धूळ, ऊन, मातीपासून केसांचा बचाव करण्यासाठी तसंच केसांना सॉफ्ट, सिल्की बनण्यासाठी बऱ्याच प्रकारच्या उत्पादनांचा वापर केला जातो. इतकी काळजी घेऊनही अनेकदा पूर्ण मेहनतीवर पाणी फिरतं. (Hair Care Tips) केसांमध्ये उवा होणं, केस गळणं अशा समस्या जाणवतात. केस मोकळे ठेवले किंवा इतरांचा कंगवा वापरला की केसात उवा शिरण्याचा धोका असतो. (Hair Problems) आपल्या डोक्यात उवा आहेत हे लक्षात यायलाच फार वेळ लागतो.
स्काल्पवर घाम जमा झाल्यामुळे डोकं खाजवत असेल असा अनेकांचा समज असतो उवांमुळे पुळ्या येतात आणि डोक्याला खाज येते हे पटकन कळून येत नाही. (Uva kami karnyache upay) उवा एकदा शिरल्या की निघता निघत नाही. उवा (Nits)काढून टाकण्याच्या सोप्या टिप्स पाहूया. खासकरून लहान मुलांच्या डोक्यात उवा होण्याची समस्या जास्त दिसून येते. काही घरगुती उपाय करून तुम्ही उवांना कायमचं घालवू शकता. या उपायांमुळे डोक्यावर उवा दिसून येणार नाहीत.
आल्याचा वापर
औषधी तत्वांनी परिपूर्ण असलेलं आल केसांसाठी फायदेशीर ठरतं. दोन चमचे आल्याच्या पेस्टमध्ये दोन चमचे लिंबाचा रस मिसळून हा रस केसांना लावल्याने ही समस्या टाळता येऊ शकते. अर्धा तास हा रस केसांना लावून ठेवा नंतर स्वच्छ पाण्याने केस धुवा.
चमचाभर दह्याने घरी करा फेशियल, ५०० ते हजार रूपये वाचतील-पार्लरशिवाय चेहरा दिसेल ग्लोईंग
इसेंशियल ऑईलचा
उवा आणि लिखांपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही नारळाच्या तेलात काही थेंब पुदीना, कडुलिंबाचे इसेंशियअल ऑईल मिसळून लावा. नंतर दोन तासांनी केस शॅम्पूने धुवून घ्या. या उपायाने केसांमधील उवा लिखा निघून जाण्यास मदत होईल.
कोरियन तरूणींच्या नितळ-सुंदर त्वचेचं सिक्रेट; रात्री झोपताना करा १ काम-चेहऱ्यावर ग्लो येईल
उवा घालवण्यासाठी कापूर फायदेशीर
केसांमध्ये कापूर लावल्याने उवा, लिखा कमी होतात. यासाठी कडुलिंबाच्या तेलात कापूर मिसळून हेड मसाज करा. शक्य झाल्यास हे रात्रभर केसांना लावून ठेवा. सकाळी हेअर वॉश करा. दोन ते तीन वेळा हा उपाय केल्यास डोक्यातील लिखा आपोआप दूर होतील.
हर्बल शॅम्पू
उवा, लिखांना दूर पळवण्यासाठी तुम्ही हर्बल शॅम्पूमध्ये टी ट्री ऑईल आणि नारळाचं तेल मिसळून लावू शकता. हे लावल्यानंतर केस शॉवर कॅपने झाकून घ्या. नंतर थोड्यावेळाने केस धुवा. या उपायाने केस काळेभोर, दाट होण्यास मदत होईल.