Lokmat Sakhi >Beauty > चष्म्यामुळे नाकावर पडलेले काळसर डाग काढून टाकण्याचे ३ उपाय- काही दिवसांतच डाग गायब 

चष्म्यामुळे नाकावर पडलेले काळसर डाग काढून टाकण्याचे ३ उपाय- काही दिवसांतच डाग गायब 

How To Remove  Pigmentation On Nose Because Of Spectacles: चष्म्यामुळे अनेक जणांना डोळ्यांच्या कोपऱ्याच्या खाली नाकावर काळे डाग पडतात. ते काढून टाकण्यासाठी हे काही सोपे उपाय करून पाहा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2024 12:38 PM2024-02-05T12:38:12+5:302024-02-05T12:39:08+5:30

How To Remove  Pigmentation On Nose Because Of Spectacles: चष्म्यामुळे अनेक जणांना डोळ्यांच्या कोपऱ्याच्या खाली नाकावर काळे डाग पडतात. ते काढून टाकण्यासाठी हे काही सोपे उपाय करून पाहा.

How to remove marks or pigmentation on nose because of spectacles or glasses | चष्म्यामुळे नाकावर पडलेले काळसर डाग काढून टाकण्याचे ३ उपाय- काही दिवसांतच डाग गायब 

चष्म्यामुळे नाकावर पडलेले काळसर डाग काढून टाकण्याचे ३ उपाय- काही दिवसांतच डाग गायब 

Highlightsचष्मा लावलेला नसताना ते डाग खूप स्पष्ट उठून दिसतात. हे डाग काढून टाकण्यासाठी हे काही सोपे उपाय करून पाहा.

चष्मा आता खूप सर्वसामान्य बाब झाली आहे. पुर्वी वय झाल्यानंतरच चष्मा लागायचा. शाळकरी मुलांना चष्मा असणं अगदी क्वचित दिसायचं. पण आता मात्र मागच्या काही वर्षांपासून मुलांना लहान वयातच चष्मा लागत आहे. प्रत्येक घरात चष्मा असणाऱ्या एक- दोन व्यक्ती तरी हमखास असतातच. जे लोक मागच्या अनेक वर्षांपासून चष्मा लावतात, त्यांच्या नाकावर डोळ्यांच्या आतल्या बाजुच्या कोपऱ्याच्या खाली चष्म्यामुळे काळे डाग पडतात. चष्मा लावलेला नसताना ते डाग खूप स्पष्ट उठून दिसतात. हे डाग काढून टाकण्यासाठी हे काही सोपे उपाय करून पाहा. (How to remove marks or pigmentation on nose because of spectacles or glasses)

चष्म्यामुळे नाकावर पडलेले काळे डाग काढून टाकण्याचे उपाय

 

१. कोरफड

काेरफडीमध्ये त्वचेसाठी पोषक असणारे अनेक घटक असतात. त्यामुळे नाकावरचे काळे डाग काढून टाकण्यासाठी कोरफडीच्या ताज्या गराचा वापर करून पाहा.

तुम्ही घेतलेला लसूण हायब्रीड आहे की गावरान? लसणाची खरेदी करताना लक्षात ठेवा ५ गोष्टी

कोरफडीच्या गरामध्ये लिंबाच्या रसाचे १- २ थेंब टाका आणि या मिश्रणाने डागांवर मालिश करा. काही आठवड्यांतच डाग कमी होतील.

 

२. संत्रीची सालं

चष्म्यामुळे नाकावर पडलेले डाग काढून टाकण्यासाठी संत्र्याच्या सालींचा खूप चांगला उपयोग करता येईल.

डोळ्यांखालची काळी वर्तूळं घालविण्याची सोपी ट्रिक, फक्त ३ पदार्थ वापरून करा सोपा उपाय

यासाठी संत्र्याच्या सालींची पेस्ट तयार करा. त्यात कच्चं दूध घाला आणि हा लेप त्या डागांवर लावा. ५ ते ७ मिनिटांनी धुवून टाका. डाग फिकट होण्यास नक्कीच मदत होईल.

 

३. बटाटा

आपल्याला माहितीच आहे की बटाटा हा नॅचरल ब्लिचिंग एजंट म्हणून ओळखला जातो. त्यामुळे चेहरा चमकदार होण्यासाठी बटाट्याचा रस अनेकजण वापरतात.

लिंबाचं लोणचं नेहमीचंच, आता लिंबाचा सॉस करून पाहा- बघा चटकदार रेसिपी, जेवणाची मजा वाढेल

आता चष्म्यामुळे नाकावर पडलेले डाग काढून टाकण्यासाठी बटाट्याचा रस वापरून पाहा. यासाठी बटाट्याच्या रसामध्ये मधाचे ३ ते ४ थेंब टाका. या मिश्रणाने डागांना मसाज करा. ७ ते ८ मिनिटांनी चेहरा धुवून टाका. काही दिवसांतच डाग बऱ्याचशा प्रमाणात कमी होतील. 

 

Web Title: How to remove marks or pigmentation on nose because of spectacles or glasses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.