Join us

फक्त कपाळ खूप काळे पडले आहे? ५ घरगुती उपाय - काळेपणा होईल कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2023 18:16 IST

How to remove forehead tan at home घरबसल्या कपाळावरील काळे डाग काढा या ५ सोप्या उपायांनी, चेहरा करेल ग्लो..

हवामान कोणतेही असो, त्वचेला सूर्यकिरणांपासून सरंक्षण करणे गरजेचं आहे. उन्हाळ्यात त्वचा लगेच काळपट पडते. बहुतांश लोकांचे कपाळ हे अधिक काळपट पडते. कपाळाची त्वचा उर्वरित चेहऱ्यापेक्षा अधिक गडद दिसते. ज्यामुळे संपूर्ण चेहऱ्याचे सौंदर्य कमी होते. कपाळावरील काळपटपणा लवकर कमी होत नाही, हे टॅनिंग कमी करण्यासाठी ५ घरगुती उपायांचा वापर करून पाहा. या भन्नाट उपायांमुळे कपाळावरील काळपटपणा कमी होईल. व त्वचा चमकदार दिसेल(Tips to remove forehead tan at Home).

कच्च्या दुधाचा करा असा वापर

कपाळाचा काळपटपणा दूर करण्यासाठी कच्च्या दुधाचा वापर उत्तम ठरू शकतो. यासाठी कच्च्या दुधात गुलाबजल मिसळून मिश्रण तयार करा. व हे मिश्रण कपाळावर लावा आणि हलक्या हातांनी चोळा. यामुळे कपाळावरील काळेपणा दूर होईल.

बीटरूटची साल फेकून देता? फक्त २ साहित्यांचा वापर करून बनवा हेअर मास्क, केसांची समस्या होईल दूर

हळद वापरा

हळदचा वापर फक्त जेवण बनवण्यासाठी नाही तर, त्वचेवर ग्लो आणण्यासाठी देखील केला जातो. कपाळाचा काळपटपणा दूर करण्यासाठी, एका वाटीत हळद पावडर घ्या, त्यात गुलाबजल आणि दूध मिसळून पेस्ट तयार करा. व हे मिश्रण कपाळावर २० मिनिटांसाठी लावून ठेवा. त्यानंतर सामान्य पाण्याने चेहरा धुवा. यामुळे कपाळाची त्वचा साफ होईल.

नाकातले केस दिसतात म्हणून वैतागलात? ४ उपाय - तज्ज्ञांचा सल्ला मात्र घ्या कारण..

बेसनाची पेस्ट लावा

कपाळाचा काळेपणा दूर करण्यासाठी बेसनाची पेस्ट लावून पाहा. ही पेस्ट बनवण्यासाठी बेसनामध्ये हळद घालून मिश्रण तयार करा. आता ही पेस्ट कपाळावर लावा व काही वेळाने चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. यामुळे कपाळाचा काळेपणा कमी होईल.

ओपन पोर्समुळे चेहरा खराब दिसतो, ब्लॅकहेड्स वाढलेत? ३ उपाय, चेहरा दिसेल स्वच्छ-चमकदार

काकडी वापरून पाहा

काकडी त्वचेला हायड्रेट ठेवून काळपटपणा दूर करण्यासाठी उपयुक्त आहे. यासाठी काकडीचे गोल तुकडे करून कपाळावर चोळा. यामुळे त्वचेच्या मृत पेशी निघून जातील आणि त्वचा तजेलदार दिसेल.

मध आणि लिंबू लावा

मध आणि लिंबू यांचे मिश्रण त्वचेला एक्सफोलिएट करण्याचे काम करते. यासाठी मधात लिंबाचा रस मिसळून कपाळावर लावा. ही पेस्ट लावल्याने कपाळावरील काळेपणा दूर होईल. यासोबतच त्वचेचे अतिरिक्त तेलही कमी होण्यास मदत होईल.

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी