Lokmat Sakhi >Beauty > नखांवरील नेलपेंट काढण्यासाठी नेलपेंट रिमूव्हर नाही ? मग वापरा या '५' घरगुती गोष्टी...

नखांवरील नेलपेंट काढण्यासाठी नेलपेंट रिमूव्हर नाही ? मग वापरा या '५' घरगुती गोष्टी...

5 Ways to Remove Nail Polish Without Using Nail Polish Remover : काहीवेळा आपल्याकडे नेलपेंट रिमूव्हर नसते, अशावेळी नखांवरील नेलपेंट काढण्यासाठी इतर घरगुती गोष्टींचा वापर करु शकतो.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2024 12:24 AM2024-06-26T00:24:14+5:302024-06-26T00:37:54+5:30

5 Ways to Remove Nail Polish Without Using Nail Polish Remover : काहीवेळा आपल्याकडे नेलपेंट रिमूव्हर नसते, अशावेळी नखांवरील नेलपेंट काढण्यासाठी इतर घरगुती गोष्टींचा वापर करु शकतो.

how to remove nail polish without using nail polish remover 5 Ways To Remove Nail Polish WITHOUT Nail Polish Remover Remove nail polish without nail polish remover | नखांवरील नेलपेंट काढण्यासाठी नेलपेंट रिमूव्हर नाही ? मग वापरा या '५' घरगुती गोष्टी...

नखांवरील नेलपेंट काढण्यासाठी नेलपेंट रिमूव्हर नाही ? मग वापरा या '५' घरगुती गोष्टी...

हातांचे सौंदर्य वाढवण्यासाठी आपण नखांना नेलपेंट लावतो. नखं सुंदर दिसावीत म्हणून आजकाल वेगवेगळ्या पद्धतीचे नेलं आर्ट देखील केलं जात. सुंदर दिसण्यासाठी अनेकजणी डोक्याच्या केसांपासून ते पायांच्या नखांपर्यंत असंख्य ब्यूटी ट्रिटमेंट्स घेतात. विशेष करून हातापायांचे सौंदर्य अधिक खुलून यावे यासाठी  मेनिक्युअर, पेडिक्युअर करणे, त्यांची काळजी घेणे, नेलपेंट लावून त्यांची सुंदरता अधिक वाढवणे अशा सगळ्या गोष्टी केल्या जातात(Tips On How To Remove Nail Polish Without Acetone).

अनेकजणींना नेलपेंट लावायला फार आवडते कारण त्यामुळे त्यांची नखं अधिक आकर्षक दिसतात. इतकेच नव्हे तर काहीजणींना प्रत्येक ड्रेसनुसार मॅचिंग असे नेलपेंट लावायची आवड असते. नेलपेंट लावल्यानंतर, जेव्हा कधी जुनी नेलपेंट नखांवरुन काढायची (Remove nail polish without nail polish remover) असते तेव्हा नेलपेंट रिमुव्हरचा वापर केला जातो. पण काहीवेळा आपल्याकडे नेलपेंट रिमूव्हर नसते, अशावेळी नखांवर लावलेली नेलपेंट काढण्यासाठी आपण काही इतर घरगुती गोष्टींचा वापर करु शकतो(5 Ways to Remove Nail Polish Without Using Nail Polish Remover).

नेलपेंट रिमूव्हर नसल्यास नेलपेंट कशी काढावी ?

१. लिंबू आणि व्हिनेगर :- 

जर नेल पेंट रिमूव्हर उपलब्ध नसेल तर तुम्ही व्हिनेगर आणि लिंबाच्या रसाच्या मदतीने नेलपेंट काढू शकता. यासाठी सर्वप्रथम कोमट पाण्यात हात ५ ते १० मिनिटे भिजवून ठेवावे. एका बाऊलमध्ये व्हिनेगर आणि लिंबाचा रस मिक्स करुन घ्यावा. त्यानंतर कापसाचा बोळा किंवा कॉटन पॅडवर व्हिनेगर आणि लिंबाच्या रसाचे बनवलेले मिश्रण ओतावे. या उपायाने नखांवरील जुने नेलपेंट सहज निघण्यास मदत होईल. 

२. डिओड्रंट :- 

नेलपेंट काढण्यासाठी आपण डिओड्रंटचा देखील वापर करु शकतो. कापसाचा बोळा घेऊन त्यावर डिओड्रंट स्प्रे करावा. त्यानंतर नखांवर हलकेच रगडून घ्यावे. अशाप्रकारे आपण डिओड्रंटचा वापर करुन झटपट नखांवरील नेलपेंट काढू शकता. 

पावसांत भिजल्यावर केस खूप ड्राय-रखरखीत होतात? पावसाळ्यात केसांची ‘अशी’ घ्या काळजी...

३. हेअर स्प्रे :- 

हेअर स्प्रेचा वापर करून देखील आपण नखांवरील नेलपेंट अतिशय सहजरीत्या काढू शकता. कॉटन पॅडवर हेअर स्प्रे करा, त्यानंतर कॉटन पॅडने नेलपेंट् काढून घ्या. हेअर स्प्रे मध्ये असणाऱ्या अल्कहोलमुळे नखांवरील नेलपेंट लगेच निघून जाईल. 

४. अत्तर :- 

नेलपेंट नखांवरुन काढून टाकण्यासाठी हेअर स्प्रे प्रमाणेच आपण अत्तराचा देखील वापर करु शकता. थोडेसे अत्तर कापसाच्या बोळ्यावर घेऊन नखांवर रगडा, यामुळे नखांवरील नेलपेंट लगेच निघण्यास मदत होईल. 

आता फक्त ५ सोप्या स्टेप्समध्ये घरच्याघरी करा बॉडी पॉलिशिंग, पार्लरमध्ये जाऊन मिळणार नाही इतका ग्लो!

५. टूथपेस्ट :- 

टूथपेस्टचा वापर करून आपण नखांवरील नेलपेंट चटकन काढू शकतो. यासाठी टूथपेस्ट बोटांवर घेऊन हलकेच नेलपेंट लावलेल्या नखांवर घासा, यामुळे नेलपेंट सहज निघून जाईल. टूथपेस्ट ही घरात सहज उपलब्ध असते त्यामुळे याचा वापर करून आपण कधीही नेलपेंट काढू शकता.

Web Title: how to remove nail polish without using nail polish remover 5 Ways To Remove Nail Polish WITHOUT Nail Polish Remover Remove nail polish without nail polish remover

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.