Lokmat Sakhi >Beauty > पार्लरमध्ये न जाता घरच्याघरी जेल नेलपेण्ट कसे काढायचे? फक्त ५ सोप्या स्टेप्स; झटपट उपाय

पार्लरमध्ये न जाता घरच्याघरी जेल नेलपेण्ट कसे काढायचे? फक्त ५ सोप्या स्टेप्स; झटपट उपाय

5 Simple Tips for Removing Gel Nail Polish at Home: जेल नेलपॉलिश लावण्याचा उत्साह असतो पण ती काढताना मात्र त्रास होवू शकतो, पार्लरमध्ये न जाता घरीच ती नेलपेण्ट कशी काढाल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2023 04:27 PM2023-01-12T16:27:31+5:302023-01-12T16:30:18+5:30

5 Simple Tips for Removing Gel Nail Polish at Home: जेल नेलपॉलिश लावण्याचा उत्साह असतो पण ती काढताना मात्र त्रास होवू शकतो, पार्लरमध्ये न जाता घरीच ती नेलपेण्ट कशी काढाल?

How to remove gel nail polish at home? 5 Simple tips for removing gel nail polish | पार्लरमध्ये न जाता घरच्याघरी जेल नेलपेण्ट कसे काढायचे? फक्त ५ सोप्या स्टेप्स; झटपट उपाय

पार्लरमध्ये न जाता घरच्याघरी जेल नेलपेण्ट कसे काढायचे? फक्त ५ सोप्या स्टेप्स; झटपट उपाय

Highlightsॲसिटोन, नेल बफर यामुळे नखं कोरडी पडू शकतात. त्यामुळे नेल क्युटीकल ऑईल लावून नखांना मालिश करा. नखं स्वच्छ होतील आणि चमकतील.

आपली नेहमीची नेल पॉलिश जशी आपण घरच्याघरी काढतो, तशीच जेल नेल पॉलिशही घरच्याघरी काढता येते. त्यासाठी मात्र थोड्या वेगळ्या पद्धतीने प्रयत्न करावा लागतो. नेल पेंट किंवा नेल पॉलिशचं आणखी आधुनिक किंवा लेटेस्ट रूप म्हणजे जेल नेल पॉलिश. याला जेल पॉलिश असंही म्हणतात. आपली नेहमीची नेलपॉलिश घरच्याघरी लावू शकतो आणि तेवढ्याच सहजतेने काढूनही टाकू शकतो. पण जेल पॉलिशच्या बाबतीत मात्र तसं नसतं. ती लावण्यासाठी पार्लरमध्येच जावं लागतं. पण आता मात्र घरच्याघरी काही टिप्स आणि ट्रिक्स (5 Simple tips) वापरून तुम्ही नखांवरची जुनी झालेली जेल पॉलिश काढून टाकू शकता. (How to remove gel nail polish at home?)

जेल पाॅलिश घरच्याघरी कशी काढाल?
१. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला नेल बफर, ॲसिटोन, ॲल्यूमिनियम फॉईल, कापूस आणि नेल स्टिक, क्युटिकल ऑईल एवढं साहित्य लागणार आहे. सगळ्यात आधी नेल बफर वापरून नखांवर असणाऱ्या जेल पॉलिशचा वरचा ग्लॉसी थर काढून टाका. 

 

२. त्यानंतर जेवढ्या नखांवरची नेलपेंट काढायची आहे, तेवढे कापसाचे छोटे छोटे बोळे तयार करून घ्या. कापसाचा एकेक बोळा घ्या तो ॲसिटोनमध्ये बुडवा आणि नखावर ठेवा. त्यानंतर ॲल्यूमिनियम फाॅईल त्या नखावर गुंडाळून टाका. असं एकेक करून प्रत्येक नखासाठी करा.

 

३. यानंतर ५ ते ७ मिनिटांनी नखांवर गुंडाळलेली ॲल्यूमिनियम फाॅईल काढून टाका. कापूस काढा अणि नखांवरची जेल पाॅलिश नेल स्टिकने काढण्याचा प्रयत्न करा.

दिवसाची सुरुवात चहा- कॉफीने नकोच, त्याऐवजी ३ पदार्थ खा.. तब्येतीच्या अनेक तक्रारींवर रामबाण उपाय

सहजपणे जेल पॉलिश निघून जात असेल तर ठिक. नाहीतर पुन्हा नखांना काही मिनिटांसाठी ॲसिटोन लावा आणि त्यानंतर नेल स्टिकने जेल पॉलिश काढा..

 

४. जेल पॉलिश काढून टाकल्यानंतर नेल बफर वापरून पुन्हा एकदा नखं स्वच्छ करून घ्या.

४८ हजारांच्या ऑर्गेंझा साडीवर गज्जी सिल्कचं आकर्षक ब्लाऊज, बघा समंथा प्रभुचा स्टायलिश लूक... 

५. ॲसिटोन, नेल बफर यामुळे नखं कोरडी पडू शकतात. त्यामुळे नेल क्युटीकल ऑईल लावून नखांना मालिश करा. नखं स्वच्छ होतील आणि चमकतील.

 

 

Web Title: How to remove gel nail polish at home? 5 Simple tips for removing gel nail polish

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.