हात, पाय आणि मानेवर जमा झालेला काळेपणा निघून जाण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय करू शकता. हा काळेपणा दूर करण्यासाठी तुम्हाला पार्लरमध्ये जाऊन एक्स्ट्रा पैसे घालवण्याची काहीही गरज नाही. (Beauty Tips) टॅनिंग निघून जाण्यासाठी स्वंयपाकघरात रोजच्या वापरात असलेले पदार्थ फायदेशीर ठरतात. (How to Remove Neck Tanning)
लाईफस्टाईल एशियाच्या रिपोर्टनुसार घरगुती उपाय कमी वेळात चांगला रिजल्ट देतात आणि जास्त खर्चिक नसतात. ज्याचे कोणते साईट इफेक्ट्सही उद्भवत नाहीत. (Easy Neck Tanning Removal Tips) बटाट्याचा रस, पपईचा गर, मसूर डाळ, ओलमिल आणि बटरमिल्क, अननस या पदार्थांनी फक्त शरीरालाच फायदा होत नाही तर त्वचेचे सौंदर्य वाढवण्यासही मदत होते. (Top 8 Neck Tan Removal Tips)
१) टोमॅटोचा रस
टोमॅटोच्या रसात लायकोपीन असते. लायकोपीनमुळे त्वचेवर उजळपणा येतो. एका टोमॅटोचा रस काढून त्वचेवर लावा. २० ते ३० मिनिटांनी चेहरा व्यवस्थित धुवून घ्या.
२) दही आणि मध
दह्यात लॅक्टिक एसिड असते. ज्यामुळे त्वचेचं टॅनिंग कमी होण्यास मदत होते. एक छोटी वाटी घ्या दही घ्या आणि त्यानंतर थोडं मध घ्या. हे मिश्रण हात, पाय आणि मानेवर लावा. १५ ते २० मिनिटांनी चेहरा धुवून घ्या.
पोट कमी करायचंय-डाएट शक्य नाही? डाळ-भात, चपाती-भाजी 'या' पद्धतीनं खा, चरबी होईल कमी
३) लिंबाचा रस
लिंबाचा रस हात, पाय आणि मानेला लावल्यास त्वचेचा काळेपणा निघून जातो. एका लिंबाचा रस काढून मानेवर लावा १० ते १५ मिनिटं लावून ठेवा. नंतर चेहरा स्वच्छ करा. ज्यामुळे चेहऱ्यावर ग्लो येण्यास मदत होईल.
सद्गगुरू सांगतात जेवणाच्या 'या' सवयी आजच बदला; जीवघेण्या कॅन्सरचा टळेल धोका
४) उटणं
उटणामुळे हात, पाय आणि मानेचं टॅनिंग काढून टाकण्यास मदत होते. अक्रोड बारीक कापून त्या मुलतानी माती, चंदन पावडर, गुलाब पाणी मिसळून याची पेस्ट बनवा. ही पेस्ट त्वचेवर लावून सुकू द्या. त्यानंतर हलक्या हाताने मसाज करून चेहरा स्वच्छ धुवून घ्या.
५) एलोवेरा जेल
एलोवेरा जेल त्वचेला गारवा प्रदान करते. त्वचेची काळेपणा दूर करण्यासाठी आणि एलोवेराची पानं कापून त्याचे जेल काढून त्वचेवर लावा. २० मिनिटांनी चेहऱ्याला लावा आणि चेहरा स्वच्छ धुवून टाका.
६) स्क्रब
स्क्रब एक नैसर्गिक उटणाप्रमाणे काम करते. तांदळाच्या पीठात दही आणि लिंबाचा रस मिळून हात, पाय आणि मानेवर लावून हलक्या हाताने मसाज करा नंतर व्यवस्थित सुकू द्या. पूर्णपणे सुकल्यानंतर हाताने मळून स्क्रब करा.
७) लिंबाचा रस
लिंबाच्या रसात व्हिटामीन सी बरोबरच एक्सफोलिएटींग प्रोपर्टिज असतात. ज्यामुळे त्वचेचं टॅनिंग निघून जातं. लिंबाचा रस पाण्यात मिसळून स्प्रे बॉटलमध्ये भरा आणि त्याचा वापर करा.
८) हळद आणि दूधाचा फेस पॅक
हळदीत एंटी इन्फ्लामेटरी गुण असतात. दूध त्वचेला मॉईश्चर करते. हळद आणि दूधाचे मिश्रण तयार करून मान, हात आणि पायांना लावा. नंतर चेहरा स्क्रब करून स्वच्छ धुवून घ्या.