Join us  

मानेवर मळ साचलाय, काळीकुट्ट दिसते? ५ उपाय, एका रात्रीत मिळेल रिझल्ट- स्किनवर येईल ग्लो

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2023 3:54 PM

How to Remove Tanning : काळ्या पडलेल्या मानेची समस्या दूर करण्यासाठी बेसन आणि लिंबाच्या मदतीने मान स्वच्छ करा. त्यानंतर या दोन्हींचे मिश्रण एका वाटीत घेऊन त्यात १ चमचा बेसन मिसळा.

चेहऱ्याच्या सुंदरतेत मानेचाही महत्वाचा रोल असतो. जर मान काळवंडली असेल किंवा मानेवर काळेवर काळे पॅचेस आले असतील तर दिसायला अगदी विचित्र दिसते आणि किळसवाणे वाटते. म्हणूनच  चेहऱ्याबरोबर मानही स्वच्छ ठेवणं गरजेचं आहे.(Man kali Zalyavar Upay)

फक्त महिलाच नाही तर पुरूषांनासुद्धा या समस्येचा सामना करावा लागतो. (How to remove tanning from face and neck) फेस मसाज, नेक मसाज, ब्लिच केल्यानंतर  चेहऱ्यावर ग्लो येतो पण ते जास्त वेळ टिकून राहत नाही नंतर चेहऱ्याबरोबर मानही काळी पडते. (Tanning Removal Tips)

वेळीच लक्ष न दिल्यास मानेरवर पॅचेस दिसायला सुरूवात होते. मानेचा काळेपणा दूर करण्याचे सोपे उपाय पाहूया. (How to remove neck tanning) हे उपाय न केल्यास तुम्हाला पार्लरचा खर्च न करता उजळ त्वचा दिसेल.

लिंबू आणि बेसन

काळ्या पडलेल्या मानेची समस्या दूर करण्यासाठी बेसन आणि लिंबाच्या मदतीने मान स्वच्छ करा. त्यानंतर या दोन्हींचे मिश्रण एका वाटीत घेऊन त्यात १ चमचा बेसन मिसळा. त्यानंतर एका लिंबाचा रस त्यात घालून  मिश्रण मानेवर लावा. जवळपास २ ते ३ मिनिटं व्यवस्थित रगडल्यानंतर मान पाण्याने स्वच्छ धुवा. या उपायाने डार्क मानेपासून सुटका मिळेल.

डोक्यावर पांढरे केसच जास्त दिसतात? 5 पदार्थ वापरून केस करा काळे, डायची गरजच नाही

मध

मान काळी पडली असेल तर तुम्ही यावर मध आणि लिंबाचे मिश्रण लावू शकता. या उपायामुळे काही दिवसात मानेचा काळेपणा दूर होईल.  यासाठी मध आणि लिंबाचा रस व्यवस्थित मिसळा. हा रस तुमच्या मानेला लावून ठेवा. जवळपास १५ मिनिटांनी हलक्या हाताने मसाज करून मान स्वच्छ करा.  या उपायाने  त्वचा उजळण्यास मदत होईल.

हळद आणि दही

मानेवर जमा झालेला मळ आणि टॅनिंग काढून टाकण्यासाठी तुम्ही हळद आणि दह्याचे मिश्रण लावू शकता. यासाठी १ चमचा दह्यात हळद मिसळा हे मिश्रण मानेवर लावून ठेवा. त्यानंतर २० मिनिटांनी मान स्वच्छ करा. हा उपाय केल्यानं डार्क मानेची समस्या टाळण्यास मदत होईल.

५४ वर्षीय भाग्यश्रीच्या दाट-शायनी केसाचं सिक्रेट; सुंदर केसांसाठी २ प्रकारच्या तेलाने करते मालिश

टोमॅटो

त्वचा उजळवण्यासाठी टोमॅटोची पेस्ट पण फायदेशीर ठरते. कारण टोमॅटोमध्ये त्वचा लाईटनिंगचे गुणधर्म असतात. ही पेस्ट बनवण्यासाठी १ टोमॅटो मधोमध चिरून घ्या त्यात थोडं ओटमिल मिसळा. त्यानंतर मानेवर घासा. हा उपाय केल्यानं काही मिनिटांत डार्क मानेच्या समस्येवर आराम मिळेल.

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी