळद 

एका बाऊलमध्ये तांदळाचे पीठ घेऊन त्यामध्ये दूध आणि हळद एकत्र करायचे. हे मिश्रण चेहऱ्यावर एकसारखे लावून काही वेळ तसेच ठेवा. चेहऱ्यावर लावलेला लेप सुकल्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवून घ्या. हा एक असा घरगुती उपाय आहे जो तुम्ही आठवड्यातून जास्तीत जास्त वेळा केला तरी चालेल. यामुळे काही दिवसांनी चेहऱ्यावरचे केस निघून जाण्यास आणि त्यांची वाढ कमी होण्यास मदत होईल. 

२. लिंबू आणि साखर 

एका वाटीत एक चमचा साखर घेऊन त्यात थोडे पाणी घाला. साखर विरघळल्यानंतर त्यात दोन चमचे लिंबाचा रस घाला. कापसाच्या मदतीने हे मिश्रण चेहऱ्यावर ज्याठिकाणी केस आहेत तिथे लावा.२० ते ३० मिनिटे चेहरा तसाच ठेवा, त्यानतंर गार पाण्याने चेहरा धुवा. हा प्रयोग आठवड्यातून दोन वेळा करा. त्यामुळे चेहऱ्यावरील केस कमी होण्यास मदत होईल. लिंबाचा रस चेहऱ्यावर लावल्यास काही वेळा जळजळ होऊ शकते, त्यामुळे आधी हे मिश्रण हातावर लावून पाहा आणि मगच चेहऱ्यावर लावा. लिंबात सी व्हीटॅमिन असल्याने चेहऱ्यावर टॅनिंग असेल तर ते कमी होण्यासही मदत होते. 

३. कोरफड आणि हळद 

कोरफडीचा गर सौंदर्यविषयक समस्यांसाठी अतिशय उत्तम उपाय ठरु शकतो. कोरफडीच्या ताज्या गरामध्ये एक चमचा हळद घालून हे मिश्रण चेहऱ्यावर ज्याठिकाणी केस आहेत तिथे एकसारखे लावा. त्यानंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुवा. त्यामुळे चेहऱ्यावर नको असलेले केस कमी होण्यास मदत होईल. 

(Image : Google)

४. ओटस आणि केळं

ओटस पाण्यात भिजवून त्याची पेस्ट तयार करा. यामध्ये केळं बारीक करुन घाला. हे मिश्रण चेहऱ्यावर लावा आणि काही वेळाने वाळल्यानंतर काढून टाका. मग चेहरा पाण्याने स्वच्छ धुवा. दर दोन ते तीन दिवसांच्या अंतराने हा प्रयोग केल्यास त्याचा चेहऱ्यावरचे केस निघून जाण्यास चांगला उपयोग होतो.  

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी