Join us

डोक्यात खाज येते, उवा-लिखाही झाल्या? एक नैसर्गिक उपाय, उवा- लिखांचा कायमचा बंदोबस्त...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2025 15:40 IST

How To Remove Lice From Hair Permanently : How To Kill & Get Rid Of Head Lice : How do you permanently remove lice from your hair at home : How to get rid of hair lice once and for all : नैसर्गिक पदार्थ वापरुन केसांतील उवा - लिखा होतील कमी...

केसांची स्वच्छता व्यवस्थित ठेवली नाही तर उवा होण्याचा त्रास सहन करावा लागतो. जर त्यांना वेळीच काढलं नाही तर त्या वाढतात आणि डोक्यात खाज यायला सुरुवात होते. प्रामुख्याने (How to get rid of hair lice once and for all) जर आपल्या घरात लहान मुली असतील तर आपल्याला या उवांच्या समस्येला अनेकदा सामोरे जावे लागतेच. शक्यतो लहान मुलींच्या डोक्यात भरपूर उवा, लिखा असतात. शाळेत किंवा बाहेर खेळताना एकमेकींच्या डोक्याला डोकं लागलं की या उवा (How do you permanently remove lice from your hair at home) वाढतातच. बऱ्याचदा शाळेत किंवा घरात एखाद्या व्यक्तीच्या डोक्यात उवा असतील तर, इतरांच्या केसांमध्येही होतात. उवांमुळे केसांची सुंदरता कमी होते तसेच केसांमध्ये प्रचंड खाज सुटते(How To Remove Lice From Hair Permanently).

उवा लवकर केसांमधून लगेच निघता निघत नाहीत. अशावेळी आपण घरातील लहान मुलींच्या केसांवर थेट रासायनिक केमिकल्सयुक्त औषधांचा सतत मारा करतो. यामुळे लहान वयातच केस आणि स्काल्पचे नुकसान होते. असे होऊ नये यासाठी केसांतील उवा आणि लिखा काढण्यासाठी आपण काही नैसर्गिक पदार्थांचा वापर करु शकतो. घरातच उपलब्ध असलेले नैसर्गिक पदार्थ वापरुन केसांतील उवा - लिखा संपूर्णपणे नाहीशा करण्यासाठी असरदार उपाय पाहूयात. 

साहित्य :- 

१. मोहरीचे तेल - २ ते ४ टेबलस्पून २. कापूर वड्या - २ ते ३ वड्या (बारीक पावडर केलेली)३. तुरटी - १ छोटा खडा (बारीक पावडर केलेली)

ना डाय, ना हेअर कलर ! आवळा - रिठ्याचा 'हेअर कलर शाम्पू' वापरा, पांढरे केस होतील काळे...

माधुरी दीक्षित टोनर म्हणून वापरते चक्क 'हा' पदार्थ, स्वस्तात मस्त उपाय - पन्नाशीतही दिसाल तिच्यासारखे ग्लोइंग...

कृती :- 

१. सगळ्यांत आधी एक लोखंडी कढई घेऊन त्यात मोहरीचे तेल ओतून घ्यावे. २. मोहरीचे तेल हलकेच गरम करून घ्यावे, या गरम तेलात बारीक पावडर केलेल्या कापूर वड्या आणि तुरटीची पूड घालावी. ३. आता हे तेल थोडे कोमट असतानाच गाळणीने गाळून घ्यावे. 

घामामुळे टिकली सतत कपाळावरुन पडते? ६ टिप्स, टिकली पडणार नाही, पुरळ पण येणार नाही...

याचा वापर केसांसाठी कसा करावा ? 

गाळून घेतलेले तेल केसांच्या मुळांना आणि स्काल्पला लावून मसाज करून घ्यावा. बोटांच्या मदतीने तेल हळूहळू केसांत लावून घ्यावे. त्यानंतर ४५ मिनिटे ते १ तास हे तेल केसांत तसेच लावून ठेवावे. तासाभरानंतर केस शाम्पूने स्वच्छ धुवून घ्यावेत. हा उपाय आठवड्यातून किमान २ ते ३ वेळा केल्यास केसांतील उवा आणि लिकांचे प्रमाण कमी होण्यास मदत मिळते.

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजीहोम रेमेडी