उन्हात फिरल्यामुळे टॅनिंग तर कधी योग्य काळजी न घेतल्यामुळे मानेवर टॅनिंग जमा होतं. बरेच दिवस मानेवरच्या टॅनिंगकडे लक्ष न दिल्यास मळाचे थर जमा होतात. (How To Remove Tan From Neck) यामुळेच अनेकदा पूर्ण मान झाकली जाईल असे कपडे वापरावे लागतात. (How to Remove Neck Tanning) नारळाच्या तेलाचा वापर करून तुम्ही मानेचा काळेपणा दूर करू शकता. नारळाचे तेल जितकं केसांसाठी चांगले असते तितकेच ते मान स्वच्छ करण्यासाठीही फायदेशीर ठरते. मान स्वच्छ करण्यासाठी नारळाच्या तेलात काय काय मिसळावे लागते ते समजून घेऊ. (Home remedies to get rid of neck tan)
टुथपेस्ट
मळ साचलेली मान, पाठ स्वच्छ करण्यासाठी सगळ्यात आधी टुथपेस्टमध्ये नारळाचे तेल मिसळून लावू शकता. यासाठी नारळाच्या तेलात १ चमचा टुथपेस्ट, अर्धा चमचा मीठ मिसळा. हे मिश्रण आपल्या मानेला लावून व्यवस्थित स्वच्छ करा. थोड्यावेळाने या पेस्टवर अर्धवट कापलेला लिंबू मानेवर हलक्या हाताने रगडून स्वच्छ करा. लिंबू मानेचं टॅनिंग दूर करेल. या मिश्रणाने १० मिनिटं मान रगडून मान स्वच्छ धुवून घ्या आठवड्यातून २ वेळा हा उपाय केल्यास चांगला परिणाम दिसून येईल. (Effective Home Remedies to Remove Tan)
डोक्यावर पांढरे केसच जास्त चमकतात? झोपण्याआधी नाभीत हे तेल लावा-५ दिवसांत मिळवा काळे केस
एलोवेरा
नारळाच्या तेलात एलोवेरा जेल मिसळून मानेवर लावा. एलोवेरा जेल मध्ये एंटी ऑक्सिडेंट्सस मोठ्या प्रमाणात असतात. यामुळे मानेवर जमा झालेला मळ कमी होण्यास मदत होते. नारळाच्या तेलात एलोवेरा जेल मिसळून मानेवर हलक्या हाताने मसाज करा. १० मिनिटं मसाज केल्यानं पाण्याने स्वच्छ धुवा.
कॉफी पावडर
कॉफी प्यायला जितकी चांगली लागते तितकी ती इतर कामांमध्येही वापरात येते. मान उजळवण्यासाठी नारळाच्या तेलात कॉफी मिसळून लावा. स्क्रबप्रमाणे जाडसर पेस्ट बनवून चेहऱ्याला लावा. ही पेस्ट ५ ते १० मिनिटांसाठी मानेवर लावून ठेवा १० मिनिटांनी मान स्वच्छ धुवा.
चटकदार पातळ पोह्यांचा चिवडा करण्याची सोपी रेसिपी; पोहे आकसू नये-मऊ पडू यासाठी ५ टिप्स
लिंबाचा रस
लिंबात अनेक पोषक तत्व असतात. नारळाच्या रसात मिसळून लिंबू मानेवर लावल्याने काळेपणा दूर होण्यास मदत होते. लिंबाचा रस एखाद्या औषधाप्रमाणे असतो. नारळाच्या तेलात लिंबाचा रस मिसळून १० ते १५ मिनिटं मसाज करा. यामुळे मानेचा काळेपणा निघून जाण्यास मदत होईल आणि त्वचा मऊ राहील.