आपल्या चेहऱ्यावर अनेकदा बारीक केस दिसतात. हनुवटीवर किंवा अप्पर लिप्सवर हे केस जास्त दिसून येतात. हे केस लवकर काढले नाही तर, लाजिरवाणे वाटते. आपल्या सौंदर्यावर बाधा येऊ शकते. परंतु, हे केस काढताना खूप वेदना देखील होते. हे फेशियल हेअर्स काढल्यानंतरही पुन्हा येतात.
फेशियल हेअर्स काढण्यासाठी आपण व्हॅक्सिंग, थ्रेडींग आणि लेझर ट्रीटमेंट घेतो. परंतु, वेदनादायी ट्रीटमेंट घेण्याऐवजी आपण नैसर्गिक साहित्यांचा वापर करून, चेहऱ्यावरील अनावश्यक केस काढू शकता. केमिकल साहित्यांचा वापर करून केलेली ट्रीटमेंट घेण्याऐवजी, नैसर्गिक पद्धतीने फेशियल हेअर्स कसे काढायचे हे पाहूयात(How to Remove Hair from Your Upper Lip Naturally).
फेशियल हेअर्स काढण्यासाठी लागणारं साहित्य
दूध
खोबरेल तेल
हळद
मध
१ चमचा तूप बदलून टाकेल तुमचं रुप, मऊ -नितळ त्वचा-चेहऱ्यावर चमक हवी तर करा तुपाचे ३ उपयोग
कॉफी पावडर
अशा पद्धतीने काढा फेशियल हेअर्स
फेशियल हेअर्स काढण्यासाठी एक पॅन गरम करण्यासाठी ठेवा. त्यात ३ चमचे कच्चे दूध, एक चमचा खोबरेल तेल, चिमुटभर हळद, एक टेबलस्पून मध घालून ७ ते ८ मिनिटांपर्यंत उकळून घ्या. दुधाला उकळी आल्यानंतर एका वाटीमध्ये काढून घ्या, त्यात एक टेबलस्पून कॉफी पावडर घालून चमच्याने मिक्स करून पेस्ट तयार करा.
वाढ खुंटली, केस प्रचंड गळतात? घरीच करा कलोंजी - मेथी दाण्यांचं हेअर ग्रोथ ऑईल, केस भरभर वाढतील
आता एक ब्रश घ्या, पेस्टची थिक लेअर आपल्या चेहऱ्यावर लावा. १० मिनिटापर्यंत ठेवा, पेस्ट सुकल्यानंतर टॉवेलने चेहऱ्यावरून स्क्रब करून पेस्ट काढा. शेवटी पाण्याने चेहरा धुवा. या उपयामुळे काही मिनिटात चेहरा क्लिन होईल.