Lokmat Sakhi >Beauty > चेहऱ्यापेक्षा मान जास्तच काळी दिसते? १० रूपयांच्या टूथपेस्टची जादू, मान होईल स्वच्छ

चेहऱ्यापेक्षा मान जास्तच काळी दिसते? १० रूपयांच्या टूथपेस्टची जादू, मान होईल स्वच्छ

How to Remove Neck Tanning : मानेवरचे काळे डाग, टॅनिंग घालवण्यासाठी काही सोपे उपाय पाहूया.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2023 12:21 PM2023-06-23T12:21:04+5:302023-06-23T16:49:36+5:30

How to Remove Neck Tanning : मानेवरचे काळे डाग, टॅनिंग घालवण्यासाठी काही सोपे उपाय पाहूया.

How to remove neck tanning : Effective Home Remedies to Remove Tan Using Colgate | चेहऱ्यापेक्षा मान जास्तच काळी दिसते? १० रूपयांच्या टूथपेस्टची जादू, मान होईल स्वच्छ

चेहऱ्यापेक्षा मान जास्तच काळी दिसते? १० रूपयांच्या टूथपेस्टची जादू, मान होईल स्वच्छ

उन्हाळ्याच्या दिवसात  चेहऱ्यासह हात, पाय आणि मानेवरही टॅनिंग दिसून येतं. चेहरा गोरा आणि मान काळी दिसत असेल तर कोणाचंही लक्ष पटकन मानेकडे जातं. (Tanning Removal Tips) फेशियल, डी टॅनमुळे मानेच्या रंगात फरक दिसून येतो पण हे उपाय तेव्हढ्यापुरता असतात. नियमित काही घरगुती उपायांचा अवलंब केला तर ही समस्या कायमची दूर होऊ शकते. (Effective Home Remedies to Remove Tan Using Colgate)

मानेवरचे काळे डाग, टॅनिंग घालवण्यासाठी काही सोपे उपाय पाहूया. (How to remove neck tanning) सगळ्यात आधी एक वाटीत टूथपेस्ट घ्या, त्यात हळद, बेकींग सोडा आणि लिंबू घाला. हे मिश्रण एकत्र करून मानेला लावा आणि स्क्रबप्रमाणे चोळा. कोरडे झाल्यानंतर मान व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्या. आठवड्यातून २ वेळा हा उपाय केल्यास चांगला परीणाम दिसून येईल.

मानेवरचं टॅनिंग घालवण्याचे इतर उपाय

१) एका भांड्यात दोन चमचे तांदळाचे पीठ घ्या आणि त्यात बटाट्याचा रस आणि एक चमचा गुलाबपाणी घाला. हे सर्व मिसळून पेस्ट तयार करा आणि 15 ते 20 मिनिटे मानेवर सोडा, कोरडे झाल्यानंतर स्वच्छ करा.

२) एक चमचा लिंबाच्या रसामध्ये एक चमचा मध मिसळा. ही तयार पेस्ट मानेवर लावा आणि 15-20 मिनिटे राहू द्या. नंतर ओल्या कापडाने स्वच्छ करा. यामुळे तुमच्या मानेचा काळेपणा दूर होईल.

३) मानेचा काळेपणा दूर करण्यासाठी एक चमचा तुरटी पावडर आणि एक चमचा मुलतानी माती मिसळा. यानंतर 1 चमचे गुलाबजल आणि 1 ते 2 चमचे लिंबाचा रस मिसळून घट्ट पेस्ट बनवा. पेस्ट लावल्यानंतर 15 ते 20 मिनिटे तशीच राहू द्या आणि चांगली कोरडी झाल्यावर स्वच्छ करा.

केसांची वाढ खुंटली? जास्वंदाचं जादूई तेल घरीच बनवून लावा, कंबरेपर्यंत वाढतील-काळे होतील केस

४) एका भांड्यात तुरटी, खाण्याचा सोडा आणि गुलाबजल एकत्र करून मानेच्या काळ्या भागावर लावा. यामुळे मानेचा काळेपणाही सहज दूर होतो.

ओपन पोर्समुळे चेहरा खराब, डल झालाय? १ उपाय; त्वचा दिसेल नितळ-सुंदर, पोर्स होतील बंद

५) कच्ची पपई बारीक करून पेस्ट बनवा आणि आता त्यात गुलाबजल आणि थोडे दही मिक्स करा. ही पेस्ट मानेवर लावा आणि सुमारे 15 मिनिटे ठेवल्यानंतर, स्क्रब करुन धुवा.

Web Title: How to remove neck tanning : Effective Home Remedies to Remove Tan Using Colgate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.