Lokmat Sakhi >Beauty > १ चमचा हळदीच्या होममेड स्क्रबनं उजळतील काळवंडलेले हात; त्वचा दिसेल ग्लोईंग

१ चमचा हळदीच्या होममेड स्क्रबनं उजळतील काळवंडलेले हात; त्वचा दिसेल ग्लोईंग

How to remove hand tanning at home : त्वचेवरचं टॅनिंग घालवण्यासाठी केमिकल्सयुक्त उत्पादनांपेक्षा हळद तुमच्यासाठी अधिक फायदेशीर ठरू शकते.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2023 03:23 PM2023-04-24T15:23:40+5:302023-04-24T17:16:32+5:30

How to remove hand tanning at home : त्वचेवरचं टॅनिंग घालवण्यासाठी केमिकल्सयुक्त उत्पादनांपेक्षा हळद तुमच्यासाठी अधिक फायदेशीर ठरू शकते.

How to remove hand tanning at home : How To Remove Tan From The Hands using turmeric | १ चमचा हळदीच्या होममेड स्क्रबनं उजळतील काळवंडलेले हात; त्वचा दिसेल ग्लोईंग

१ चमचा हळदीच्या होममेड स्क्रबनं उजळतील काळवंडलेले हात; त्वचा दिसेल ग्लोईंग

उन्हाळ्याच्या दिवसात त्वचेच्या रंगात झालेला बदल ही सगळ्यात मोठी समस्या असते. उन्हाच्या संपर्कात आल्यानंतर हात, पाय टॅन झाले की  महिनोंमहिने त्वचा काळपट, डल दिसते. पार्लरमध्ये हजारो रुपये खर्च करून फेशियल, मेनिक्यूअर, पेडिक्यूअर केले तरी त्याचा उपयोग तात्पुरताच दिसून येतो. (What is the fastest way to remove tan using haldi)

त्वचेवरचं टॅनिंग घालवण्यासाठी केमिकल्सयुक्त उत्पादनांपेक्षा हळद तुमच्यासाठी अधिक फायदेशीर ठरू शकते. पदार्थाला चव आणि रंग येण्याासाठी स्वयंपाकात हळदीचा वापर केला जातो. हळदीत अनेक औषधी गुणधर्मही आहेत.  काळपट पडलेल्या त्वचेचा रंग उजळवण्यासाठीही हळदीचा वापर फायदेशीर ठरू शकतो. (How To Remove Tan From The Hands)

हा उपाय करण्यासाठी सगळ्यात आधी एक चमचा हळद तव्यावर गरम करून घ्या. हळद चॉकलेटी रंगाची होईपर्यंत गरम करा नंतर गॅस बंद करा.  हळद एका भांड्यात काढून घ्या नंतर त्यात मध, दूध घाला. हे मिश्रण एकजीव करून  ही पेस्ट टॅन झालेल्या भागांवर लावा. १० ते २० मिनिटांनी या स्क्रबने त्वचेवर व्यवस्थित चोळून पाणी घाला आणि हात स्वच्छ धुवून घ्या.  आठवड्यातून २ वेळा हा प्रयोग केल्यास त्वचेवर चांगला परिणाम दिसून येईल. (Effective & Easy Ways on How to Remove Tan From Hands and Legs) 

हळद हे असे नैसर्गिक औषध आहे जे त्वचेशी संबंधित समस्यांसह अनेक प्रकारच्या शारीरिक समस्यांपासून आपल्याला सुरक्षित ठेवते. हळदीचा वापर आजपासून नाही तर वर्षानुवर्षे त्वचेच्या काळजीसाठी केला जात आहे. त्वचेचे सौंदर्य वाढवण्यासाठी हळद खूप फायदेशीर आहे. यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट, अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म त्वचेचा लालसरपणा शांत करण्यासाठी, डाग कमी करण्यासाठी, त्वचा उजळ करण्यासाठी आणि मुरुमांच्या समस्यांपासून मुक्त होण्यासाठी प्रभावी आहेत.

केस पिकलेत, केमिकल डाय नको वाटतो? मेहेंदीत हा पदार्थ मिसळून लावा; काळेभोर राहतील केस

त्वचेचा रंग सुधारण्यासाठी हळद अतिशय उपयुक्त आहे. यामुळे त्वचेवरील डाग दूर होतात.  रात्री हळद लावून झोपल्याने त्वचेवर चमक येते. तेलकट त्वचा असलेल्या लोकांसाठी हळद खूप चांगली मानली जाते. हळदीचा फेस पॅक बनवून चेहऱ्यावर लावल्याने सेबमची निर्मिती नियंत्रित होते. सेबम हा तेलकट पदार्थाचा एक प्रकार आहे. त्याचा प्रभाव कमी करण्यासाठी, रात्री झोपताना हळदीचा फेस पॅक वापरल्यास त्वचेचा तेलकटपणा कमी होतो.

Web Title: How to remove hand tanning at home : How To Remove Tan From The Hands using turmeric

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.