Join us  

हेअर कलर किंवा डाय करताना त्वचेवर काळे डाग पडतात? ३ उपाय, त्वचेवरचा रंग होईल चटकन साफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2022 8:00 AM

Solutions for Removing Hair Colour on Skin: जे कुणी घरीच हेअर डाय (hair dye) करतं, त्यापैकी जवळपास सगळ्यांनाच हा अनुभव आलेला असतो.. म्हणूनच तर हे बघा त्यासाठीचे काही खास उपाय. (home remedies)

ठळक मुद्देप्रत्येकवेळी पार्लरमध्ये जाऊन डाय करणं शक्य नसतं. वेळ आणि पैसा दोन्हीही जास्त खर्च होतात. म्हणून मग अनेक जणं घरीच ट्राय करतात. 

हेअर कलर (hair colour) करणं हे आता तिशी ओलांडलेल्या बहुतांश लोकांची गरज झाली आहे. कारण कमी वयातच अनेकांचे केस पांढरे होऊ लागले आहेत. पांढरे केस रंगविण्यासाठी केसांना मेहंदी लावण्याचा उपाय आहे. पण हा उपाय जरा किचकट असल्याने अनेक जणांना डाय करणं सोयीचं वाटतं. शिवाय मेहंदी लावल्यानंतर एकच टिपिकल रंग येतो. डायमध्ये किंवा हेअर कलरमध्ये (stains on hair colour) मात्र अनेक पर्याय उपलब्ध असतात. त्यामुळे डाय (how to remove hair dye on skin) करणाऱ्यांची संख्या जास्त वाढते आहे. प्रत्येकवेळी पार्लरमध्ये जाऊन डाय करणं शक्य नसतं. वेळ आणि पैसा दोन्हीही जास्त खर्च होतात. म्हणून मग अनेक जणं घरीच ट्राय करतात. 

 

त्वचेवर डाय लागल्यास चटकन निघून जावा म्हणून...१. पेट्रोलियम जेलीत्वचेवर लागलेला डाय किंवा हेअर कलर काढून टाकण्यासाठी हा एक चांगला उपाय आहे. हेअर डाय किंवा कलर करताना आपल्याला साधारण माहिती असतंच की त्वचेवर कुठेकुठे रंग लागतो. यात बराचसा भाग तर कपाळावरील हेअर लाईनचाच असतो. त्यामुळे हेअर कलर करण्याआधी हेअर लाईनवर आधी पेट्रोलियम जेली लावून घ्या आणि त्यानंतर कलर लावा. पेट्रोलियम जेलीवर कलर पडला तरी तो पाण्याने धुतल्यावर किंवा हाताने चोळल्यावर लगेच निघून जातो. 

 

२. ऑलिव्ह ऑईलज्या लोकांची त्वचा अधिक संवेदनशील असते, अशा लोकांसाठी ऑलिव्ह ऑईल लावण्याचा पर्याय उत्तम ठरतो. ऑलिव्ह ऑईल हाताच्या बोटांनी हेअर लाईन भागात लावावे आणि तिथे हलक्या हाताने थोडी मालिश देखील करावी. कानाच्या मागे आणि मानेवरही अनेक जणांकडून हेअर कलर लागला जातो. तिथे देखील ऑलिव्ह ऑईल लावून हलक्या हाताने मसाज करावी.

 

३. टुथपेस्टहेअर कलर किंवा डाय करण्यापुर्वी त्वचेवर ऑलिव्ह ऑईल किंवा पेट्रोलियम जेली लावलं नसेल तर असे डाग लवकर निघत नाहीत. दोन- तीन दिवस ते तसेच राहतात. म्हणून असे डाग काढण्यासाठी त्यावर थोडी टुथपेस्ट लावा आणि हलक्या हाताने चोळा. एखादा मिनिट चोळल्यानंतर ती जागा लगेच धुवून टाका. सगळ्या त्वचेवर एकदम टुथपेस्ट लावू नका. त्याआधी थोडी पॅच टेस्ट जरुर करून बघा. कारण टुथपेस्ट तुमच्या त्वचेला सहन होते की नाही, हे जाणून घेण्यासाठी पॅच टेस्ट करणं गरजेचं आहे. काही त्रास झाला नाही, तरच हा इलाज सगळ्या भागावर करा.  

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजीहोम रेमेडी